अशाच एका तळ्याकाठी ...

अशाच एका तळ्याकाठी ...

अशाच एका तळ्याकाठी बसली होतीस तू ???
आठवणीत कोणाच्या रमली होतीस तू ????

निळ्याभोर आकाशातील उनही तुला लाजले ???
नको तुला त्याची झळ म्हणून मेघ पुन्हा वाजले ???

तुझ्या नाजूक डोळ्यांची काय तुलना करू मी ??
तुझ्या सोज्वळ हास्याची काय कल्पना करू मी ??

नशिबात ज्याच्या असशिल तू………….
सुख आणि सुखच त्याला देशील तू…….

ओठावर नाही शब्द माझ्या……………
वीसावली कविता माझी तारुण्यावर तुझ्या…

तर ते आहे प्रेम...!

तर ते आहे प्रेम...!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,

तर हे प्रेम नाही हा तर मोह...!



तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,

तर हे प्रेम नाही ही तर वासना...!



तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,

तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!



तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,

तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!



जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,

तर ते आहे प्रेम...!



जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता...,

तर ते आहे प्रेम...!



जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता...,

तर ते आहे प्रेम....!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!



जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही

आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल...,

तर ते आहे प्रेम...

मला तुझी आठवण यावी...

 मला तुझी आठवण यावी...

का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी....?
सारं काही जवळ असुनही,
दूर असल्याची जाणीव व्हावी.....?

आठवताहेत ते क्षण,
जांच्यावर जगतेय अजुनपण,
सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,
खेचणारे असे हे क्षण

आठवतेय तो सारा पसारा,
जो, पसरलाय सैरावैरा,
त्यातूनच तुझा तो इशारा,
तेव्हा अंगावर आलेला शहारा.....!

एवढे सर्व असुनही,
का बरं मला तुझी आठवण यावी...?
जीवाची अशी घालमेल व्हावी..........!

आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,
मग स्वत:च बोलणं,नाहीतर दोन - चार दिवस थांबून,
मी बोलतेय का हे बघणं......!

वाटतं ही वेळ अशी,
चुटकित सरून जावी,
आणि शेवटी कायमची,
आपली गाठभेट व्हावी.......! 

स्वप्न......

स्वप्न......

आरशा समोर उभे राहून स्वातच स्वाताला हसतो

आजु बाजूला त्याला स्वप्नच स्वप्न दिसते,

चार चौघात आसून ही मन वेगळेचपाडते

हे सगळे वेड्या प्रेमातच घडते,

कल्पनेने ही नुसत्या मन मोहरते

नाव येता तिचे काळीज धडधडटे,

फुलपाखरू होऊन मन बेढुंध बगडते

हे सगळे वेड्या प्रेमातच घडते,

पावसाच्या थेंबाना झेलावेसेवाटते

इंद्रधनू षयी सप्तरांगासाठीमनतरफडते,

आकाशी उडण्यासाठी मन धडपड़ते

हे सगळे वेड्या प्रेमात च घडते,

शब्द शब्द तिचा झेलावासा वाटतो

हात तिचा हाती आसावासा वाटतो,

दुरून का होईना तिचा चेहरा दिसवासा वाटतो

आपलीच आहे ते मन स्वातच ठरवते

हे सगळे वेड्या प्रेमातच घडते.............

साथ......

साथ......

वाटलं साथ असेल जन्मोजन्मीची
नातं असेल मनोमनीच
आधार असेल जीवनाचा
पण अशा काही विचाराचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!
...
वाटलं असशील अमावस्या रात्रीची चांदणी
जी वाट दाखवेल माझ्या मुक्कामाची
आधार असेल माझ्या प्रत्येक अंधाऱ्या रात्रीचा
पण अशा काही वाटेवर जाण्याचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!

वाटलं असेल मी एक चंद्र तुझा
सुखावशील शीतल छायेत माझ्या
फक्त तो तूला नि तुलाच भासणारा
पण तुझ्या त्या आकाशात उगवण्याचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!

वाटलं असेल संगती
मी तुझ्या प्रत्येकक्षणी
साथ असेल पदोपदीची
आधार असेल प्रत्येक क्षणाचा
पण अशा काही चिरकाल क्षणाचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!

तुझ्या स्वप्नांच्या मैफिली रंगतात तेव्हा ..........


तुझ्या स्वप्नांच्या मैफिली रंगतात तेव्हा ..........

रोज रात्री आतुरतेने ...
...
मी भेटतो तुला .....

विरहाच्या अनेक रात्रींची ....

साक्ष देण्यासाठी ....

सोबत असतात ....

त्या चांदण्या ....

व तो चंद्रही ....

रात्र सरत नसते .......... !

मग ते निरभ्र आकाशही -

बरसू लागतं ....

तुझ्या आठवणींच्या रुपाने ....

तेव्हा .... प्रत्येक क्षण सुगंधीत होतो ....

कारण एकाकी असलो तरीही .....

तु सोबत असतेस ....

मनात साठवलेलं ....

" सोनेरी स्वप्नं " घेवून .....

तुही येतेस .....

त्या अंधकारात एकरुप होण्यासाठी ...!!!!

तिच्या डोळ्यातला

तिच्या डोळ्यातला 

तिच्या डोळ्यातला पाऊस होऊन
बरसत राहावे,कधी हर्षाचा कधी खेदाचा..

कधी तिच्या ओठातले बोल होऊन 
सांडत राहावे तिचे काव्य तर 
कधी भावना बनून ...

कधी तिचा हळुवार स्पर्श
व्हावे, अलगद मोरपिसासारखे
फुलारून यावे,बहरून यावे...

तिच्या केसांची बट बनून
लहरावे,तिने सावरता
पटकन नाठाळ होऊन
अजून विस्कटून जावे....

कधी तिची वस्त्र बनून
तिलाच अलगद बिलगावे....
तिच्या नकळत तिच्या सौंदर्याचा
भाग बनून उरावे.....

तिच्या आरक्त पावलांची
कधी व्हावी रक्तिमा
तिच्या भाळीची चंद्रकोर
खुलताना कधी पाहावे ...

तिचा गजरा बनून कधी
राहावे तिच्या केसात
आभूषण बनून लखाखून
टाकावी तिची कांती...

मग तिच्या रागात, तिच्या
क्लेशात, उद्विग्नतेत उरावे
तिचा आत्मविश्वास बनावे कधी
पाहावे तिला परत सावरताना ...

अहं बाजूला ठेवून तिला
ओळखावे, कधी समजावे.
तिच्यासाठी तिच्या शब्दांसाठी
आनंदासाठी जगत राहावे.....


तुला दिलेली वचनं

तुला दिलेली वचनं

तुला दिलेली वचनं
मी माझ्या मनापासून पाळले होते...
तू नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते...

झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला...

आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते...

माझ्या राखेचा एक कण....तुझ्या हातावर.
प्रेमात तुझ्या मिळाले मला जे एकटेपण
त्याचा कस् माझा विझता श्वास
शेवटच्या या वळनावर आता प्रिये
शेवटची पुन्हा तुझीच आस ......

एकदा तुझा हात हातात धरून
निशब्द उभे रहायचं आहे... उमजुन घे
नाहीतर तुझा हात तूच पकड़ स्वतः
असेल तुझाच पण माझा समजुन घे

कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझ्यासाठी काय होते ,
तुझ्या डोळ्यातून अश्रू पडताना माझे डोळेही भिजून जाते ...

कस सांगू मी ह्या जगाला कि तुझे माझे नाते काय होते ,
आपलं नांत तर, नातांच्या अंधकारातून निघणारी एक ज्योत होते ..

कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे सर्वस्व आहे ,
तुझ्या विना मी तर एक न चकाकणार चांदण आहे ..

आठवणीं

आठवणीं

शीळ घाली भूतकाळ ,

आठवणींच्या घनदाट रानात ,

भासे कधी बेसूर ,

तर कधी असे मधुर स्वरात ...

वाट शोधतोय पांथस्थ

वेड्या वाकड्या या वळणात ,

कमी नसते कधीच ...,

सुख दुंखाची या प्रवासात ...

जपतो तो प्रत्येक नाते ...,

जपतो तो प्रत्येक नाते .......

मात्र ...., याच जीवनात ......

जरी फिरत असला तो ,

आठवणीच्या घनदाट रानात ....!!!