तु मला हरवून जिंकशील.............

तु मला हरवून जिंकशील.............

तु मला हरवून,
जिंकशील जेव्हा,
तु मला रडवून,
हसशील जेव्हा.....

तु मला पाहून,
रुसशील जेव्हा,
तेव्हा मी तुला,
परखी झालेली असेन.....

तु मला गमावून,
काही मिळवशील,
तु मला विसरुन,
स्वतः जगशील.....

तु मला सोडून,
कुठे जाशील,
तेव्हा मी तुझी,
कुणीच नसेन.....

तु मला समजशील,
तेव्हा स्वतःला विसरशील,
तु मला मागशील,
तेव्हा तुज्याकडेकाहीच नसेल.....

कारण ?????

तेव्हा मिच निघून जाईन,
अगदी कायमची,
तरी जातानाही तुला,
काही देऊन जाईन.....

तो अनमोल ठेवा,
जो मला कधीच नको असेल,
तुझ्या डोळ्यातलं पाणी नेहमी मला,
मी तुला काहीच न दिल्याच सांगत राहिल.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: