पाहिलेस का कधी...?



पाहिलेस का कधी...?

पाहिलेस का कधी...?
हृदय फाटताना
डोळ्यातील अश्रू डोळ्यातच गोठ्ताना....

पाहिलेस का कधी...
शब्द अर्थ हरवताना

ओठावरती येताच
शब्दांना मुके होताना....

पाहिलेस का कधी....
अनेक वादळे आणि
डोळे कोरडे असताना
आणि मन रडताना

पाहिलेस का कधी...
श्वास-स्पंदने सुरु असूनही
क्षण-क्षणाला मरताना
आठवणीच्या सरणावर रोज जळताना

कसे पाहशील तू .....?
मी पहिले आहे
तू मला सोडून जाताना
प्रेम..माझे अधुरे राहताना .