तु अजून किती रागावणार...!

तु अजून किती रागावणार...!


प्रेम करणारेही खुप आहेत
त्यात मी तर कुठेही नसणार
जरी नसलो तरी फक्त
तुझा अन तुझाच राहणार
तु अजून किती रागावणार...!!1!!

तु आता नाहीस तरी
तुला मी मनात पाहतो
तुझी प्रत्येक आठवण
रोज रोज आठवतो
तु नाही आठवले तरी
मी तुला आठवणार
तु अजून किती रागावणार...!!2!!

कधी कधी असे वाटते
तुझ्याकडे यावे
तुझ्याकडे पाहात पाहात
तुझेच होऊन राहावे
माझ्या मनीचे हे स्वप्न 
कधी पूर्ण होणार
तु अजून किती रागावणार...!!3!!

आता अजून रागाऊ नकोस
माझाही अंत पाहू नकोस
आता जर तु नाही बोललीस तर???
आता जर तर नाही घेऊन बसणार
सरळ बोलायला लागणार
सरळ बोलायला लागणार...!!4!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: