तुझ्या रंगू दे.....

तुझ्या रंगू दे.....


तुझ्या हृदयात मला
घट्ट सामावून घे

उबदार मिठीत या
आज मला वाहवून ने

आलिंगनाची साथ
अशीच काही काळ राहू दे

पाणावलेले आहेत डोळे
तुझ्या ओठात विरून दे

श्वासात जडलाय ध्यास असा
कि या क्षणीच तू जवळ घे

हातात हात देऊन
थोडस सावरून घे

रोमांचकारी क्षणात
आज मला हरवू दे

नको ना अस जाउस निघून
बाहूत तुझ्या रंगू दे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: