अस का प्रेम असत.......
सांगुन ही न सांगितलेलं
कळून ही न कळलेलं
लिहून हीन लिहिलेलं
अन् बोलून हि न बोललेलं
अस का प्रेम असत.....?
जागून ही मेलेलं
फुलासारखं उमलून ही कोमेजलेलं
हाक देऊन ही साध न देणारं
अन् जवळ असून ही आपलं नासणार
अस का प्रेम असत......?
आठवणीत असणांर
आश्रू मध्ये दिसणारं
दिवस रात्र सतावणार
एकेकाळी डोळ्यात दिसणारं
अन् आता मनातही नासणार
अस का प्रेम असत.......?
प्रेम करून हि आपलं नासणार
आपल्या पासून खूप दूर गेलेलं
अन् ते परत येईल आपल्याकडे
ह्याचीच वाट पाहण्यात आता संपूर्ण आयुष्य गेलेलं
अस का प्रेम असत.........?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा