मी मात्र इथेच असेन....

मी मात्र इथेच असेन....


रहा नेहमी सुखाच्या घरातच तू,

दूर या दुखांच्या बाजारातून….

मी मात्र इथेच असेन…..

अलवार गुलाब-कळ्यांच,

असेल तुझ राज्य….

आणि बोचणाऱ्या काट्यांच,

माझच असेल साम्राज्य….

या काट्यांच्या साम्राज्यात,

घायाळ नि रक्तबंबाळ….

मी मात्र इथेच असेन….

असेल तुझा प्रत्येक क्षण सुंदर,

अन सुखांनीच थाटलेला…..

सभोवती असेल माझ्या,

फक्त अंधारच दाटलेला….

काळोखाच्या त्या वेलींनी वेढलेला….

मी मात्र इथेच असेन….

आठवण येईल कधी माझी,

होईल इच्छा मनाची,

वळून पाहण्याची,

मी मात्र इथेच असेन…

मी मात्र इथेच असेन....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: