मी तुझा ...
मी तुझा ...
अजून नाते नाजूक आहे
अजून हळव्या भेटी गाठी
मी तुझा श्वास होऊनी
जगतो आहे तुझ्याच साठी
प्रीत गहिरी रंग गहिरा
भाव बोलका थांग गहिरा
गहिरे इतूके नयन तुझे
गूढ कळेना जसे मीनाक्षी
तीन अक्षर मनात लिहिले
हृदयाची रंगली पाटी
अजून नाते नाजूक आहे
अजून हळव्या भेटी गाठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा