हो गं फक्त तू..........!!

हो गं फक्त तू..........!!


दिसली होतीस फेसबुकवर, 
एकदा मस्त स्माईल देताना, 
तेव्हा बसली होतीस, 
माझ्या मनात कुणी नसताना..... 

हो गं फक्त तू...!! 

झाली होती आपली ओळख, 
पेजवर चँटीग करताना, 
मैत्री अन् भेटी तु म्हणाली, 
मला भेट उद्या येताना..... 

हो गं फक्त तू...!! 

वाटले नव्हते असे काही, 
आपले प्रेमबंधन जुळताना, 
क्षणात बरसले होते आभाळ, 
तुला गोड लाजून पाहताना..... 

हो गं फक्त तू...!! 

बंद झाल्या आपल्या भेटी, 
दोघेही आपण भांडताना, 
अगदी वादळ शांत झाल्यावर वाटतं ना, 
तसं झालं बघ तुला भेटताना..... 

हो गं फक्त तू...!! 

एकदा विश्वास उडाला तुझा, 
कुणीतरी आपल्या दोघात चुघली लावताना, 
होऊन गेलीस क्षणात परखी, 
मला मी तुझा असताना..... 

हो गं फक्त तू...!! 

खुप काही गमावलं मी, 
तुझ्याशी नातं जोडताना, 
किती प्रेम अन् किती विनवण्या केल्या, 
तुला माझी चुक नसताना..... 

हो गं फक्त तू...!! 

केलस कायमच दूर मला, 
तुझा स्वतःवर विश्वास असताना, 
नको होती मला दुसरी कुणी, 
तू माझी पहिली झाली असताना..... 

हो गं फक्त तू...!! 

मिटले असते नसलेले वाद सगळे, 
प्रेमाने मला साँरी म्हणताना, 
केलं तुझ्यावर प्रेम मी, 
अगदीचं तुझं माझ्यावर नसताना..... 

हो गं फक्त तू...!! 

आता खुप एकटा झालोय, 
मी तु माझ्या आयुष्यात नसताना, 
मृगजळ झाली आहेस आजही, 
तू माझ्यासाठी बनलेली नसताना..... 

हो गं फक्त तू...!!.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: