मी आजही मिस करतोय ..........

मी आजही मिस करतोय ..........


मी आजही मिस करतोय ..........

ते दिवस, ते क्षण, तुझे बोलणे,

एखाद्या छोट्याश्या गोष्टीवरून होणारे भांडण,

मी आजही मिस करतोय ..........

ते रात्रभर विनाकारण जागणे,

उशिरा रात्रभर फोनवरचे बोलणे,

तुझ्या msg अनी call ची वाट बघणे,

मी आजही मिस करतोय ..........

तुझा तो romantic msg, 

तो msg वाचाल्यानंतरचे माझे स्मित हास्य,

आणि सुंदर अशा स्वप्नात जाणे ,

मी आजही मिस करतोय ..........

तुझा भेटण्यासाठीचा होणारा होकार ,

तु भेटायला येणार म्हणून ते लवकर उठणे,

तुला वाट बघायला लागू नये म्हणून तुझ्या आधी हजर राहणे,

भेटल्यावर दिलेली ती smile,

मी आजही मिस करतोय ..........

माझ्यासाठी स्वतःच्या मित्रांशी भांडणारी,

मला छेडण्यासाठी मुद्दाम माझ्या मैत्रिणींचा विषय काढणारी,

माझ्या चुका दाखवणारी, चुकांवर पांघरून घालणारी प्राज, 

मी आजही मिस करतोय ..........

तुझ्यासाठी रडणारा हा दिप आजही तुला खूप मिस करतोय ..............