हरवले मन माझे भान माझे






होती सकाळ त्या वेड्या पाखरांची 
तृणावरील पाचुसम दवबिंदाची 
रोपट्यांहून धावणाऱ्या थंड वाऱ्याची 
आंब्याच्या पानांत दडणाऱ्या किरणांची 

होती सकाळ का इतकी मोहक 
लवुनि वेली त्या होत्या पाहत 
डागाविना उगवला चंद्र दिवसात 
किरणांहून कोवळे रूप भरले मनात… 

राहिली मनात लागून हुरहूर 
उजळल्या दाही दिशा दूरदूर 
पडता ध्वनी तिचा कानी मधुर 
फिके वाटू लागले आता सप्तसूर 

हरवले मन माझे भान माझे 
गालावरच्या खळीत तिच्या 
जगही वाटू लागले सानुले 
काळ्याभोर डोळ्यात तिच्या…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: