काय आपलं नातं.....?
"काय आपलं नातं?"
....मन प्रश्नात पडलं, खुप खूप शोधलं
...उत्तर जाणे कुठे दडलं?
तुला "मैत्रीण" म्हणालो...तर गर्दीत जाशील,
तुला "प्रेयसी" म्हणालो...तर स्वप्न पाहशील.
मैत्री आणि प्रेमामध्ये किती छोटी जागा असते?
पण काहींचे गाव त्या इवल्याशा जागेत असते.
शब्दात नातं मांडणं दरवेळी गरजेचेच आहे का?
निनावी नात्यात वाटणारी काळजी खोटी असते का?
नात्याचं नाव येताना सोबत बंधनं घेऊन येतं,...
पर्याय न देता दोघांमधलं अंतर आधीच ठरवून येतं...
तुझ्या स्पर्शाची अपेक्षा नाही ग मला,
पण तुझ्या हसण्याची मात्र जरूर आहे...
एकमेकांना असेच सावरूया ना आपण?
यासाठी नात्याला नावाची काय गरज आहे?
इतकंच सांगेन...
तुझं असणं हे माझ्या असण्यासाठी गरजेचं आहे,..
आणि तुझं नसणं हेच कारण माझ्या
नसण्यासाठी पुरेसं आहे...!!!
