त्याच्यासाठी जगले मी......!

त्याच्यासाठी जगले मी......!


त्याच्यासाठी जगले मी
त्याच्यावर प्रेम केले मी
स्वतापेक्षाही जास्तच त्याला जपले मी
प्रेम करते हि कबुली केली मी
तसा तो ही प्रेम करायचा
म्हणून तर माझी काळजी करायचा
हिम्मत करून पुढे पाऊल टाकले
नकारात उत्तरे देऊन त्याने मला स्वीकारले
पण............. ..
त्याला घरच्यांची काळजी होती
समाजाच्या काळजीत तो कुठेतरी अडकत होता
काय म्हणेल हे जग?
काय म्हणतील आई- बाप?
आपली जात आहे वेगळी
हा विचार त्याला दूर न्यायचा
प्रेम तर जात आणि रूप पाहत नसत
हे त्याला समजले नाही
जातीच्या नावावर तो मला सोडत होता
त्याला काय माहित तो स्वतालाच विसरत होता
प्रेम म्हणजे अबोल नाते असते
ज्याचे शब्द न शब्द हे आपणच लिहित
असतो..