आज मी तुला पाहिलं...!
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
आज तुझा फोटो पाहतना
त्यात स्वतःला हरवलं
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
इतके दिवस मी तुझ्याशी बोललो
इतके दिवस मी तुला ऐकल
पण आज प्रथमच हृदयातून ऐकल
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
आज तुला पाहताना
मला एक जाणवल
इतके दिवस मी बेचैन होतो
त्याचे कारण आज मला उमगल
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं..
मला कळत नव्हते
कोण तु अन कोण मी
पण आज सारे स्वप्न उलगडल
जे सत्य आहे तेच आज मला दिसलं
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
आज मला समजली
माझ्या हृदयाची भाषा
मला समजली
तुझ्याविना माझी दशा
मला समजले मैत्रीच्या पुढचे काही
मला समजले माझे असे वागणे
मला समजले फक्त तुलाच आठवणे
आज मी तुला माझ्या
आत्म्यातून ओळखल
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
आज असे वाटते की
मी तुझ्यापासून वेगळा नाही
आज असे वाटले की
तु तु नाही मी मी नाही
आज असे वाटले की
आताच तुझ्याकडे यावे
तुझ्याकडे येऊन
तुझेच बनून जावे
तुझेच बनून जावे..