जीवन एक कोडे आहे...!
जीवन एक कोडे आहे
न सुटणारे न उलगडणारे ।
जीवन एक फूल आहे
दुःख स्पर्शाने मलूल होणारे ।
जीवन हे धूप आहे
क्षणा क्षणाला कणा कणाने झिजणारे ।
जीवन हे मेण आहे
कष्टाच्या आचेने वितळणारे ।
जीवन हे प्रेम आहे
क्षण भंगूर -ठरणारे ।
व्यवहाराची झळ लागताच
विरघळून -विरून जाणारे ।
जीवन हे स्वप्न आहे
कधी साकार न होणारे ।
जाग येतांच विरून जाउन
नेत्रांची जळजळ करणारे ।
जीवन हे आभाळ आहे
कधीं गवसणी न बसणारे ।
क्षितीजासारखे कायम
दूर दूर पळणारे.......!!