कि तुला सर्व माफ आहे.....!

कि तुला सर्व माफ आहे.....!


तू माझ्याशी नाही बोललीस
मला दुख होणार नाही
तू माझ्याशी नाही हसलीस
मला राग येणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू नाही दिलास reply
मला काही वाटणार नाही
तू नाही उचललास phone
मला यातना होणार नाहीत
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू विसरलीस मला
मी तुला विसरणार नाही
तू रडविलेस जरी मला
तरीही मी रडणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू सोडून गेलीस मला
तरी मी वाट पाहणार
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
कि तुला सर्व माफ आहे...