दूर जाताना एकदा तुला,शेवटचं पहायचं होतं.....

दूर जाताना एकदा तुला,शेवटचं पहायचं होतं.....


दूर जाताना एकदा तुला,

शेवटचं पहायचं होतं.....

मन भरून कायमचं तुला,

मनात भरायच होतं.....

तीळ तीळ तुटत होत मन माझं,

संपवावं आयुष्य असं वाटतं होतं.....

जग संपल होतं तुझ्या विरहाने,

संपुर्ण घरटं उध्वस्त झालं

होतं.....

तरीही फक्त एकदा,

तुला सुखी पहायचं होतं.....

फक्त तुला सुखी पहायचं होत..