जीवन....!
भरभरून ओसंडून वाहणारा
उत्साह असतो तारुण्य
जादूमय प्रवास आनंदाचा
अन शारीरिक, मानसिक बदलाचा……
होई आक्रमण या काळात
मनावरी अनेक नव्या
जुन्या विचारांचा…….
ना कळे योग्य - अयोग्य
ना ओळखता येई धोके
डावपेच ना येई लक्षात……
सोसावे लागे दुष्परिणामाचे
चटके घेताच जरा निर्णय चुकीचा
अन उठे मनात वादळ वाईट विचारांचे……
येई अडचणीत नाव, भविष्य,
चरित्र, कुटुंब पतप्रतिष्ठा
मिळे धुळीस सारे………
होई जगणे कठीण ऐसे कि,
छळवादही समाजाचा करी
प्रवृत्त आत्महत्येस……….
