प्रेम.....!


प्रेम.....!

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेड करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं.
असेच हे प्रेम मिळत .....

तुझं हसणं बोलणं.....!


तुझं हसणं बोलणं.....!

तुझं हसणं बोलणं वावरणं
आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं
मोहवितं मला
काय हरकत आहे...?

हो, मी पाहतो स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाट्त मला
काय हरकत आहे...?

माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला "तशी" स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..मग काय हरकत आहे?

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?

आज तिला सांगायचं.....!


आज तिला सांगायचं.....!

खूप दिवसापासून
तिला भेटायच आहे ..
तिच्याशी मनातल बोलायचं आहे
मन म्हणतय आज....
की भेटायचं
मनातलं..सगळं..अगदी सगळं..
आज तिला सांगायचं

तिच्या मिठीत शिरायचं आहे
तिच्या सोबत मनसोक्त हसायचं आहे
तिच्या चेह-यावर ढळणा-या बटेला ..
बोटांनी दुर सावरायचं आहे ...
मन म्हणतय आज....
की भेटायचं
मनातलं..सगळं..अगदी सगळं..
आज तिला सांगायचं

अगदी सहजच...
तिच्या त्या बोलक्या डोळ्यांत
हरवायचं आहे
अगदी सहजच...
तिही लाजेल थोडीशी
तिला गोड लाजताना पहायचं आहे ...
अगदी उगाच
मन म्हणतय आज....
की भेटायचं
मनातलं..सगळं..अगदी सगळं..
आज तिला सांगायचं

अशीच एक मुलगी.....!


अशीच एक मुलगी.....!

अशीच एक मुलगी... साधारण शी सजणारी..
आणि हळुवार लाजणारी.. गोजिरी दिसणारी..

आणि खूप गोड हसणारी... अशीच एक मुलगी..

काल स्वप्ना मधी दिसली.. आणि मला बघून हसली..
कोण जाने कशी माझ्या स्वप्नात घुसली..

आणि माझ्या हृदयात घर करून बसली..
गुलाब सारखे लाल ओठ.. सागरा सारखे डोळे..
... तिचे केस..वेली सारखे लांब आणि नभा सारखे काळे तिला मी ब...

घितलं श्वेत फुलांच्या वनात.. अन पूर्ण साठवल माझ्या मनात.. तिच्या पैन्जानीचा आवाज आणखी पण तसाच कानात गुंजतो..

आणि सांगतो.आहे .मी तुझीच आहे.!!

मी तुझीच आहे..

पण कुणीतरी माझी चादर ओढली.. आणि माझी साखर झोप मोडली..
परत कधी येशील ग प्रिये.स्वप्नात..

आता फक्त तूच आहेस या वेड्या मनात..

मैत्री....!!!


मैत्री....!!!

मैत्री ही एक समूद्राला जोड़नाऱ्या दोन किनाऱ्यासारखी आसते

ती कधी ही तुटू शकत नाही ..... 

मैत्री ही एक गुंतलेल्या धाग्यासारखी आसते

तिला कितीही अलग करायला गेल तरी ती जास्तच गुंतत जाते पण

तुटत नाही ....

मैत्री ही ताऱ्यासारखी आसते

तिला विसरली तरी ती आठवणीच्या रुपात भेटते ....

मैत्री ही निसर्गासारखी आसते

ती सगळ्याबरोबर सतत निर्मळ आणि स्वच्छ सुधंर आस नात

टिकवायला शिकवते ....

मैत्री ही फुलासारखी आसते

ती सगळ्याना सुगंधी सुवासाप्रमाने मैत्री करायला शिकवते ....

मला ते दिवस हवे आहेत .....


मला ते दिवस हवे आहेत .....

सकाळी सकाळी उठून शाळेत जायचे ...
बाईंचा धडा अन गृहपाठ ..
सरांची छडी अन शाळेचा डब्बा ..
... यातच सारा दिवस जायचा ..
मला ते दिवस हवे आहेत ....

दिवसभर चिंचा ,कैऱ्या पाडत उनाडक्या करायच्या ...
कधी दिवसभर क्रिकेट खेळून हात पाय दुखायचे ..
आईकडे Icecream साठी हट्ट करायचा ...
अन बाबांनी तो क्षणात पुरवायचा ...
मला ते दिवस हवे आहेत ....

पावसात नाचायचे अन चिखलात खेळायचे ..
निखळ हसायचे अन मनोसक्त रडायचे ...
मित्रांची निर्मळ मैत्री असायची
कदाचित ती स्वार्थी नसायची ...
मला ते दिवस हवे आहेत ....

एकत्र खेळण्यात मजा असायची..
मी तू मी भांडण्यात गंमत असायची
वाढदिवसाला cake आणून पार्टी व्हायची ...
अन मित्रांची ती वाक्य आपली दोस्ती कधी न तुटायची ..
मला ते दिवस हवे आहेत ... .

आयुष्य जगण्यात खरा आनंद वाटायचा ,
प्रत्येक दिवस नवीन सुख आणायचा ...
माझ्या लाडिक बोलण्याचे सर्वाना कौतुक असायचे ..
आणि माझ्या हुशारीचे बक्षीस मिळायचे ..
मला ते दिवस हवे आहेत ....

आई बाबा ताई फक्त यांचामध्ये जीवन गुरफटलेले असायचे
प्रेम म्हणजे काय ते फक्त त्यांचाकडूनच कळायचे .

मी आणि तिची मैत्री .......!!!!


मी आणि तिची मैत्री .......!!!!

अपेक्षा ठेवली होती मी आपलेपणाची 
पण आज तिने मैत्रीतून दूर लोटलं
का कोणास ठाऊक आज 
एक निखळ मैत्रीच नात आज कायमच तुटल .

सुरुवात होती मस्करीची पण तिला वादाची वाट मिळाली 
काय सांगू मित्रांनो आज माझी अन तिची कायमची मैत्री तुटली 

तिच्या मैत्रीतले दिवस अजूनही आठवतात
बस आता त्या आठवणी राहणार
श्रावणातल्या पावसात जसा गारवा असतो
तसा गारवा मला तिच्या मैत्रीत मिळायचा
पण आज तो गारवा नाहीसा झाला तिच्याशी बोलताना हृदय हेलावत
पण माझ मन तिच्यसाठी झुरत
आता या वागण्याला काय अर्थ
कारण तिच्या मैत्रीशिवाय सगळाच व्यर्थ

माझ्या मनाची हि दुरवस्था झाली
काय सांगू मित्रांनो आज माझी अन तिची
मैत्री कायमची तुटली ...........