सुचना ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत . जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे . ...
मी आणि तिची मैत्री .......!!!!
मी आणि तिची मैत्री .......!!!!
अपेक्षा ठेवली होती मी आपलेपणाची
पण आज तिने मैत्रीतून दूर लोटलं
का कोणास ठाऊक आज
एक निखळ मैत्रीच नात आज कायमच तुटल .
सुरुवात होती मस्करीची पण तिला वादाची वाट मिळाली
काय सांगू मित्रांनो आज माझी अन तिची कायमची मैत्री तुटली
तिच्या मैत्रीतले दिवस अजूनही आठवतात
बस आता त्या आठवणी राहणार
श्रावणातल्या पावसात जसा गारवा असतो
तसा गारवा मला तिच्या मैत्रीत मिळायचा
पण आज तो गारवा नाहीसा झाला तिच्याशी बोलताना हृदय हेलावत
पण माझ मन तिच्यसाठी झुरत
आता या वागण्याला काय अर्थ
कारण तिच्या मैत्रीशिवाय सगळाच व्यर्थ
माझ्या मनाची हि दुरवस्था झाली
काय सांगू मित्रांनो आज माझी अन तिची
मैत्री कायमची तुटली ...........
तुझी गोड छबी
तुझी गोड छबी
माझ्या डोळ्यांना भावली
मी सूर्य तुझा
तू माझी सावली
तू जिथे जिथे जाशील
तुझ्या पाठी मी येईन
प्राण गेले तरी
तुझ्या डोळ्यात छबी बनून मी राहीन.....!!
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रुदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी
डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे
स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे
कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपनास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी
आणि त्याची वात बघता बघता
आपलीच वाट दीशाहीन व्हावी
कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठांतुनही मग
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत
कुणाला इतकीही माझी म्हनू नये
की त्याचे मीपण आपन विसरून जावे
त्या संभ्रमात त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे
पण.........
कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे
दूर दूर आवाज दिला तरी
आपले शब्द जागीच घूमवेत
आपले शब्द जागीच घूमवेत...............





