तुझ्या डोळ्यात छबी बनून मी राहीन.....!!

तुझ्या डोळ्यात छबी बनून मी राहीन.....!!


तुझी गोड छबी

माझ्या डोळ्यांना भावली 

मी सूर्य तुझा 

तू माझी सावली 

तू जिथे जिथे जाशील 

तुझ्या पाठी मी येईन 

प्राण गेले तरी 

तुझ्या डोळ्यात छबी बनून मी राहीन.....!!

एकदा येऊन जा......

एकदा येऊन जा......

कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना
आणखी काही दिवस माझ्या नावे करून जा
एकदा येऊन जा......

स्वप्न बघण्याची भीती वाटतेय आता
कारण त्या स्वप्नात तू नाहीस
स्वप्नात का होईना 
एकदा येऊन जा......

हात रिकामा भासतोय मला
कारण हातामध्ये तुझा हात नाही
त्या स्पर्शामधले शहारे एकवार देऊन जा
एकदा येऊन जा.......

बंधनांच्या गर्दीत हरवून गेलीस तू त्या गर्दीत
भिरभिरल्या डोळ्यांनी शोधतोय तुला
त्या नजरेला तुझ्या दिसण्याचा आभास का होईना देऊन जा
एकदा येऊन जा ........

तुझ्या असण्याची इतकी सवय झाली होती
तू नाहीस हे आता मन मान्यच करत नाही
एकदा फक्त येऊन जा ........

त्या वेड्या मनाला हे समजावून जा ...
फक्त एकदा येऊन जा.........

जीवन....!

जीवन....!

भरभरून ओसंडून वाहणारा 
उत्साह असतो तारुण्य 
जादूमय प्रवास आनंदाचा 
अन शारीरिक, मानसिक बदलाचा…… 

होई आक्रमण या काळात 
मनावरी अनेक नव्या 
जुन्या विचारांचा……. 

ना कळे योग्य - अयोग्य 
ना ओळखता येई धोके 
डावपेच ना येई लक्षात……

सोसावे लागे दुष्परिणामाचे 
चटके घेताच जरा निर्णय चुकीचा 
अन उठे मनात वादळ वाईट विचारांचे…… 

येई अडचणीत नाव, भविष्य, 
चरित्र, कुटुंब पतप्रतिष्ठा 
मिळे धुळीस सारे……… 

होई जगणे कठीण ऐसे कि,
छळवादही समाजाचा करी 
प्रवृत्त आत्महत्येस……….

स्पर्श तो तुझा...!

स्पर्श तो तुझा....!


स्पर्श तो तुझा मोहीत करतो 

मला गंध तो

तुझा बेभान पावसात भिजवतो 

मला भुरळ पडते डोळ्यावर जाते 

मी क्षितिजावर बेधुंद हे 

माझे मन पळत सुटते 

गगनावर प्रीतीच्या त्या क्षणांची

गुंफण घालून ठेऊया या प्रेमाच्या आठवणी

मनात जपून ठेऊया तू आणि मी विश्व सगळ तिथेच थांबव

समुद्राच्या या पाण्यात आपण खूप खूप भिजावं

प्रेम कशाला म्हणतात कळण कठीण आहे

आपली ही मन वेगळी कुठे आहेत

का कळत नाही की दिवस लहान पडतो

कळूदेत या जगाला की आम्ही प्रेम करतो..♥♥

तुझ्या रंगू दे.....

तुझ्या रंगू दे.....


तुझ्या हृदयात मला
घट्ट सामावून घे

उबदार मिठीत या
आज मला वाहवून ने

आलिंगनाची साथ
अशीच काही काळ राहू दे

पाणावलेले आहेत डोळे
तुझ्या ओठात विरून दे

श्वासात जडलाय ध्यास असा
कि या क्षणीच तू जवळ घे

हातात हात देऊन
थोडस सावरून घे

रोमांचकारी क्षणात
आज मला हरवू दे

नको ना अस जाउस निघून
बाहूत तुझ्या रंगू दे.....

खरच खुप चांगला होता...

खरच खुप चांगला होता...

कधी वाटत कि,

आपण उगाचच मोठे झालो. 

कारण तुटलेली मनं आणि 

अपुरी स्वप्नं

यापेक्षा तुटलेली खेळणी

आणि अपुरा गृहपाठ 

खरच खुप चांगला होता...

टाइम पास.........!

टाइम पास........!

तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये मी प्रेमाचा फॉर्म भरला,
मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द केला..
.
शेवटचा प्रयत्न म्हणून मी
तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला,
तर तू तुझ्या हृदयावर No vaccancy
चा बोर्ड लावला...
.
अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलर addmision
मागत होतो,
तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत external म्हणून
बसलो असतो...
.
Addmision नाही निदान Campus मधे तरी येऊ दे,
तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू दे..... ♥♥

स्वप्न...!

स्वप्न...!

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात

ती फक्त पहायची असतात...

कधी कधी त्यात रंग भरायचे असतात

पण स्वप्न पुर्ण झालं नाही...

तर रडायचं नसतं रंग उडाले

म्हणुन चित्र फाडायचं नसतं...

फक्त लक्षात ठेवायच असतं

सर्वच काही आपल नसतं...

आपल्या दुःखात (कदाचित)

दुसऱ्याच सुख असतं.....

त्या आठवणी असतात ...

त्या आठवणी असतात ...


काही आठवणी आशा असतात ..

ज्या कधी विसरायच्या नसतात..

रबाराने त्या खोड़ता येत नाहित ..

कारण हाताने त्या लिहिलेल्या नसतात ......

जन्मभर राहतात त्या हृदयाच्या एक कोपरात ..

सुखदू:खात सांगड़ घालतात ..

परत त्या तशा कधी घडणार नसतात ..

म्हणून तर 

त्या आठवणी असतात ...

हो गं फक्त तू..........!!

हो गं फक्त तू..........!!


दिसली होतीस फेसबुकवर, 
एकदा मस्त स्माईल देताना, 
तेव्हा बसली होतीस, 
माझ्या मनात कुणी नसताना..... 

हो गं फक्त तू...!! 

झाली होती आपली ओळख, 
पेजवर चँटीग करताना, 
मैत्री अन् भेटी तु म्हणाली, 
मला भेट उद्या येताना..... 

हो गं फक्त तू...!! 

वाटले नव्हते असे काही, 
आपले प्रेमबंधन जुळताना, 
क्षणात बरसले होते आभाळ, 
तुला गोड लाजून पाहताना..... 

हो गं फक्त तू...!! 

बंद झाल्या आपल्या भेटी, 
दोघेही आपण भांडताना, 
अगदी वादळ शांत झाल्यावर वाटतं ना, 
तसं झालं बघ तुला भेटताना..... 

हो गं फक्त तू...!! 

एकदा विश्वास उडाला तुझा, 
कुणीतरी आपल्या दोघात चुघली लावताना, 
होऊन गेलीस क्षणात परखी, 
मला मी तुझा असताना..... 

हो गं फक्त तू...!! 

खुप काही गमावलं मी, 
तुझ्याशी नातं जोडताना, 
किती प्रेम अन् किती विनवण्या केल्या, 
तुला माझी चुक नसताना..... 

हो गं फक्त तू...!! 

केलस कायमच दूर मला, 
तुझा स्वतःवर विश्वास असताना, 
नको होती मला दुसरी कुणी, 
तू माझी पहिली झाली असताना..... 

हो गं फक्त तू...!! 

मिटले असते नसलेले वाद सगळे, 
प्रेमाने मला साँरी म्हणताना, 
केलं तुझ्यावर प्रेम मी, 
अगदीचं तुझं माझ्यावर नसताना..... 

हो गं फक्त तू...!! 

आता खुप एकटा झालोय, 
मी तु माझ्या आयुष्यात नसताना, 
मृगजळ झाली आहेस आजही, 
तू माझ्यासाठी बनलेली नसताना..... 

हो गं फक्त तू...!!.........

जगातील दोन कठीण कामे---

जगातील दोन कठीण कामे---

(1) आपल्या डोक्यातील
विचार दुस-याच्या डोक्यात
उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील
पैसा आपल्या खिशात
आणणे.
* पहिल्या कामात हुशार
त्याला 'शिक्षक' म्हणतात.
* दुस-या कामात हुशार
त्याला 'व्यापारी' म्हणतात.
* आणि दोन्ही कामात
हुशार तिला 'बायको'
म्हणतात...

इच्छा.....

इच्छा.....

खूप दिवस जाले आहेत आता आपले नाते संपून
अशीच खूप महिने अन वर्ष हि जातील
पण या आठवणी का संपत नाहीत.

का या आठवणी रोज रोज येत राहतात
त्या येताना एकट्या हि नाही येत
येताना अश्रू हि सोबत घेवून येतात

विसरली असशील तू मला
अन विचार करत असशील मी हि तुला विसरलो असेन
पण खरच मी नाही विसरलो

रोज त्याच आठवणी जगताना
रोज तेच अश्रू रडताना
मी खरच नाही कंटाळलो.

हे आयुष तुलाच दिले होते
आणि तू का अशी वागली
हेच कधी कळले नव्हते..

तू परत नाही येणार हे नक्की आहे
पण तू आनंदी रहावी हीच इच्छा आहे.

नकळत हरवले ह्रदय माझे

नकळत हरवले ह्रदय माझे


नकळत हरवले ह्रदय माझे,
लागला माझ्या मनाला तुझा लळा.....
* * * * * * * * * *
येता जाता जाता येता,
नजरेने करतोस इशारा.....
* * * * * * * * * *
लपून छपून नको पाहूस,
भिडू दे डोळ्याला डोळा.....
* * * * * * * * * *
मनातले गुपित उघड जरा,
भरु दे नजरेशी नजरेची शाळा.....
* * * * * * * * * *
ये जवळ मिठीत घे मला,
लागू दे ओठांनी ओठावर प्रेमाचा टिळा.....
* * * * * * * * * *

a