तिने कित्ती सुंदर दिसावं.....!

तिने कित्ती सुंदर दिसावं....!


जसं गुलाबाचं फूल उमलावं..

कोणाच्याही नजरेत भरावं..

तासन तास पाहत रहावं..!!!!



तिने कित्ती गोड बोलावं..

ऐकणाऱ्याने विरघळून जावं..

हरवूनच जावं ..

सोबत तिच्या..!!!!



तिने कित्ती साधं रहावं ..

त्यातही रूप तिचं खुलावं..

कोणीही फिदा व्हाव ..

अदांवर तिच्या..!!!!



तिचं उदास होणं..

कसं हृदयाला भिडावं..

कोणालाही वाईट वाटावं..

अश्रूंनी तिच्या..!!!!



तिचं हसणं ..

कोणालाही सुखवावं..

कोणीही घसरून पडावं..

गालावरल्या खळीत तिच्या..!!!!



तिच्या नजरेने मलाच शोधावं..

अचानक नजरेने नजरेला भिडावं ..

मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..

लाजेने चूर चूर व्हावं..!!!!



ती समोर असताना ...

मी सारं काही विसरावं..

तिने इश्य करत लाजावं..

मी 'आये हाये' करत घायाळ व्हावं ..!!!!



तिने फक्त माझंच रहावं..

मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..

साथ देऊ जन्मोजन्मी ..

विरहाचं दुख कधीही न यावं..

कधीतरी वाटते घार बनुन आकाशात उंच् उडावे....!

कधीतरी वाटते घार बनुन आकाशात उंच् उडावे....!

कधीतरी वाटते घार बनुन
आकाशात उंच् उडावे..
तर कधीतरी वाटते फ़ुलपाखरु बनुन
हळुच फ़ुलांवर बसावे..

कधीतरी वाटते लहान बाळ बनुन
हवी ती गोष्ट मागावी..
तर कधीतरी वाटते पाणी बनुन
तहाणल्याची तहाण भागवावी..

कधीतरी वाटते तारे बणुन
रात्रभर लुकलुकत रहावे..
तर कधीतरी वाटते चातक बनुन
पावसाची वाट पाहत बसावे..

कधीतरी वाटते SMS बनुन
तुझ्या INBOX मधेच रहावे..
तर कधीतरी वाटते तुझे मेल उघडुन
सारखे वाचत बसावे..

कधीतरी वाटते मेहं्दी बनुन
तुझ्या हातावर रेखाटुन रहावे..
तर कधीतरी वाटते मोर बनुन
पावसात नाचत बसावे...

एक दिवस असाच

एक दिवस असाच...

एक दिवस असाच 
एकांतात बसलो |
बघता बघता अचानक 
आठवनींत फसलो |

सर्वात पहिल आठवल
ते माझ सुंदर बालपन |
संसकाराचे बाळकडू घेताना
मीळालेलं शहानपन |

शाळेत जायला लागलो
तेव्हाचे ते बोबडे बोल |
आजूनहि आठवतात
जसे हृदयात दडलेत खोल |

बघता बघता शाळेच्या
इयत्ता बदलत गेल्या |
मूले सगळी तीच
पण बाई बदलत गेल्या |

मग खरा सुरू झाला
भविष्याचा खेळ |
दहाविच्या आभ्यासात
विरगळुन गेला वेळ |

कॉलेजमद्दे गेलो तेव्हा
नविन मीञ बनले |
मीञांच्या गप्पांमद्दे
माझे ते दिवस सरले |

कॉलेजमद्दे एकदा
प्रितीची लाट उसळली |
तीची माझी पहिलीच
भेट प्रेमामद्दे मीसळली |

पुस्तकाप्रमाने हळु हळु
सारेच पलटून गेले |
जसे एखादे फुलपाखरू
हातात रंग ठेवून गेले |

ती............!!!!

......ती......

समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.

चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.

आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.

कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.

हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.

नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी.

सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.

लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.

ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.

सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.

बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.

परत आल्यावर हसतानाही.............

एक मुलगी मला आवडली............

एक मुलगी मला आवडली

कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना

कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच
ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला

अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली
आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास
मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून
गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून
तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन
मोकळे..

ति हलकेच
लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?

कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत
होतास तु…

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास
मिळवलास...

का तुझ्या प्रेमात पडलो..

का तुझ्या प्रेमात पडलो..

आज तुझ्यामुळे उगाचं का रडलो..

तु बोलली असती तर ?

जगाशीही असतो नडलो..

खुप त्रास दिला गं तु मला,

का गं असे केले तु माझ्यासोबत..

आता ठरवलं पुन्हा नाही लावाचा जिव
कुणावरं,

खुप दुःख होतं गं ह्रदयाला माझ्या..

हे कसं तुला नाही माहित पडलं..

का मैत्री केली मी तुझ्याशी,

का तुझ्या प्रेमात पडलो..

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना......

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना......

जशी रात्र चंद्राविना

जसा मानव भावनांविना

सांग तु माझीच ना

कसे जगावे तुझ्याविना

जसे झाड पानांविना

जसे फुल सुगंधाविना

सांग तु माझीच ना

कसे जगावे तुझ्याविना

जसा समुद्र पाण्याविना

जसा दिवस सुर्याविना

सांग तु माझीच ना

कसे जगावे तुझ्याविना

जशी बाग् फुलंविना

जसे आकश चांदण्यांविना

सांग तु माझीच ना

कसे जगावे तुझ्याविना

कसे जगावे तुझ्याविना.

आयुष्यात एक तरी गर्लफ्रेँन्ड असावी..

फोनवर बडबड करणारी,
वेडेवाकडे नाव म्हणनारी..
मिस काँल देऊन,
आपल्याला काँल करायला लावणारी..
अशी एक तरी गर्लफ्रेँन्ड असावी..

आपल्या फालतु जोकवर हसणारी,
आणि आपण रागावल्यावर मुळू मुळू रडणारी..
अशी एक तरी गर्लफ्रेँन्ड असावी..
चोरुन आपल्याला भेटायला येणारी,
आणि आल्यावर जाण्याची घाई करणारी..
अशी एक तरी गर्लफ्रेँन्ड असावी..

आपल्या डोळ्यांतले अश्रूं पाहुन रडणारी,
गालातल्या गालात लाजणारी..
आणि डोळ्यांतुन सरळ ह्रदयात उतरणारी..
अशी एक तरी गर्लफ्रेँन्ड असावी..
शी एक तरी गर्लफ्रेँन्ड असावी.....

" मैत्री".....

" मैत्री"..... 

रोजच् आठवण यावी असे काही नाही,

रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.

मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,

आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात


जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,

आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,

दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते

ति म्हणजे " मैत्री"......!!!! 

ती फक्त माझी असावी................

........ती फक्त माझी असावी..........

मनाला वाटते "ती फक्त माझी असावी"......
माझी आणि फक्त माझी असावी.....

जवळ नसते ती जेव्हा"मन हे वेडे ऐकत नाही"......
माझे "मन तिच्याविना कसे रमत नाही"...

मनाला वाटते "तिनेही माझ्यावर प्रेम करावे",
मनाला वाटते "हे पूर्ण जग तुझ्या सावली सारख आहे"...

मला "प्रेत्येक चेहऱ्यात तूच" आणि"तूच दिसतेस"
मनाला वाटते ती फक्त माझी असावी......

माझी आणि फक्त माझी असावी.....
मनाला वाटते "माझ्या जीवनात तीच माझी प्रियसी असावी"....

मनाला वाटते "ती फक्त माझी असावी"......
माझी आणि फक्त माझी असावी...... 

तुझ्याविना

तुझ्याविना

तुझे विरघळलेले आभास घेऊन,
रात्र जळत असते माझ्या पापण्यांवरती.....
आणि मी पण तुझ्या आठवांची चादर
पांघरून,
उगाच झोपी जाण्याचा प्रयत्न करत
असतो.....
दिवे मालवले तरी, निद्रा काही प्रसन्न
होत नाही....
झोपण्याचा प्रयत्न करूनही, झोप मात्र
येत नाही....
मग उठतो, आणि लिहायला बसतो...
तुझ्या सहवासातले क्षण, कागदावर
सांडतो...
तुझं दिसणं, बोलणं, लाजणं, चिडणं;
दिलखुलास हसताना मोहक दिसणं....
सगळंकाही शब्दात मांडून झाल्यावर,
पुन्हा मनभरून वाचुन घेतो....
आणि मग स्वतःचीच नजर लागू नये म्हणून,
अलगद तो कागद फाडून टाकतो...
मग हसतो माझ्यावरच,
आणि आरशासमोर जाऊन ठेंगा दाखवतो...
"कशी जिरवली तुझी!" म्हणून,
स्वतःलाच खिजवून पहातो...
शेवटी माझीच माफी मागतो,
आणि पुन्हा तुझ्या आठवणीत रमतो...
तुझ्याविना माझा एकांत,
अशाच वेडेपणात सरतो..

एप्रिल फूल

एप्रिल फूल

वर्षापूर्वी होतो मी, ब्रास बॅण्ड मालक, !
नावाजलो गेलो पुण्यात, करुनी मेहनत अथक !
लग्नस्थळी व्हायची सारी , मंडळी मंत्रमुग्ध !
दाटून कंठ वाजविता , वऱ्हाड अगदी स्तब्ध !

बहारो फुल बरसाओ, वाजविता गाणे !
कन्या कुमारीचे, असे प्रेमकौतुकाने पाहणे !
आज मेरे यार कि शादीला, हमखास वन्स मोर
लग्न म्हटले कि आलेच कि हो तेथे चित्त चोर

लग्नात एका सुंदरीने, पाडली भुरळ !
जावून भिडलो, तिजला बिनधास्त सरळ !
एका अन्गल ने तू दिसतेस रेखा
हिंदीतले गाणे, तुमसा नही देखा

केली स्तुती गाण्यातुनी,
सूर निघाले पियानोतुनी
उत्तरे तिन्हे दिली नाही काही
स्वप्न मात्र, मी रोज पाही

म्हणता म्हणता, वाढली मैत्री !
पडेल पुढे एक पाऊल, मनात खात्री !
माझ्या पियानो सुरांवर, होती फिदा !
नखरेल तिच्या, सांगत होत्या अदा !

मार्च एकतीसला , आला मेसेज
फेस वरील माझ्या , उजळले तेज !
आहे का तुला, भेटायला वेळ !
बटन ऑन हृदयात, प्रेमाचा खेळ !

जेन्ट्स पार्लरसी जावून, केला मेकओवर !
अंगी होता माझ्या १०५% लव्हफिवर !
भेटली एकदाची, गप्पा रंगल्या नाही खास
आजपासून म्हणते, सुरु होतोय नवीन मास

हळूच दिली पत्रिका, माझ्या हातात !
वाजवायचे म्हटली, तिच्या लग्नाची वरात
व्यवसायाला जागलो, वाजविली मस्त गाणी
नाचत होती पोरे, काळजाचे झाले पाणी

बजाते बजाते, धून निकल गई !
तू औरो कि क़्यो, हो गई !