एक दिवस असाच

एक दिवस असाच...

एक दिवस असाच 
एकांतात बसलो |
बघता बघता अचानक 
आठवनींत फसलो |

सर्वात पहिल आठवल
ते माझ सुंदर बालपन |
संसकाराचे बाळकडू घेताना
मीळालेलं शहानपन |

शाळेत जायला लागलो
तेव्हाचे ते बोबडे बोल |
आजूनहि आठवतात
जसे हृदयात दडलेत खोल |

बघता बघता शाळेच्या
इयत्ता बदलत गेल्या |
मूले सगळी तीच
पण बाई बदलत गेल्या |

मग खरा सुरू झाला
भविष्याचा खेळ |
दहाविच्या आभ्यासात
विरगळुन गेला वेळ |

कॉलेजमद्दे गेलो तेव्हा
नविन मीञ बनले |
मीञांच्या गप्पांमद्दे
माझे ते दिवस सरले |

कॉलेजमद्दे एकदा
प्रितीची लाट उसळली |
तीची माझी पहिलीच
भेट प्रेमामद्दे मीसळली |

पुस्तकाप्रमाने हळु हळु
सारेच पलटून गेले |
जसे एखादे फुलपाखरू
हातात रंग ठेवून गेले |

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: