मुले असतातच असे ....

मुले असतातच असे ....

मुले असतातच असे ....
मुले .........असतातच असे ....
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे...
-
मुले .........असतातच असे ....
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सततनिस्वार्थी प्रयत्नात असणारे...
-
मुले .........असतातच असे ....
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून तिलापुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...
-
खरच काही मुले .........असतातच असे ....
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम शोधणारे......

एकटेपणा

एकटेपणा 


एकटेपणा तेव्हा वाटत

नाही...

जेव्हा आपण एकटे

असतो ,

तर तो तेव्हा वाटतो...

जेव्हा आपल्या बरोबर

सर्व जण असतात ,

पण ती व्यक्ती नसते

जी आपल्याला आपल्या

बरोबर हवी असते..!!..

तुझी आठवण.....

तुझी आठवण.....


तुझी वाट पाहताना दिवस
संपतात...
पण वाट पाहणं संपत नाही...
आयुष्यावरील तुझी छाप पुसून
टाकणं...
मला अजूनही जमत नाही....
का तुझा सहवास दरवळत राहतो
आजही...???
का खोलवर
झालेल्या जखमा बुझता बुझाता..,
पुन्हा वाहायला लागतात... ?
का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत
राहते...?
का तुझी आठवण
नको असताना येतच. . . :((

साथ देईन तुझी शेवटपर्यंत ...

साथ देईन तुझी शेवटपर्यंत ...


साथ देईन तुझी शेवटपर्यंत ...

फक्त माझ्यावर विश्वास ठेव

सात जन्मच नाही माहित मला,

हा जन्म तुझ्यासाठी आहे...

फक्त माझ्यावर विश्वास ठेव

तुझ्या डोळ्यातील अश्रू नाहि

थांबवू शकलो तरी सलतात ती काळजात...

यावर विश्वास ठेव

जग हे माझ्याबद्दल काही हि सांगेनपण....

फक्त माझ्यावर विश्वास ठे

ज्याच्या खुणा आयुष्यभर मनावर राहतात....

ज्याच्या खुणा आयुष्यभर मनावर राहतात....


"जर कोणी तुमच्यावर दगडांचा वर्षाव केला 




तर तुम्ही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा



पण कोणी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तर




थोडावेळ थांबून नीट विचार करा



कारण दगडा पेक्षा प्रेमाच्या वेदना फार होतात




ज्याच्या खुणा आयुष्यभर मनावर राहतात "

शेवटचा निश्वास

शेवटचा निश्वास

संपला सारा खेळ् प्रेमाचा
उरले फ़क्त आठवणींचे अवशेष
दुर् गेल्या वाटा सुखाच्या
काहीच न राहीलेलं शेष

कधी केव्हा कुठे कसा
पण खुप जीवं लागला होता
त्यांच्या गंधाने माझ्या मनीचा
सारा आसमंत भारला होता

प्रेम निरपेक्ष असतं
म्हणणारी लोकं भेटली
करताना मात्र असं प्रेम
माझी अघोरी तडफ़ड झाली.

वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास
उडुन गेले स्वप्नील रंग आयुष्याचे
उरला हवेत शेवटचा निश्वास


खुप दिवसांनी ती दिसली.......... ­.!

खुप दिवसांनी ती दिसली.......... ­.!


खुप दिवसांनी ती दिसली.......... ­.!
आज..........
आज खुप दिवसांनी
ती दिसली,
तिला बघुन असे वाटले
जसे ती माझ्याशी
जन्‍मभरासाठीच रुसली.
जनु गुलाब या फुलाचे
प्रेमींसाठी महत्‍वच मेले,
जेव्‍हा तीने माझ्याकडे बघुन
न बघीतल्‍या सारखे केले.
मित्रानसमोर चेह-यावर
खोटे हासु आनुण हसत राहीलो,
ती बघेन या आशेने
मागुण तीच्‍याचकडे बघत राहीलो.
शेवटी ती नजरेआड झाली
मन दुखावल आणि निराश झालो,
ओल्‍या पापन्‍या घेऊन
घाई-घाईने घरी आलो.
स्‍लॅमबुक मधुन तिचा
जुना नंबर शोधला,
बंद असतांनाही
मुद्दाम फिरवला.
"नंबर मोजुद नही हे"
अस उत्‍तर मिळत होत,
उत्‍तर एकतांना मात्र
माझ हृदय रळत होत.
तीला भेटण्‍याची प्रत्‍येक
आशाच मेली,
नंतर मग नशिबालाच
दोष दीली, कि
आपल्‍याच जिवनात का
असे प्रसंग घडतात,
आपण त्‍यांच्‍यावर कितीही
जिऊ ओतला तरी, का
अस एकट्या अर्ध्‍यावर सोडुन जातात.
मन विचार करत असत
उत्‍तर मात्र का सापडत नाही,
कूठल्‍याही ख-या प्रेम करणा-याला
त्‍याच मनासारख प्रेम का मिळत नाही.
कुठल्‍याही ख-या प्रेम करणा-याला
त्‍याच मनासारख प्रेम का मिळत नाही.

तू पण माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ना रे?

तू पण माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ना रे?


रोजच माझे एक स्वप्न असते
त्या स्वप्नात मी तुलाच पाहते
असेल ते इतरांना साधारण जरी
तरी मला ते स्वप्नसुखच भावते
न माहित कोण , कसा आहेस तू?
कि माझ्या मनातील पुसटशी प्रतिमाच तू
तुझ्या विचारांत गुंग मी होते
माझ्या हृदयातील स्पंदनेच तू
विचार येता मनी कसा असशील तू
तेव्हाच चेहऱ्यावर माझ्या लाली येते हळू
तुझ्या स्वप्नात रंगुनी जाते रे मी
सख्या रे कधी स्वप्न हे सत्यात आणशील तू
तू असा तू तसा खूप स्वप्ने रंगविली रे
प्रत्येक रंगात तुला नव्याने पाहिले आहे
रंगांना माझ्या एक नवी चमक देशील ना रे
तुझ्या येण्याचीच वाट मी पाहत आहे
माझ्या स्वप्नांचा आधार आहेस रे तू
या स्वप्नांना तुझी साथ दे ना रे तू
तुझ्या आयुष्याची सोबती व्हायचंय रे मला
तुझी जीवनसंगिनी मला करशील ना तू
तुझ्यातच माझे जग एकवटायचंय रे मला
तुझ्यावर जीवापाड प्रेम करायचं मला
तुझ्या नावाने जगात वावरायचंय रे मला
तुझ्यातच माझे स्वप्न संपवायचंय मला
स्वप्न एवढेच आहे रे माझे
तू भेटावास हि एकाच आस आहे
माझ्यासाठी हि तू स्वप्न पाहशील ना रे?
तू पण माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ना रे?

यदा-कदाचीत ...........

यदा-कदाचीत 


यदा-कदाचीत 
.
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे । 
.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि तीच्यासाठी मीही किँचीतसे झूरावे । 
.
महिन्यातून एकदा तीने उगाचच रूसावे,
आणि मी मनवता-मनवता खुदकन हसावे । 
.
राञभर फोनवर तीने मला सतवावे,
दिवसभर मी तीला भेटीसाठी पटवावे । 
.
कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई
म्हणून मी तीच्यावर रागवावे । 
.
दोन दिवस अबोला पाळुन एकमेकांना आठवावे,
मग छोटेसे प्रेमपञ तीने मला पाठवावे । 
.
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे ।।

वाट पाहशील तर आठवण बनून येईन

वाट पाहशील तर आठवण बनून येई


वाट पाहशील तर आठवण बनून येईन

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन

एकदा मनापासून मला आठवून तर बघ

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन!!!!!!!!

आज मी खूप एकटा झालोये ,

आज मी खूप एकटा झालोये ,



आज मी खूप एकटा झालोये ,
खूप मित्र असून हि,
मित्रानं पासून पोरका झालोये ...
भरलेलं होत माझ आभाळ मित्र रुपी चांदण्यांनी,
त्याच चांदण्यान पेकी एक चांदणं मला खूप आवडलं,
फिरू लागलो त्या चांदण्या मागे,
मनाला नाही मी आवरलं...
एके दिवशी आभाळातून ते चांदणं गळून पडलं,
पडत्या चांदण्याला पाहून,
माझ हि पाऊल चुकीच वळलं,
धाऊ लागलो त्या पडत्या चांदण्या मागे,
विसरून बाकी चांदण्यांना ना...
ते पडलेल चांदणं गेल मला सोडून,
जाता जाता नेहल उरलेल्या चांदण्यांना हि त्याने ओडून,
राहिले ते फक्त काहीच चांदणे माझ्या सातीला,
बाकी गेले सारे मला सोडून...
आता बसलोये मी एकटा,
त्याच नदी किनारी,
पाहत वाट,
त्या पडलेल्या चांदण्याची,
घेऊन गेलेले ते सर्व चांदणे,
तिने मला परत करण्याची...
खूप एकट वाटू लागले मला,
इच्छा सरली आता माझी जगण्याची...
पण आजून हि सात आहे,
त्या उरलेल्या चांदण्यांची,
गेले जरी सर्वे,
तरीही,
इच्छा नाही मरू दिली,
त्या चांदण्यांनी माझ्या जगण्याची...
इच्छा नाही मरू दिली,
त्या चांदण्यांनी माझ्या जगण्याची...

तुझ्याशी " खूप खूप "..भांडते ना ..

तुझ्याशी " खूप खूप "..भांडते ना ..


तुझ्याशी " खूप खूप "..भांडते ना ..

खर सांगू ......

माझी मीच अस्वस्थ होत असते ..!

तुझ्याशी " तुटक " बोलून तुला नाराज करताना ...

माझी मीच खरेतर " नाराज " होत असते..!

उगाचच मग मनाशी " चीडचीड"..करत रहाते ..

अकारण .." घडी-घडी " तुझीच..वाट पहात बसते ..!

तुझा ...एखादा .." मेसेज "..येईल ....

तुझा ..एखादा " फोन " ..येईल ....

नाहीतर मग तू स्वताच कदाचित येशील.....!

मग मी आपणहून तुझ्या जवळ..येईन ...

तुझ्या गळ्यात हात टाकेन...आणी म्हणेन ..

............... ­ .."..ए ..माफ कर ना मला .."

.तू पण नेहेमी प्रमाणेच..मला जवळ घेशील ..

..एक टप्पल ..मारशील..माझ्याडोक्यात ­ ...

आणी ,,..म्हणशील ,.. ..चल ..खडूस..कुठली..!!

तु मला हरवून जिंकशील.............

तु मला हरवून जिंकशील.............

तु मला हरवून,
जिंकशील जेव्हा,
तु मला रडवून,
हसशील जेव्हा.....

तु मला पाहून,
रुसशील जेव्हा,
तेव्हा मी तुला,
परखी झालेली असेन.....

तु मला गमावून,
काही मिळवशील,
तु मला विसरुन,
स्वतः जगशील.....

तु मला सोडून,
कुठे जाशील,
तेव्हा मी तुझी,
कुणीच नसेन.....

तु मला समजशील,
तेव्हा स्वतःला विसरशील,
तु मला मागशील,
तेव्हा तुज्याकडेकाहीच नसेल.....

कारण ?????

तेव्हा मिच निघून जाईन,
अगदी कायमची,
तरी जातानाही तुला,
काही देऊन जाईन.....

तो अनमोल ठेवा,
जो मला कधीच नको असेल,
तुझ्या डोळ्यातलं पाणी नेहमी मला,
मी तुला काहीच न दिल्याच सांगत राहिल.....

दूर जाताना एकदा तुला,शेवटचं पहायचं होतं.....

दूर जाताना एकदा तुला,शेवटचं पहायचं होतं.....


दूर जाताना एकदा तुला,

शेवटचं पहायचं होतं.....

मन भरून कायमचं तुला,

मनात भरायच होतं.....

तीळ तीळ तुटत होत मन माझं,

संपवावं आयुष्य असं वाटतं होतं.....

जग संपल होतं तुझ्या विरहाने,

संपुर्ण घरटं उध्वस्त झालं

होतं.....

तरीही फक्त एकदा,

तुला सुखी पहायचं होतं.....

फक्त तुला सुखी पहायचं होत..

आता चाललो मी एकटा....!

आता चाललो मी एकटा....!



आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर,
तुला मनात ठेवून...
विसरून दुखं सारे,
अन,
आपल्यात झालं गेलं,
ते सगळं हि विसरून...

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या प्रेमाच्या,
गोड आठवणींना बरोबर घेऊन...
वाट हि मोठी माझी,
पण,
माहित नाही ग मला,
पोचवेल हि कुठे नेहून...

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या शेवटच्या,
शब्दांना हृदयात ठेऊन,
ठाऊक होते मला,
तू बोललेले,
ते शब्द,
होते सारे खोटे...
कारण,
ते दिसत होते मला,
तुझ्या डोळ्यात राहून राहून...

फक्त तुझ्याच खातर,
मानले मी,
तुझे ते खोटे शब्द हि खरे...
अन,
फक्त तुझ्याच खातर,
निघालो मी तुझ्या आयुष्यातून...
चालू लागलो,
एका नव्या वाटेवर...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून...

तुला पाहताना....!

तुला पाहताना....!

चोरून तुला पाहताना,
मलाच कळत नव्हत,
कि मी काय करत होते....
तुझ्याहून दूर जाण्याच्या प्रयत्नात,
नकळतच का...
मी आजून हि तुझ्या जवळ येत होते???

अस का होत होत, अस का मी वागत होते...
अस का होत होत...
अस का मी वागत होते...
मनात लपलेल्या भावनांना,
तुझ्याहून का मी लपवत होते....

मित्रच होतास न तू माझा, कोणी परका तर नाही...
मित्रच होतास न तू माझा....
कोणी परका तर नाही...
मग ह्या मैत्रीच्या नात्याला,
प्रेमात बदलण्यापासून...
का मी दूर धावत होते???
तुझ्या जवळ असून हि..
का मी....
तुझ्याहून लांब जात होते???
तुझ्या जवळ असून हि..
का मी...
....तुझ्याहून....
.... खूप खूप लांब जात होते???...

मैत्री.....!


मैत्री.....!


मैत्री ठरवून होत
नाही हाच
मैत्रीचा फ़ायदा आहे.
मैत्री ठरवून होत
नाही हाच
मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम
नाहीत
हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....
मैत्रीची वाट आहे कठिण
पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच
तर प्राण आहे....
मैत्रीमध्ये
जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद
असता थेट....
तुझी-माझी मैत्री म्हण्जे
आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा... 

प्रेम समजणारी ती प्रेयसी......!

प्रेम समजणारी ती प्रेयसी......!


प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी

ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी

यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी

हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी

ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी

ओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी

केव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी

थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी

हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी

इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी

चोरून चोरून भेटायला येणारी असावी
हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी

तिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुःखात सदा दोघांची साथ असावी

जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी

आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी

गोष्ट अपूर्ण राहिली......!

गोष्ट अपूर्ण राहिली......!


कोंलेजाला जातांना समोरच
तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली ....
म्हटल पोरगी बहुतेक पटली
पण ... हत तिच्या मारी
मागे वळून बघितल तर तिची मैत्रिण
दिसली
त्या दिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलण्यासाठी जीभ सरवली..........
पण ... हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यात म्हणाली
" प्लीज पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण
आली
एकदा कोंलेजमध्ये परीक्षा सुरु झाली
गाड़ी घेउन जातांना रस्त्यावरच भेटली
पाठुनच तिन हाक मारली
उशीर झालेला म्हणून लिपट मागितली
" थांब गाड़ी लावून येतो!" म्हणून गेट जवळ
सोडली ..
पण ... हत तिच्या मारी
गाड़ी लावे पर्यंत हीच टाटा करुन सरकली
शेवटी पेपर संपल्यावर
जाताना तिला गाठली
हळूच खिशातली चिठ्ठी वर काढली
गालावरची खळी पाहिली ...
वाटल बहुतेक देवी पावली
पण ... हत तिच्या मारी
म्हणाली "
सॉरी थोडक्यासाठी गाडी चुकली "
तेव्हा पासून गोष्ट अपूर्ण राहिली.......तर
राहिली ??????

मला Facebook मुळे मिळालेली ..........!

मला Facebook मुळे मिळालेली ..........!


शोधता शोधता असंच तिला शोधलेल ,
Facebook वर पहिल्यांदाच
तिच्याशी बोललेलो ....!!
रात्रीची फक्त ती भेटायची ,
कधी कधी भल्यापहाटेहि online
असायची ....!!
का ? कुठे ? कसं ? म्हणत ओळख
आमची झालेली ,
हळूहळू ओळख मैत्रीत बदलत गेलेली...!!
कधी मग मी तिचा mobile नंबर
विचारला ,
तिने नाही म्हणत माझाच नंबर
घेतला ...!!
एके दिवशी अचानक तिचा Call आला ,
माझा माझ्यावरच विश्वास न बसला...!!
थोड थोड करत चांगली दोन तास
बोललेली ,
नाही नाही म्हणता सार सांगत
विचारात होती ...!!
काही दिवसांची ओळख आता खूप
वर्षाची भासू लागलेली ,
एक जिवाभावाची मैत्रीण
मला Facebook मुळे
मिळालेली ..............!

खरच काही मुले असतातच असे . ...!

खरच काही मुले असतातच असे . ...!


खरच काही मुले असतातच असे . .
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त
तिच्यावरच प्रेम करणारे . .
मुले असतातच असे . .

तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे . .

मुले असतातच असे,.
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून
तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे . .
खरच काही मुले असतातच असे . .

माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात
आपले प्रेम शोधणारे . .

तूच माझे जीवन आहेस.....!

तूच माझे जीवन आहेस.....!


मला तुझ्यासारख्या कविता नाही रचता येत
मनापासून नाही हसता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
मी फक्त तुझा आणि तु फक्त माझी आहेस...!!१!!

मला तुझ्यासारखे गाणे नाही गाता येत
हृदयाच्या अंतरंगात नाही जाता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
माझे हृदय तुझे अन तुझे हृदय हेच माझे हृदय आहे...!!२!!

मला तुझ्यासारखे डोळ्यात डोळे घालून नाही पहाता येत
तुझ्यासारखे नझर चोरून नाही जाता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
तुझी नझर माझ्यावर अन
माझ्या नाझारेत फक्त तूच आहेस...!!३!!

मला तुझ्यासारखे ढसाढसा नाही रडता येत
मनातले दुख नाही सांगता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
माझे सुख तुझे अन तुझे दुख माझे आहे...!!४!!

मला तुझ्यासारखे नेहमी आनंदी नाही राहता येत
सुखी संसाराचे स्वप्न नाही पाहता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
तूच माझ्या जीवनाचे स्वप्न
आणि त्या स्वप्नात फक्त तूच आहेस...!!५!!

मला तुझ्यासारखे imotional नाही होता येत
सर्वच feelings नाही share करता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
तूच माझे imotions अन
माझ्या feelings मधेही तूच आहेस...!!६!!

मला तुझ्यासारखे जीवन नाही जगता येत
जगाकडे आपलेपणाने नाही बघता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
माझे जीवन तुझ्यासाठी पण
तूच माझे जीवन आहेस
तूच माझे जीवन आहेस...!!७!!

कि तुला सर्व माफ आहे.....!

कि तुला सर्व माफ आहे.....!


तू माझ्याशी नाही बोललीस
मला दुख होणार नाही
तू माझ्याशी नाही हसलीस
मला राग येणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू नाही दिलास reply
मला काही वाटणार नाही
तू नाही उचललास phone
मला यातना होणार नाहीत
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू विसरलीस मला
मी तुला विसरणार नाही
तू रडविलेस जरी मला
तरीही मी रडणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू सोडून गेलीस मला
तरी मी वाट पाहणार
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
कि तुला सर्व माफ आहे...

तु.....!

तु.....!


वा-यावर उडणारी बटं सावरताना

खुप छान दिसायचीस तु,

तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन

खुप छान हसायचीस तु.

नेहमीच मला माझ्या अवतीभोवती

खरचं भासायची तु,

मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग

आल्यावर,कुठेच नसायची तु..

माझ्यावरच हसुन झाल्यावर” माझे”

पुन्हा मला दिसायची तु,

मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत

जेव्हा खरी-खुरी असायची तु

जीवन एक कोडे आहे...!

जीवन एक कोडे आहे...!


जीवन एक कोडे आहे

न सुटणारे न उलगडणारे ।

जीवन एक फूल आहे

दुःख स्पर्शाने मलूल होणारे ।

जीवन हे धूप आहे

क्षणा क्षणाला कणा कणाने झिजणारे ।

जीवन हे मेण आहे

कष्टाच्या आचेने वितळणारे ।

जीवन हे प्रेम आहे

क्षण भंगूर -ठरणारे ।

व्यवहाराची झळ लागताच

विरघळून -विरून जाणारे ।

जीवन हे स्वप्न आहे

कधी साकार न होणारे ।

जाग येतांच विरून जाउन

नेत्रांची जळजळ करणारे ।

जीवन हे आभाळ आहे

कधीं गवसणी न बसणारे ।

क्षितीजासारखे कायम

दूर दूर पळणारे.......!!

आयुष्य.....!

आयुष्य.....!


कधी कधी अस वाटत, 
आपल्याच आयुष्यावर आपलाच हक़्क़ नसतो.....
हव ते मिळवण्यासठी,
कदाचित आपणच कमी पडतो....

मग आयुष्यच निरस, निशब्द, 
असल्यासारखं वाटत,
जेव्हा आपलीच माणस ,
आपली नसल्यासारख भासत.....

या एवढ्या माणसांनी भरलेल्या गर्दीत ,
आपण कुठेतरी एकटच असल्याच वाटत ......
जेव्हा कुणी आपलं म्हणणार,
आपल्यालाच परकं करून जात........

नाही सहन होत तुला आणखी कुणाच्या 
स्वाधीन होताना पाहुन,
थांबशील का रे माझ्यासाठी,
माझ्यावरच प्रेम आठवून ........

नात्यांच्या या गर्दीत,
तू माझ्या प्रेमाला खरच विसरलास.....
आणि तुला माझ आयुष्य मानणारी मलाच,
या गर्दीत एकट ठेवून गेलास ......

पण, शेवटी जे घडायचे असत तेच घडत,
त्याला कुणीही बदलू शकत नसत ..
प्रेम हे प्रेमच असत,निभावणारे निभावतात,
नाही निभावू शकले,
त्यांना ते व्यर्थच वाटत असत .........!

कधीच विसरणार नाही....!

कधीच विसरणार नाही....!


तुझ्या डोळयातले पाणी दिसते मला,
पण मझ्या मनातले अश्रू तुला दिसत नाही.
.
तुझे प्रेम बघितले मी,पण माझाविश्वास तू अनुभवली नाहीस,
.
तुझा हक्क दाखवलीस तू,
पण माझा हट्ट तुला दिसला नाही.
.
तुझ्या भावना दर्शवलीस तू,
पण माझी व्याकुळता तुला दिसली नाही.
.
तुला वाईट वाटते हे सांगितलेसतू,पण मलावाईट नाही वाटणार असे
तू काही सांगितलेच नाही.
.
तू मला विसरशील सुधा,पण मी तुला
कधीच विसरणार नाही..

एकदातरी प्रेमात पडलेला असतो.........!

एकदातरी प्रेमात पडलेला असतो.........!


नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने 
आप-आपला चंद्र निवडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी 
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

तिच्या चेहरयाला चंद्र म्हणण्याची 
त्याची सवय कही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरिही
त्याने जिद्द माञ सोडलेली नसते 
तीच्या सौंदर्याचं गुणगाण करण्याचा
जणू छंदच त्याला जडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी 
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

पान-टपरी वाल्यांकडे त्याची 
अगदी महिनो-महिने उधारी असते
तरी, तिच्यासाठी चंद्र-तारे आणण्याची
त्याची एका पायावर तयारी असते

तीच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार, 
त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने 
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

तिच्यासाठी गुलाब तोडताना तो
कधी काट्यांचीही तमा बाळगत नाही
आणि ती सोबत असेपर्यंत त्याला,
दुःखं कधीच उमगत नाही

तिच्या क्षणभर दुराव्यानेही, 
तो दुःख सागरत बुडालेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने 
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

बरं यालाच प्रेम म्हणावे तर,
लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
आणि नुकतचं प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून
अगदी शुध्द प्रेमाची आशा करतात

अशाच समाज-कंटकांमुळे, 
प्रत्येकजण प्रेमात थोडा रखडलेला असतो
तरीदेखील प्रत्येकजण केव्हा ना केव्हा 
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

आज मी तुला पाहिलं...!

आज मी तुला पाहिलं...!



आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
आज तुझा फोटो पाहतना
त्यात स्वतःला हरवलं
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
इतके दिवस मी तुझ्याशी बोललो
इतके दिवस मी तुला ऐकल
पण आज प्रथमच हृदयातून ऐकल
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
आज तुला पाहताना
मला एक जाणवल
इतके दिवस मी बेचैन होतो
त्याचे कारण आज मला उमगल
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं..
मला कळत नव्हते
कोण तु अन कोण मी
पण आज सारे स्वप्न उलगडल
जे सत्य आहे तेच आज मला दिसलं
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
आज मला समजली
माझ्या हृदयाची भाषा
मला समजली
तुझ्याविना माझी दशा
मला समजले मैत्रीच्या पुढचे काही
मला समजले माझे असे वागणे
मला समजले फक्त तुलाच आठवणे
आज मी तुला माझ्या
आत्म्यातून ओळखल
आज मी तुला पाहिलं
कधी नाही ते आज अनुभवलं...
आज असे वाटते की
मी तुझ्यापासून वेगळा नाही
आज असे वाटले की
तु तु नाही मी मी नाही
आज असे वाटले की
आताच तुझ्याकडे यावे
तुझ्याकडे येऊन
तुझेच बनून जावे
तुझेच बनून जावे..