गोष्ट अपूर्ण राहिली......!
कोंलेजाला जातांना समोरच
तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली ....
म्हटल पोरगी बहुतेक पटली
पण ... हत तिच्या मारी
मागे वळून बघितल तर तिची मैत्रिण
दिसली
त्या दिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलण्यासाठी जीभ सरवली..........
पण ... हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यात म्हणाली
" प्लीज पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण
आली
एकदा कोंलेजमध्ये परीक्षा सुरु झाली
गाड़ी घेउन जातांना रस्त्यावरच भेटली
पाठुनच तिन हाक मारली
उशीर झालेला म्हणून लिपट मागितली
" थांब गाड़ी लावून येतो!" म्हणून गेट जवळ
सोडली ..
पण ... हत तिच्या मारी
गाड़ी लावे पर्यंत हीच टाटा करुन सरकली
शेवटी पेपर संपल्यावर
जाताना तिला गाठली
हळूच खिशातली चिठ्ठी वर काढली
गालावरची खळी पाहिली ...
वाटल बहुतेक देवी पावली
पण ... हत तिच्या मारी
म्हणाली "
सॉरी थोडक्यासाठी गाडी चुकली "
तेव्हा पासून गोष्ट अपूर्ण राहिली.......तर
राहिली ??????
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा