आयुष्य.....!

आयुष्य.....!


कधी कधी अस वाटत, 
आपल्याच आयुष्यावर आपलाच हक़्क़ नसतो.....
हव ते मिळवण्यासठी,
कदाचित आपणच कमी पडतो....

मग आयुष्यच निरस, निशब्द, 
असल्यासारखं वाटत,
जेव्हा आपलीच माणस ,
आपली नसल्यासारख भासत.....

या एवढ्या माणसांनी भरलेल्या गर्दीत ,
आपण कुठेतरी एकटच असल्याच वाटत ......
जेव्हा कुणी आपलं म्हणणार,
आपल्यालाच परकं करून जात........

नाही सहन होत तुला आणखी कुणाच्या 
स्वाधीन होताना पाहुन,
थांबशील का रे माझ्यासाठी,
माझ्यावरच प्रेम आठवून ........

नात्यांच्या या गर्दीत,
तू माझ्या प्रेमाला खरच विसरलास.....
आणि तुला माझ आयुष्य मानणारी मलाच,
या गर्दीत एकट ठेवून गेलास ......

पण, शेवटी जे घडायचे असत तेच घडत,
त्याला कुणीही बदलू शकत नसत ..
प्रेम हे प्रेमच असत,निभावणारे निभावतात,
नाही निभावू शकले,
त्यांना ते व्यर्थच वाटत असत .........!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: