एप्रिल फूल

एप्रिल फूल

वर्षापूर्वी होतो मी, ब्रास बॅण्ड मालक, !
नावाजलो गेलो पुण्यात, करुनी मेहनत अथक !
लग्नस्थळी व्हायची सारी , मंडळी मंत्रमुग्ध !
दाटून कंठ वाजविता , वऱ्हाड अगदी स्तब्ध !

बहारो फुल बरसाओ, वाजविता गाणे !
कन्या कुमारीचे, असे प्रेमकौतुकाने पाहणे !
आज मेरे यार कि शादीला, हमखास वन्स मोर
लग्न म्हटले कि आलेच कि हो तेथे चित्त चोर

लग्नात एका सुंदरीने, पाडली भुरळ !
जावून भिडलो, तिजला बिनधास्त सरळ !
एका अन्गल ने तू दिसतेस रेखा
हिंदीतले गाणे, तुमसा नही देखा

केली स्तुती गाण्यातुनी,
सूर निघाले पियानोतुनी
उत्तरे तिन्हे दिली नाही काही
स्वप्न मात्र, मी रोज पाही

म्हणता म्हणता, वाढली मैत्री !
पडेल पुढे एक पाऊल, मनात खात्री !
माझ्या पियानो सुरांवर, होती फिदा !
नखरेल तिच्या, सांगत होत्या अदा !

मार्च एकतीसला , आला मेसेज
फेस वरील माझ्या , उजळले तेज !
आहे का तुला, भेटायला वेळ !
बटन ऑन हृदयात, प्रेमाचा खेळ !

जेन्ट्स पार्लरसी जावून, केला मेकओवर !
अंगी होता माझ्या १०५% लव्हफिवर !
भेटली एकदाची, गप्पा रंगल्या नाही खास
आजपासून म्हणते, सुरु होतोय नवीन मास

हळूच दिली पत्रिका, माझ्या हातात !
वाजवायचे म्हटली, तिच्या लग्नाची वरात
व्यवसायाला जागलो, वाजविली मस्त गाणी
नाचत होती पोरे, काळजाचे झाले पाणी

बजाते बजाते, धून निकल गई !
तू औरो कि क़्यो, हो गई !