तुझ्याविना
तुझे विरघळलेले आभास घेऊन,
रात्र जळत असते माझ्या पापण्यांवरती.....
आणि मी पण तुझ्या आठवांची चादर
पांघरून,
उगाच झोपी जाण्याचा प्रयत्न करत
असतो.....
दिवे मालवले तरी, निद्रा काही प्रसन्न
होत नाही....
झोपण्याचा प्रयत्न करूनही, झोप मात्र
येत नाही....
मग उठतो, आणि लिहायला बसतो...
तुझ्या सहवासातले क्षण, कागदावर
सांडतो...
तुझं दिसणं, बोलणं, लाजणं, चिडणं;
दिलखुलास हसताना मोहक दिसणं....
सगळंकाही शब्दात मांडून झाल्यावर,
पुन्हा मनभरून वाचुन घेतो....
आणि मग स्वतःचीच नजर लागू नये म्हणून,
अलगद तो कागद फाडून टाकतो...
मग हसतो माझ्यावरच,
आणि आरशासमोर जाऊन ठेंगा दाखवतो...
"कशी जिरवली तुझी!" म्हणून,
स्वतःलाच खिजवून पहातो...
शेवटी माझीच माफी मागतो,
आणि पुन्हा तुझ्या आठवणीत रमतो...
तुझ्याविना माझा एकांत,
अशाच वेडेपणात सरतो..
रात्र जळत असते माझ्या पापण्यांवरती.....
आणि मी पण तुझ्या आठवांची चादर
पांघरून,
उगाच झोपी जाण्याचा प्रयत्न करत
असतो.....
दिवे मालवले तरी, निद्रा काही प्रसन्न
होत नाही....
झोपण्याचा प्रयत्न करूनही, झोप मात्र
येत नाही....
मग उठतो, आणि लिहायला बसतो...
तुझ्या सहवासातले क्षण, कागदावर
सांडतो...
तुझं दिसणं, बोलणं, लाजणं, चिडणं;
दिलखुलास हसताना मोहक दिसणं....
सगळंकाही शब्दात मांडून झाल्यावर,
पुन्हा मनभरून वाचुन घेतो....
आणि मग स्वतःचीच नजर लागू नये म्हणून,
अलगद तो कागद फाडून टाकतो...
मग हसतो माझ्यावरच,
आणि आरशासमोर जाऊन ठेंगा दाखवतो...
"कशी जिरवली तुझी!" म्हणून,
स्वतःलाच खिजवून पहातो...
शेवटी माझीच माफी मागतो,
आणि पुन्हा तुझ्या आठवणीत रमतो...
तुझ्याविना माझा एकांत,
अशाच वेडेपणात सरतो..