आठवणीं

आठवणीं

शीळ घाली भूतकाळ ,

आठवणींच्या घनदाट रानात ,

भासे कधी बेसूर ,

तर कधी असे मधुर स्वरात ...

वाट शोधतोय पांथस्थ

वेड्या वाकड्या या वळणात ,

कमी नसते कधीच ...,

सुख दुंखाची या प्रवासात ...

जपतो तो प्रत्येक नाते ...,

जपतो तो प्रत्येक नाते .......

मात्र ...., याच जीवनात ......

जरी फिरत असला तो ,

आठवणीच्या घनदाट रानात ....!!!