एक तरी सखी असावी

एक तरी सखी असावी



एक तरी सखी असावी,
जीवनी जिने साथ द्यावी..
रूपाने नसली सुंदर,
तरी मनाने मात्र असावी..

... एक तरी सखी असावी,
सोबत तिची कायम असावी,
अबोल असेल तरी,
गाली लाली मात्र असावी..

एक तरी सखी असावी,
दुखःत सुखात साथ करावी..
असतील वेदना, जखमा,
हळुवार फुंकर घालावी..

एक तरी सखी असावी,
आयुष्याची भ्रांत नसावी..
निजता तिच्या मांडीवर,
सुखाची झोप लागावी,

प्रत्येकाला अशी,
एक तरी सखी असावी..

चिंता..

चिंता..

असे आधी आमची चिंता..
गेले काही दिवस कि..
का करू तुझी मी चिंता.?..

आधी आवडे बोलायला रात्रभर..
नाही मिळत वेळ नंतर त्यांना ..
अन पाहतो वाट आम्ही मुले दिवसभर..

तू माझा जानू.. तूच माझा जीव..
लोटले काही दिवस कि मग..
आपण आपलेच असतो जसे..
एकटा जीव सदाशिव...

असते आवडत प्रेमाचे आपले शब्द.
असतात आवडत प्रेम करायचे आपले मार्ग..
लोटले काही दिवस कि मग..
बोलताना असे त्या जणु निशब्द...

नाही ठेवत किंमत त्या
आपण केलेल्या प्रेमाची ..
नसे वाटत काही त्यांना..
किंमत त्या ओघळलेल्या अश्रूंची...

कुठे चुकत असतो आम्ही..
तुम्हाच सारे महत्व देतो..
नसते काळजी आम्हा आमुची..
तुम्हालाच तर सुखी ठेवतो..

कळेल तुम्हालाही एकदा..
खरे प्रेम म्हणजे काय..
कराल तुम्हीही प्रेम कोणावर जेव्हा..
अन मिळणार नाही जेव्हा तुम्हाला न्याय.

तिनेच आज मला डिलीट केले..







तिनेच आज मला डिलीट केले..


जगायची रात्र जिच्यासाठी..
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्याशी बोलण्यासाठी..
काढायचो वेळ दिवसभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

ती ऑनलाईन येण्याची मी..
वाट पाहायचो तासभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्या प्रत्येक कठीण समयी..
साथ द्यायचो त्या वळणावर
तिनेच आज मला डिलीट केले....

जिच्या एका स्मायली साठी..
खुश व्हायचो रात्रभर...
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्या एका वाक्यासाठी...
नेट रीन्यू करायचो महिनाभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

ऑनलाइन तिच्याशी बोलण्यासाठी..
जेवण चुकवायचो आठवडाभर
तिनेच आज मला डिलीट केले..

नाही गम आज मी
तिच्या फ्रेंड लिस्ट मध्ये नसल्याची
पाहतो वाट मी ती ऑनलाईन येण्याची...

ती collage मधली मुलगी







ती collage मधली मुलगी



ती collage मधली मुलगी म्हणजे

Flawless queen of beauty.

ती collage मधली मुलगी म्हणजे

वेड dream ऑफ २०.



काय सांगू तुम्हाला काय करते ती style अन,


काय सांगू तुम्हाला काय ती देते smile



तिची एक smile म्हणजे


Worth a millon dollar

ती समोर दिसताच

Heart pound faster.





तिची ती चालजणू


ramp वरल catwalk

तिची एक नजर 440v shock



तिचे मित्र फार कमी


That means she is very choosy

तिची एक एक अदा आहेच निराळी

That’s why she drives us crazy



तिच्यामुळे तर collageची शान आहे


नाहीतर collageची ओढ इथे कोणाला आहे?

ती collage मधली मुलगी म्हणजे

Flawless queen of beauty.

ती collage मधली मुलगी म्हणजे

वेड dream ऑफ २०.



काय सांगू तुम्हाला काय करते ती style अन,


काय सांगू तुम्हाला काय ती देते smile



तिची एक smile म्हणजे


Worth a millon dollar

ती समोर दिसताच

Heart pound faster.





तिची ती चालजणू


ramp वरल catwalk

तिची एक नजर 440v shock



तिचे मित्र फार कमी


That means she is very choosy

तिची एक एक अदा आहेच निराळी

That’s why she drives us crazy



तिच्यामुळे तर collageची शान आहे


नाहीतर collageची ओढ इथे कोणाला आहे?

प्रेम

प्रेम

प्रेम ……………………पहिल्या नजरेचं
प्रेम ……………………शेवटच्या श्वासचं

प्रेम ……………………फुललेल्या कळीचं
प्रेम ……………………जुळलेल्या जीवचं
... ... ...
प्रेम ……………………पहिल्याच प्रेमाचं
प्रेम ……………………अखेरीच्या भेटीचं

प्रेम ……………………तुटलेल्या गाठीचं
प्रेम ……………………रेशमी अतूट बंधाचं

प्रेम ……………………चुकलेल्या वाटांच
प्रेम ……………………वाटेवर चुकलेल्यांच

प्रेम ……………………वाक्यावर शब्दांचं
प्रेम ……………………शब्दविना वाक्याचं

प्रेम ……………………तरुण रात्रीच
प्रेम ……………………उमललेल्या दिवसांचं

प्रेम ……………………त्याच आणि तिचं
आणि अखेर प्रेम ……...जसं माझं तुझ्या वरचं …

एक

एक


एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,

एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..

एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..
पुन्हा पुन्हा..
तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..

एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..

एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..

एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य..
तुझ्याविना..
तुझ्याचसाठी....

लव्ह स्टोरी

लव्ह स्टोरी


आज तुम्हाले सांगतो म्या म्हाई लव्ह स्टोरी
दिसली ही अन सोडलं म्या पहाणं दुसर्या पोरी

केलं परपोज तर म्हनली मले वाटत नाही लाज
पैताण खायची लै तुले सुटली हाय का खाज

म्या म्हनल येवढ्या पोरीत तुच आवडली मले
प्रेम म्हायं कबूल कर बसवीन डोक्यावर तुले

सकाळ दूपार सन्ध्याकाळ मंग हिच्याच मांग जाणं
झोपेत पन मंग हिचीच रोज सपान नवी पहानं

शेवटी हिले पटलं म्हाय प्रेम आहे खरं
तिनं बी मग म्हन्ल लाजून जमेल आपलं बरं

अशी बघा एकून हाय म्हायी लव्ह स्टोरी
दिसली ही अन सोडलं म्या पहाणं दुसर्या पोरी

परत लहान व्हायचे आहे मला....

परत लहान व्हायचे आहे मला....

आईचा कुरवाळणारा स्पर्श,
बाबांबरोबर शाळेत जाताना मिळणारा हर्ष..
परत लहान व्हायचे आहे मला,
आई बाबांच्या प्रेमात नहायचे आहे मला!

बहुला-बाहुलीचं लग्न,
भातुकलीच्या खेळात तासन्-तास् मग्न..
परत लहान व्हायचे आहे मला,
आई झोपली असताना खाऊ पळवायचा आहे मला!

मामा-मामी च्या रम्या गावी,
सगळे लाड पुरविणारे आजोबा-आजी..
परत लहान व्हायचे आहे मला,
ए राजी , ए हौशी करत बैलगाडीतून चक्कार मारायची आहे मला!

धाडसी शिवाजी महाराजांच्या गोष्टी,
आजोबांकडून ऐकायच्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीत..
परत लहान व्हायचे आहे मला,
गर्क होऊन अनेक गोष्टी ऐकायच्या आहेत मला!

नाचत खेळत वाहणारं नदीचं पाणी,
इवलेसे सगळे जण .. प्रत्येकाच्या आंघोळी..
परत लहान व्हयाचे आहे मला,
आजीला पूजे साठी घागर आणून द्यायची आहे मला!

आकाश्यात लुक लुक करणारे असंख्य तारे,
मध्या रात्रीचे ते मंद, हळूवार वारे..
परत लहान व्हयाचे आहे मला,
मोठी झाले की डॉक्टर होण्याची स्वप्न पाहायची आहेत मला!

नवीन वर्ष .. नवीन उल्हास,
नवीन गणावेश , नवीन वह्या -पुस्तकांचा वास..
परत लहान व्हायचे आहे मला,
परत शिस्तीत शाळेत जायच आहे मला!

आल्लड ते बालपण आता नाहीसे झाले,
आयुष्यातील सगळ्यात सुंदर आठवणी मात्र ठेऊन गेले..
परत लहान होता येणार नाही मला,
परत लहान होता येणार नाही मला!!

पण तो क्षणच खूप वेडा असतो

पण तो क्षणच खूप वेडा असतो

केलाय का कधी तम्ही कुणाला propose ?
केलाच कधी जर तुम्ही suppose
तो क्षण नेहमी आठवणीत राहतो
नकळत कधीतरी मनात डोकावून पाहतो
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

ती "हो" बोलेल कि "नाही" बोलेल
कि,जे मैत्रीचे नाते आहे तेहि तोडेल
मनात सगळ्या विचारांचा काहूर माजतो
पुरुषा सारखा पुरुष पण साला प्रेमात लाजतो
मानो याना मानो............
पण तो क्षणच वेडा असतो.

एरव्ही जराही वेळ नसलेले आम्ही
propose करायला मात्र बरोबर वेळ साधतो
होकार तिचा ग्राह्य धरून मनात

स्वप्नाचा बंगला बांधतो,
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

परीक्षेच्या result ची वाटली नाही भीती
तेवढा तो या प्रेमाच्या result ला घाबरतो,
दुसरे काही नको हवे असते त्याला
तो फक्त तिच्या एका होकारानेच सावरतो
मानो याना मान............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

तिचे उत्तर मिळेपर्यंत वेळ पण थांबतो,
घड्याळ्याच्या काट्यावर बहुतेक चिखल साठतो
चेक करा जरा ब्लड प्रेशर
propose करताना म्हणे तो शिखर गातो
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

साठवून ठेवा ठेवा तो आयुष्यभर,कारण
तो क्षण खूप वेगळा असतो
ती नसली तरीहि तो नेहमी साथ असतो
मानो यानामानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो..

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत


मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

गुलाबी थंडीत

गुलाबी थंडीत


मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवा

तुला काय वाटल...................

तुला काय वाटल....................

तुला काय वाटल,
मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस,
तसा काय मी रागावू शकत नाही!!

तुझ्या आठवणीत डोळे माझे
नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही,
तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत,
पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस,
तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो,
हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!

तू नेहमीच बरोबर होतीस,
माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल,
एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..
देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!

लिहिण्यासारखे एवढेच होते,
बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले,
तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही तुला खूप miss करतो!!

जिवलग मित्र




जिवलग मित्र

हाच तर जिवलग मित्र असतो...

१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो

समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो

कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो

पिकनिक ला जाताना
आई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतो

बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो

आपण विसरलो तरीही
वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो

परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो

काही चुकले तर ओरडतो
गरज असेल तर कान पीळतो

इतर मित्रांच्या तुलनेत
आपली जास्त काळजी घेत असतो

हाच असतो जो
आपल्या कली रूपी आयुष्याला फुलवत नेत असतो

हाच असतो जो
आपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतो

दुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतो
आपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतो

आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो

सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र असतो...

मैत्री





मैत्री

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.

तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,

मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.

चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.

भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.

कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.

प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.

एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.

कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,

संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.

एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.

चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं.

पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं.

विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं.

ज्याच्याबरोबर हे घडत असतं त्याला फक्त मैत्री आणि मैत्री हेच नाव द्या —

देवा मला एक gf दे

देवा मला एक GF दे


या वर्षी तरी देवा मला एक gf दे .
.
गोरी गोरी नसली तरी चालेल सावळी दे..

श्रीमंत नसली तरी चालेल गरीब दे..

जी माझ्या मनाला समजेल ....

जी माझ्या हृदयाला जपेल ...

...
या वर्षी तरी देवा मला एक gf दे.
.
गेले कित्येक वर्षे मी मित्रांच्या gf ला बघत आलो..

गेले कित्येक दिवस नुसते स्वप्नेच बघत बसलो..

पण देवा आता तरी ऐक न माझे..

कुठे तरी सेटिंग लाऊन दे..

का माहित का आज..

का माहित का आज..


का माहित का आज असे वाटत आहे
कि मी एकटा पडलो आहे...
सारे मित्र असूनही मी एकटाच आहे
का माहित का आज..?

मन कुणामुळे तरी उदास झाले आहे
गरज आहे कोणाची मला असे का वाटत आहे...
राहून राहून कोणाची तरी आठवण येत आहे
असे का होत आहे..?

का माहित नाही जग वेगळे
आणि मी वेगळा झालो आहे
कोणाची तरी साथ हवी आहे मला...
पण कोणीच दिसत नाही
का माहित का मी एकटाच पडलो आहे..?

कोणीच का साथ देत नाही मला
देणारे हात सुद्धा मागे पडले आहेत...
जे होते प्रिय ते सुद्धा सोडून गेले
सांजेचा सूर्यही अस्ताकडे जात आहे
मला वाटते कि मी अंताकडे जात आहे...

कॉलेजचा शेवटचा दिवस









कॉलेजचा शेवटचा दिवस


कॉलेजचा शेवटचा दिवस,


ना जाणे उद्या कोण कुठे असेल्,


एकदा मगे वळुण बघ,


मि तिथेच् उभा असेन्......



नव्या आठवणि घेउन् कोणि भविष्या कढे चालेल,


भरभरुनच् आले कधि तरी अश्रुंचा आधार घेइल,


पायवाटेवरुन् चालताना जेव्हा सोबत कोणी नसेल,


एकदा मघे वळुन् बघ,


मी तिथेच् उभा असेन.......



कोणत्यातरी वळणावर कोणी सोबति तुला भेटेल ,


आयुष्याचा वटेकरी तोच तुला वटेल,


तुझ्यासोबत असतना सुध्दा जेव्हा एकांदा तुला भिडेल,


एकदा मगे वळुन बघ,


माझी कींमत तुला कळेल...........

प्रेम

प्रेम


पत्रात मावणार नाही,
इतके प्रेम करतेस..!
वाट नसून ओळखीची,
माझ्या कडे धावतेस..!!

धावणं नाही होत कमी,
मनी प्रीतीची ओढी..!
लिहिल्या शिवाय कळेल मला,
हीच माझी हमी..!!

कधी पडशील धावताना,
विचार मनी आणू नकोस..!
ओढ तुझी उत्कट,
मीही तुझाच विसरू नकोस..!!

प्रेमाशिवाय जगणं नाही,
मनी प्रीतीचा सागर..!
कितीही असला दुष्काळ,
प्रीतीची भरते घागर..!!

किती असतील गुंते,
तमा बाळगू नकोस..!
सोडवू सर्व प्रेमाने,
विश्वास मनचा सोडू नकोस..!!

असेल नेहमी माझी साथ,
जिंकेन - हरेन विचारू नको..!
जगावं आयुष्य आनंदे,
क्रोधाची माया जमवू नको..!!

ते पण एक वय असतं

ते पण एक वय असतं


ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

आता संपलयं ते सारं....

आता संपलयं ते सारं....




आता संपलयं ते भास होणे,
तू नसल्याठिकाणी तुला पहाणे,
तू समोर असल्यावर,
स्वतःलाच विसरून जाणे.....
आता संपलयं ते सारं....

आता संपलयं ते तुझे शब्द आठवणे,
तू बोलत असताना माझे गप्प होणे,
आणि,
तुला एकटक बघत रहाणे......
आता संपलयं ते सारं....

आता संपलयं तुझ्यासाठी घरी थापा मारणे,
extra-classच्या नावाखाली तुला भेटणे,
तासनतास बोलत रहाणे,
आणि, फोनचे बिल वाढवणे.....
आता संपलयं ते सारं....

आता संपलीयेत ती भांडणे,
शुल्लक गोष्टीवरून रूसणे,
थोडा वेळ अबोला धरणे,
आणि, नंतर मीच ..
sorry sorry sorry म्हणणे...
आता संपलयं ते सारं....

आता संपलयं एकटे असता तुला आठवणे,
तुला आठवून माझे हळवे होणे,
रात्रभर एकच गाणे ऐकणे,
आणि, कधी,
हळूच अलगद डोळ्यांतुन पाणी ओघळणे,
आता संपलयं ते सारं...

आता संपलयं ते तुझ्यासाठी श्वास घेणे,
तुझ्यासाठी जगणे, आणि,
तुझ्यासाठी तुझ्यावर कवितांवरकविता करणे...

आता संपलयं ते सारं.........

पोरी महागात पडतात !!

पोरी महागात पडतात !!

पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव,त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित,कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात पोरी महागात पडतात!!
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव,त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित,कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात पोरी महागात पडतात!!
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच

तुझे शब्द

तुझे शब्द


तुझ्या एका शब्दासाठी
वाट किती मी पहावी
तुझ्या एका शब्दामुळे
मला कविता सुचावी
माझी कविता अधुरी
तुझ्या एका शब्दाविना
जसा जीव चातकाचा
तडफडे थेंबाविना

तुझ्या शब्दाचे आभास
श्वासाश्वासात गुंतले
स्वप्नपाखरासवे मी
शब्दशिंपले गुंफले

तुझा शब्द येता कानी
देहभान हरपले
"काव्य झाले तनमन,"
माझे आभाळ बोलले!!!

मी एकटाच असेन !





मी एकटाच असेन !


तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण ,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला हसवणारे बरेच असतील पण ,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !

लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण ,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण ,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन..

तुझ्याच हृदयात राहायचं मला


तुझ्याच हृदयात राहायचं मला 

तुझ्याच हृदयात राहायचं मला
तुझ्याच आवडीचं व्हायचंय मला
तुझ्या ओठातलं गीत व्हायचंय मला
तुझ्या संगतीत बहारायचंय मला
तुझ्यासाठीच जगायचंय मला
तुझ्या हृदयात राहायचंय मला

तुझ्या स्वप्नातील राजकुमार व्हायचंय मला
तुझ्या मनातील एक पान व्हायचंय मला
तुझ्या बरोबर राहून आयुष्याला नवीन वळण द्यायचंय मला
तुझ्या सुखातील जोडीदार
तुझ्या दु:खातील भागीदार व्हायचंय मला
तुझ्याच हृदयात राहायचंय मला

तुझ्यात गुंतून जायचंय मला
तुझ्याच नशेत डुबून जायचंय मला
तुझे सौंदर्य डोळ्यात टिपून ठेवायचंय मला
तुझ्यात हरवून जायचंय मला

आणि नंतर तुझ्यातच शोधायचंय मला
कसं सांगू मी तुला
तुझ्याच हृदयात रहायचंय मला

एक तरी मैत्रीण असावी




एक तरी मैत्रीण असावी


एक तरी मैत्रीण असावी बाईकवर
मागे बसावीजुनी हीरो होंडा सुद्धा
मगकरिझ्माहून झकास दिसावी !!

एक तरी मैत्रीण असावी चार चौघीत
उठून दिसावी बोलली नाही तरी
निदान समोर बघून गोड हसावी !!

एक तरी मैत्रीण असावी कधीतरी
सोबत फिरावी दोघांना एकत्र
पाहून गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !!

एक तरी मैत्रीण असावी जिच्याशी
निर्मळ संवाद असावा कधीतरी छोट्या
भांडणाचाएखादाच अपवाद असावा !!

एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या
अनोळखी वळणावर तुमच्या व्यथा
वेदनांवर तिने घालावी हळूच फुंकर !!

एक तरी मैत्रीण असावी जिच्या
मैत्रीत विश्वास रुजावा तुमचासुद्धा
खांदा कधीतिच्या दुःखाने भिजावा !!

एक तरी मैत्रीण असावी चांदणी सारखी
मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले
म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात
आयुष्य खूप सुंदर आहे .......!!!!!!

मागच्या आठवड्यातील गोष्ट...



मागच्या आठवड्यातील गोष्ट...

माझ्यासोबत काम करणारी एक मुलगी (सॉरी, ऑफिसातली कलिग म्हणायला हवं. नाहीतर ह्यांच्या स्टेटसला आणि डिग्निटीला धक्का पोचतो) जेवायला बसताना हातात कसलातरी पांढऱ्या रंगाचा पुडा घेऊन आली. मी तिला सहज विचारलं, "काय गं, हा पुडा कसला?" त्यावर ती म्हणाली, "Hey, these are tissues, paper napkins!" "इतके? कँटिनमधल्या सगळ्या लोकांचे हात पुसणार आहेस की काय?", मी.

"Hmpfh..." - एक लाडिक अन् रागीट कटाक्ष - "I don't like to keep my hands oily all the while... आमच्या मेडला कित्तीदा सांगून ठेवलंय, don't use so much oil. पण तिला कळतच नाही! She just doesn't understand, you see?"

मी मनात म्हटलं, "बिच्चारी मेड, आता ही बया इंग्लिशमधून बोलल्यावर त्या बिचारीला काय कळणार? डोंबल!" पण हे माझ्या 'कलिग'ला सांगून काही फायदा नव्हता. कारण तिला मग बया म्हणजे कोण आणि डोंबल म्हणजे काय ते सांगावं लागलं असतं.

पुन्हा गंमत अशी की तिने काही सगळे 'पेपर नॅपकिन्स' वापरले नाहीतच. (खरंतर थोड्याशा चिडक्या आणि औपरोधिक सुरात) मी तिला उरलेल्या कागदांचं काय करणार असं विचारल्यावर म्हणते, "पँट्रीबॉय पिक करून डस्बिन मध्ये थ्रो करेल... डोंट वरी..."




काही दिवसांनी तिचा 'फास्ट' होता. मला म्हणाली, "ममाने 16 सोमवार्स करायला सांगितले आहेत. आज थर्ड आहे. माझ्यासोबत मॅक्डीमध्ये चल ना!" मी चमकलो. म्हटलं की ही 'मॅक्डी'मध्ये जाऊन काय करणार? त्यात मी डबा आणला होता.

"मॅक्डीमध्ये घरून आणलेलं काही खाता येतं का?"

"Yucks! So fool of you! इतके दिवस IT मध्ये असून तू इतका कसा रे बॅकवर्ड? Do you think McD's is a place like that? जाऊ दे. बकअप, मी खूप हंग्री आहे. Rats are running in my stomach like mad!!!"

"पण माझ्या डब्याचं काय करायचं?"

"तुझा टिफिन जाऊ दे बॅगमध्ये... वीऽल सी दॅट लेऽटर. मी तुझा लंच स्पॉन्सर करते."

तरी मी डबा घेऊनच निघालो. म्हटलं जाता जाता माय्क्रोवेववर गरम करूयात. संध्याकाळपर्यंत टिकेल. म्हणजे रात्रीच्या जेवणाचा प्रश्न मिटला.




तिचा 'फास्ट' असल्यामुळे तिने फ्रेंच फ्राइज़ (ह्याला मराठीत बटाट्याचे काप म्हणतात!) घेतले आणि मला बरीच भूक असल्यामुळे मी शाही फ्रँकी (ही म्हणजे आपली गुंडाळी पोळी... फक्त, मैद्याची) घेतली. मग तिकडच्या वेटरने अत्यंत अदबीने सॉस आणून दिला. इतकी अदब पाहून मला एकदम गुदमरल्यासारखं झालं. (आम्हाला आपली 'हाटेला'तल्या फडका मारणाऱ्या पोऱ्याची सवय. असे ब्रँडेड टी-शर्ट आणि स्वच्छ टोपी घालून चकचकीत ट्रेमध्ये काही 'पेपर नॅपकिन्स' आणि सॉस देणारी माणसे पाहिली की मला मी स्वतः इतका गबाळा वाटतो की विचारू नका.) माझी ती फ्रँकी खाऊन होत आली होती. ती आपली एकेक फ्रेंच फ्राय इतक्या नाजूकपणे तोंडात टाकत होती की तो हात तितक्याच नाजूकपणे आपल्या हातात यावा असं क्षणभर मला वाटून गेलं. पण तेवढ्यात आपण कोण आहोत, आपली ऐपत काय ह्याची जाणीव होताच, तिने एखाद्या झुरळाला जितक्या तत्परतेने झटकून द्यावे तितक्याच तत्परतेने मी तो मोहक विचार माझ्या मनातून झटकून टाकला...

मी तिला सहज म्हटलं, "ह्या शाही फ्रँकीचा ऐवज तसा बराच असूनही माझी भूक काही भागली नाही. आणि तुझं ह्या ४०-४५ फ्रेंच फ्राइज़ वर कसं निभावणार?"

"What is ऐवज?"

"ऐवज म्हणजे..." - मला पण प्रश्न पडला की 'ऐवज' ह्या शब्दाचं हिला कळेल असं काय भाषांतर करता येईल? - "ऐवज म्हणजे क्वांटिटी... ही शाही फ्रँकी तशी भरपूर होती तरी मला अजून थोडी भूक आहे आणि तुझं एवढ्याशा फ्रेंच फ्राइज़वर आवरलं?"

"Hey, it's more than enough... and man, today is my fast... ते काय आज्जीबाईसारखं स्वीटपटेटो वगैरे खात बसू काय? So many calories it gives!"

मला वाटलं की ह्या अशा कलरफुल मुलीने थोडंसं कॅलरीफुल खायला काय हरकत आहे. अंगापिंडाने थोडी तरी भरेल... (डोक्याने कधीही भरणार नाही याची खात्री आहे.)




जरा वेळाने आम्ही परत हापिसात जायला निघालो. सहज म्हणून तिला बिल विचारलं, "Why do you care? मी दिलेत ना!"

"अगं, तसं नाही. परत मी कधी एकटा किंवा दुसऱ्या कोणासोबत आलो जेव्हा मला बिल द्यायचं असेल तर साधारण अंदाज पाहिजे ना!"

"बरं! तुझी शाही फ्रँकी होती 105 ची आणि फ्रेंच फ्राइज़ होते 35 चे..."

माझी तर छातीच दडपली. १०५ रुपयांत एक गुंडाळी पोळी? आणि बटाट्याचे ४५ काप ३५ रुपयांचे? ह्या पोरीला आपण मस्तपैकी पेणचे पोह्याचे, बटाट्याचे आणि नाचणीचे पापड खायला घालूयात आणि विचारुयात की हे पापड बरे की तुझे फ्रेंच फ्राइज़? पण आपलं अशा (फ्रेंच फ्राइज़ वगैरे) बाबतीतलं मागासलेपण तिला दिसू नये म्हणून मी गप्प बसलो.




ऑफिसात आल्यावर विचार करत होतो, माणसाच्या हाती पैसा आला की सगळ्या जुन्या आणि तथाकथित 'मागास' गोष्टींशी त्याची नाळ तुटते का? पण झटक्यात एक गोष्ट लक्षात आली... अरे! मी पण ह्याच मुलीच्या ऑफिसमध्ये हिच्याच एवढा पगार घेतोय. आणि माझी तरी नाळ मी अजून शाबूत ठेवली आहे...

तुम्ही कोणावर प्रेम करता

तुम्ही कोणावर प्रेम करता 

तुम्ही कोणावर प्रेम करता या हि पेक्षा,

तुमच्या वर कोणी प्रेम करते याला महत्व आहे,

आनंदात सर्वच जन सहभागी होतात

पण दुखात कोण मागे उभे आहे याला महत्व आहे

रोज आपण कोण नवीन माणसांना भेटतो

पण कोणी नवीन माणूस मनात घर करून राहतो महत्व आहे

प्राजक्त फुलतो आणि व्रूक्षा वरून सरतो,

कोणासाठी नव्हे तर कशासाठी याला महत्व आहे

तसे मनन आपले संवेदनशील असते

पण कोणासाठी रोम रोम शहारतो याला महत्व आहे

आपण रागावतो आपल्या माणसांवरच न

कशासाठी याहीपेक्षा कोणावर याला महत्व आहे

आपण कोणावर प्रेम करता या ही पेक्षा

आपल्यावर कोण प्रेम करते याला महत्व आहे...

एक स्वप्नाळू मुलगी ...





एक स्वप्नाळू मुलगी ...

नुकतीच प्रेमात पडलेली ....
त्याच्या विचारात पुरती हरून गेलेली...."तो स्वप्नातला राजकुमार आपल्याला भेटला असं वाटून ती खूप सुखावली होती.
तिच्या मैत्रिणीनी तिला खूप समज दिली . हि मुलगी वेड्यासारखी अशा माणसावर प्रेम करतेय , ज्याला तिच्या प्रेमाची काहीच खबर नाही . उद्या तो नाही म्हणाला तर ती जीवच देईल याची त्यांना खात्री होती. झालंही तसंच.
एक दिवस जनामांची पर्वा न करता ती त्याला जाऊन भेटली . तिने त्याला सांगून टाकलं कि, "माझ तुज्यावर खूप प्रेम आहे . जीवापाड प्रेम आहे. तुही माझ्यावर तेवढंच प्रेम करतोस न?"
तो मुलगा सरळ नाही म्हणाला आणि निघून गेला .
 हि बिचारी मोडून पडली ...तिच्या आयुष्यात त्या क्षणी सारंच संपलं होत. पण दुसरया दिवशी ती पुन्हा कॉलेजात आली . मैत्रीणीना भेटली तेवा मात्र एकदम नॉर्मल होती. नेहमी सारखी हसत-खेळत होती.
एका मात्रीनीने विचारले कि , " तू इतकी शांत,नॉर्मल कशी? तुला वाईट नाही वाटलं?"
ती म्हणाली ,वाटलं ना , खूप वाईट वाटलं . पण काय म्हणून रडत बसू? तो नाही म्हणाला म्हणून जीव देऊ का? माझ प्रेम खोट नव्हतं. ते त्याला कळलं नाही . तो त्याचा निर्णय घ्याला मोकळा आहे, त्याच्यावर जबरदस्ती कशी करता येईल ?
फक्त वाईट एवढंच कि, ज्या मुलीचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होत तिला तो गमावून बसला.
तोटा माझा नाही, त्याच झालाय .....
ज्याच माझ्यावर प्रेमच नव्हत , त्याला गमावण तसं फार वाईट नाही ..
पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कुणाला कायमच गमावून बसन? ते प्रेम पुन्हा कुठून येईल...

आज हि मी तिला भेटायेला जातो


आज हि मी तिला भेटायेला जातो
आज हि मी तिला भेटायेला जातो,

BREAKUP नंतर सुद्धा, मी तेच क्षण अनुभवायला जातो,

आधी सारखा आज हि मी, तासान तास तिची वाट पाहतो,

फोन करेल ती म्हणून, फोन हातातच घेऊन हुभा राहतो,

अन ती दिसताच, माझा चेहरा फुलू लागतो...


पण पाहता तिला,

आठवतो तो भूतकाळ ....

आठवतं ते झालेलं भांडण,बोललेले शब्द,

भरलेले डोळे आणि BREAKUP नंतर, ती माझी नाही हे कटू सत्य...


तरीहि पाहत राहतो मी तिला, समोरून येताना,

पाणावलेल्या डोळ्याने आठवतो मी, भूतकाळातल्या त्या सोनेरी क्षणांना,

बघते ती मला, पण बोलत काहीच नाही ,

जाते समोरून, पण माझ्यासाठी थांबत नाही?

पुढे जाऊन, मग ती थांबते,

हळूच वळून, माझ्याकडे पाहते ,

भरलेले डोळे, हलकेच पुसते,

अन काहीही न बोलता, ती निघून जाते...




रोज मी तिला पाहतो,अन रोज ती हेच करते,

रोज एकच कोड, माझ्या पुढे ती ठेवून जाते,

काय सांगायच होत तिला, मागे वळून पाहताना?

काय सांगायचं होत तिला, मला असं पाहून जाताना?

काय सांगायचं होत तिला, मला असं पाहून जाताना?

मलाही girl friend मिळावी...!

मलाही girl friend मिळावी...!

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी,
हातात हात घालून फ़िरणारी
मलाही girl friend मिळावी...

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी,
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी...
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी,
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी...

चौपाटीवर पाणीपूरीतून
प्रणयाचेच घास भरवू,
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ,
आयुष्यातील सारी दु:खं
जिच्या सहवासात टळावी,
हातात हात घालून फ़िरणारी
मलाही girl friend मिळावी...

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend...
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी,
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी...!

कॉलेजमधील जीवन

कॉलेजमधील जीवन
असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं

अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी college life बदलवून जातो

मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते
Result येत नसला तरी practical करावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण college मध्ये यायची तयारी असते

असे करता करता......
College ची वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र
विरहाची आसवे देऊन जातात

आयुष्य

आयुष्य

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

वा ..!! रे स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र प्रेमी

वा ..!! रे स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र प्रेमी

केली गुलामी शे-द्दीडशे वर्ष त्यांची
आज ही पाळता तुम्ही संकृती त्यांची ....

स्वःतालच एक प्रश्न विचारा रे
मग अशे 'व्हेलंनटाईन डे' साजरे करा रे ......

आहे आज बापाचा पैसा
उधळता अपाट हवा तसा .....

स्व:त थोडा घाम गाळा
कळेल किंमत पैशाची तुम्हाला.....

आजही करता तुम्ही ह्या गोर्‍याचीं गुलामी .....
कुठे झालात पुर्ण स्वतंत्र तुम्ही ?

सत्तेसाठी झगडणार सरकार ही त्यांनाच कुकरवाळतय
आपली खुर्ची जावू नये म्हणून अस प्रोत्साहन देतय .....

असा अपमान स्वःताचाच करताय कश्याला
अशी संकृती जपतायच कश्याला ......


Poet unknown

" I LOVE YOU "

" I LOVE YOU "


कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं

आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
" I LOVE YOU "

एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.


एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी

Poet unknown

सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?

सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?


आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?


तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!



माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?


''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ

प्रेमाची शान

प्रेमाची शान

एक एक सजने तुझ्या संगे जगने
कल्पना ही किती छान आहे
एक ध्यान देऊन नको जाउ मन मोडून
तूच तर माझा प्राण आहे ;
एक एक सजने तुझ्या संगे जगने
कल्पना ही किती छान आहे
किती सांगू तुला आता कसे समजाउ
तुज्या भोवती आसा मी किती घुटमळत राहू
एकदा तरी मान ना ,मन माझे जान ना
तुला प्रेमाची आन् आहे "
एक एक सजने तुझ्या संगे जगने
कल्पना ही किती छान आहे
जीथे जीथे जातो तेथे तुलाच मी पाहतो
तुज्या स्वप्नमधे दिवस रात्र झुरत राहतो
ए हो म्हणून स्वप्न माझे बनून हीच प्रेमाची शान आहे
एक एक सजने तुझ्या संगे जगने
कल्पना ही किती छान आहे

तुला पाहते मी

तुला पाहते मी

तुला पाहते मी , मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तरिही मनाला, भयाचे भुलावे
कसे मी तुला, आपले रे म्हणावे
तुझी माझी तुलना, जसे नीर क्षीर
तरी वेडी आशा, नि वेडाच धीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तुझे हासणे, चंद्र फुलतो जसा हा
तुझे चांदणे, जन्म वेडा पिसा हा
तुझे स्वप्न सत्यात, भीनले अचानक
जसे शब्द दोह्यात, विणतो कबीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

"एक गुलाब...!"

"एक गुलाब...!"


मी कोमजेपर्यंत राणी तुला...

असाच धुंद सुवास देईन...

नटून थटून केसांत तुझ्या...

प्रीतीचा गं ध्यास घेईन...

रंग तर केव्हाच दिलाय...

एक आणखी भेट खास देईन...

लागलीच धाप तुला कधी...

तर उरलासुरला श्वास देईन...!

यालाच प्रेम म्हणायचं असत.

यालाच प्रेम म्हणायचं असत.

उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.

एकमेका आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.

थोडस झुरण्याला
स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.

भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला
प्रेम म्हणायचं असत.

कितीही रागावल तरी
एकमेका सावरायला
प्रेम म्हणायचं असत.

शब्दातून बरसायला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असत.

तुझ माझ अस न राहता
'आपल' म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत.

प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे....

प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे....




जन्माला आलेल्या प्रत्येकाने
एकदा तरी प्रेम करून पहावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम
होते
पण अपयशाच्या भितीने ते मानातच
राहते
पुढचा विचार सोडून मनातले बोलुन
टाकावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
प्रेमाचा अनुभव हा काही वेगळाच असतो
खऱ्या प्रेमामद्धे काही एक नियम नसतो
प्रेम केले तर ते निस्वार्थी असावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते
शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे

पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत

पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत

जन्माला आला बाळ शाहरुख,
पाळणा हालवी अशोक सराफ
जो बाळा जो जो रे जो जो!!

दुसऱ्या दिवशी आली माधुरी
हसत स्वागत ऐश्वर्या करी
जुहीच्या हातात पाळण्याची दोरी
जो बाळा जो जो रे जो जो!!

तिसऱ्या दिवशी हेमामालिनी
घेऊन आली झबले शिवुनी
लता दीदी छान गायतेय गाणी
जो बाळा जो जो रे जो जो!!

चवथ्या दिवशी रविना आली
बाळाला घाले तब्बू आंघोळी
राणी मुखर्जी आंघोळ घाली
जो बाळा जो जो रे जो जो!!

पाचव्या दिवशी काजोल आली
बाळाला तीट लावू लागली
जयश्री गडकर ने द्रूष्ट काढली
जो बाळा जो जो रे जो जो!!

सहाव्या दिवशी सलमान खान
घेऊन आला रितिक रोशन
पाळणा गातोय अमिताभ बच्चन
जो बाळा जो जो रे जो जो!!

सातव्या दिवशी आला सचिन
शाहरुखची बैट घेला घेऊन
शोएब अख्तर गेला हादरून
जो बाळा जो जो रे जो जो!!

आठव्या दिवशी झालाय वाद
बाळाला भेटायला आले लालूप्रसाद
सोनिया म्हणे मिटवूया वाद
जो बाळा जो जो रे जो जो!!

नवव्या दिवशी आली उषा चव्हाण
गाल गुच्चा बाळाचा गेली घेऊन
प्रीती झिंटाने फुकले कान
जो बाळा जो जो रे जो जो!!

दहाव्या दिवशी आमीर खान
घेऊन आला अजय देवगण
रडवी बाळाला दोघेही जण
जो बाळा जो जो रे जो जो!!

अकराव्या दिवशी गोविंदा आला
म्हणे दादा कोंडके पोटाला आला
फिल्मी दुनियेला आनंद झाला
जो बाळा जो जो रे जो जो!!

बाराव्या दिवशी बारसे झाले
रथी महारथी येऊन गेले
बाळाचे कौतुक करून गेले
जो बाळा जो जो रे जो जो!!

तेराव्या दिवशी बाळ बोलला
गोपा पा पाळणा गाऊ लागला
म्हणे आता लग्नाला चला
जो बाळा जो जो रे जो जो!!










(असेच कुठेतरी ऐकलेले)

ति जेव्हा दिसते तेव्हा....

ति जेव्हा दिसते तेव्हा....

ति जेव्हा दिसते तेव्हा...मी रोकेल चा रांगेत उभा असतो

बिन बाहीच्या मळक्या बनीयान नेमका माझ्या अंगत असतो

गटारितल्या वळनाची छाप माझ्या तिरप्या भांगामधे असते

तरीही स्टाइल माझा शाहरुख खान वानी धुमशान दिसते


सायंकाली ति दिसते त् माझा हाती दळण असते

मांगे तिची आई अन समोर नाली वरच्या गड्यातले वळण असते

नालीवरती बैलेंस करून मी तिला हात देतो

डोक्यावरचा पीठाचा डब्बा निम्मा अंगावर सांडवुन घेतो

माझा काळा चेहरा मग पीठामुळे पांढरा फकट दिसतो

तिच्याकड़े बघतान्ना आमिर पण मग शाहरुख़ सकट असतो


रात्रीच्या वेळी मग जिम मारतान्ना..... खिडकित ती येउन रोज बसते

ओढ़नी आपली कुरवाळित ...माझा फाटक्या मसल्स वर जणु हसते

तिला पाहून एकT तिर्प्या डोल्यान्न ...मग भारी वजन उच्लाव वाटते

उचलतान्ना वजन मग... सलमान भाऊ माझा शरीरात साठते


तिच्या कड़े कुणी पाहीन इतका कुनात दम नाही

मोहल्ल्यात भाऊ इथं .....आपला बी वट काई कम नाही

बारीक़ जरी असलो तरी आपल्या सारखी कुणाची स्टाइल नसते

पण तिने हाक मारली त्या दिवशी नेमका नाकात शेम्बुड असते


कसं बनवाव ईमप्रेशन मला काई कळत नाही

आपल्या ''फुल जिम बोडी स्लिम'' वर ... ते पोट्टी मरत नाही

बोडी बनवून नुसती काई जर... पोट्टी भाऊ पटली असती

तर ऐशवर्या राय आज प्रिये अमिताभ बच्चन ची सुन नसती

तू

तू




तुझ असे सजणे..

जणू जीवाला ह्या वेड लावणे..

काबूत रहाव तुझ्या नेहमी..

असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..

का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..

तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...

दंग होई कुणी असा तुझा साज..

मखमली गालाला नथनीचा बाज..

किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..

पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..

भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..

पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..

ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..

जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..

तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..

जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..

त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..

अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी..








'स्त्री'






सख्यांच्या सहवासात रमनारी ती एक 'मैत्रिण' असते......
तो आपल्याशिच लग्न करेल ना? अशी हुरहुर वाटानारी ती एक 'प्रेयसी' असते.........

नवार्‍याची घरी यायची नेहेमीची वेळ गेली की काळजी करणारी ती एक 'बायको' असते....
मुलाना उशीर झाला की व्याकुलतेने वाट पाहनरी ती एक 'आई' असते.........

बाबांचा राग झेलनारी ती एक 'मुलगी' असते......
भाऊबिजेला भावाकडून भेट मिलाल्यावर आनंद होनारी ती एक 'बहिन' असते............

आयुष्यात अशी नाती जपनारी ती एक ' शेवटी एकटीच असते...

एक वेडी मैत्रीण होती माझी................

एक वेडी मैत्रीण होती माझी................

एक वेडी मैत्रीण होती माझी ,
बोलायला लागली कि आपलंसं करून टाकणार ,
तिचं मन म्हणजे नितळ पाण्याचा झरा ,
स्वतःचा असा रंगच नाही त्याला ,

जो रंग मिसळला त्याच रंगात न्हाऊन निघणारं ,
नकळतपणे त्याच्याशीच एकरूप होणारं ,
तिला एक दिवस विचारलं,
यातले चांगले मित्र कोण कसं ग तुला ओळखता येतं,

तर म्हणे ,
हे रंग तर प्रवाहाबरोबर वाहून जातात ,
त्यांना माझ्यापासून वेगळं करता येतं ,
खरे मित्र तर ते आहेत, जे माझ्याच सारखे असतात ,
माझ्यात एवढं मिसळून जातात कि ,
त्यांना माझ्याहून वेगळं सांगता येणार नाही ,
जसा पाण्याच्या दोन थेंबामधला फरकच करता येत नाही ......