एक तरी सखी असावी
एक तरी सखी असावी,
जीवनी जिने साथ द्यावी..
रूपाने नसली सुंदर,
तरी मनाने मात्र असावी..
... एक तरी सखी असावी,
सोबत तिची कायम असावी,
अबोल असेल तरी,
गाली लाली मात्र असावी..
एक तरी सखी असावी,
दुखःत सुखात साथ करावी..
असतील वेदना, जखमा,
हळुवार फुंकर घालावी..
एक तरी सखी असावी,
आयुष्याची भ्रांत नसावी..
निजता तिच्या मांडीवर,
सुखाची झोप लागावी,
प्रत्येकाला अशी,
एक तरी सखी असावी..
एक तरी सखी असावी,
जीवनी जिने साथ द्यावी..
रूपाने नसली सुंदर,
तरी मनाने मात्र असावी..
... एक तरी सखी असावी,
सोबत तिची कायम असावी,
अबोल असेल तरी,
गाली लाली मात्र असावी..
एक तरी सखी असावी,
दुखःत सुखात साथ करावी..
असतील वेदना, जखमा,
हळुवार फुंकर घालावी..
एक तरी सखी असावी,
आयुष्याची भ्रांत नसावी..
निजता तिच्या मांडीवर,
सुखाची झोप लागावी,
प्रत्येकाला अशी,
एक तरी सखी असावी..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा