तुम्ही कोणावर प्रेम करता

तुम्ही कोणावर प्रेम करता 

तुम्ही कोणावर प्रेम करता या हि पेक्षा,

तुमच्या वर कोणी प्रेम करते याला महत्व आहे,

आनंदात सर्वच जन सहभागी होतात

पण दुखात कोण मागे उभे आहे याला महत्व आहे

रोज आपण कोण नवीन माणसांना भेटतो

पण कोणी नवीन माणूस मनात घर करून राहतो महत्व आहे

प्राजक्त फुलतो आणि व्रूक्षा वरून सरतो,

कोणासाठी नव्हे तर कशासाठी याला महत्व आहे

तसे मनन आपले संवेदनशील असते

पण कोणासाठी रोम रोम शहारतो याला महत्व आहे

आपण रागावतो आपल्या माणसांवरच न

कशासाठी याहीपेक्षा कोणावर याला महत्व आहे

आपण कोणावर प्रेम करता या ही पेक्षा

आपल्यावर कोण प्रेम करते याला महत्व आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: