एक प्रेयसी पाहिजे......

एक प्रेयसी पाहिजे......

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

का कळेना आज काल मन का कुठे रमेना.!

का कळेना आज काल मन का कुठे रमेना.!


का कळेना आज काल मन का कुठे रमेना
काही केल्या कशात हि जीव लागेना

का कळेना तुझ्यात मी गुंतलो
जग हे सारे मी विसरलो

का होते अशी हि जीवाची होरपळ
तुला आठवताच होते मनात का आठवणीची धावपळ

का कळेना एकटाच मी गालात हसतो
बालिश रूप तुझे ते मनाच्या आरश्यात मी पाहतो

का कळेना तुला माझे वागणे वेड्या सारखे
सारे कळून देखील का वागतेस परक्या सारखे

तुझ्या विना दुसरे काही सुचेना ...
करू काय मी काही कळेना.


तिच्या माझ्या प्रेमाला तोड नाही कशाची..!

तिच्या माझ्या प्रेमाला तोड नाही कशाची..!


तिच्या माझ्या प्रेमाला
तोड नाही कशाची
कितीही चमकला इंद्रधनू तरी
सर नाही त्याला तिच्या नखाची . .

वसंत ही बहरत असेल
पण तिच्या सारखी तिच
केसात माळत नाही फुल कधी
पण बहरलेली तिच . .

श्रावण कधी आला कधी गेला
हे मला कळतच नाही
कधी हसते कधी रुसते
मी मात्र तिच्या शिवाय
कुणाला वळून पाहत नाही . .

तिच माझी दुनिया
परीघ प्रेम वर्तुळाचा
चैत्र . . वैशाख तिच माझा
ऋतू प्रेम पावसाचा . .


तुला पाहिलं की..!

तुला पाहिलं की..!

तुला पाहिलं की
अस काय होऊन जातं
माझं मन मला
कसं विसरून जातं
तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरवून जातं
तुला घेवून मन
नभात उडून जातं
तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जातं
त्या रेशीम जाळ्यात
मन गुंफून जातं
तुझ्या गोड हसण्याणं
मन फसून जातं
गालावरच्या खळीवर
मन खिळून जातं
तुला पाहिलं की
मन वेड होतं
कळत नाही कसं
मनात प्रेम उमलून जातं


तुझा चेहरा....!

तुझा चेहरा....!

तुझा चेहरा मी

हृदयात ठेवून घेतलाय

माझ्या नसानसात

तो साठवून घेतलाय

उगीच नाही रस्त्यावर

मी एकटा हसत

चालता चालता तुलाच

मी असतो बघत

लोकांना उगीच वाटत

माझे ओठ कसे हलतात

मी एकटा असूनही

ते कुणाशी बोलतात

फक्त मला माहित असत

तू आहेस माझ्या सोबत

कुणालाही कशी कळेल

हि प्रेमाची रंगत.

ती दिसली मला......

ती दिसली मला......

कालचं ती दिसली मला
पाहून गोड हसली मला..

मी मात्र हसलो नाही
तिच्याशी काहीच बोललो नाही..

ती मात्र बोलत होती
मी काहीतरी बोलेल याची वाट पाहत
होती..

खूप काही आठवत होते
डोळे चिम्ब भिजले होते..

अश्रू काही पडत नव्हते
पण मनात तलाव साठत होता..

काही शब्दच फुटत नव्हते
काय बोलावे काही समजत नव्हते..

तयार होती ती कुठेतरी जाण्यासाठी
मनात बोलतं होतो मी थाब ना गं..
माझ्यासाठी..

असा मनात विचार आला म्हणून
स्वःतावरचं चिडत होतो..

आम्ही आता एकत्र नाही हेचं
मी विसरलो होतो..

बघता बघता गेली ती निघून
पुन्हा गेल्या त्या जखमा भिरून..

बरं झालं असतं ती दिसलीच नसती
मला पाहून हसलीचं नसती.


नाही गरज मला कोणाची......

नाही गरज मला कोणाची......


नाही गरज मला कोणाची म्हणत,
स्वतःलाच कितींदा
फसवायचं..??

छोट्याश्या या आयुष्यात,
कितींदा कोणावर रुसायचं..???

नजरेआड ऐकीव गोष्टीनी

गैरसमज पसरणारच,

स्वच्छंद बागडताना,

मन थोडंस तरी भरकटणारच

ऊन पाऊस झेलताना,

कधी तरी छप्पर फाटणारच

आपल्या नाकर्तेपणाच खापर,

नशिबावर परत फोडणारच

नव्या व्यथा कथांची

शिदोरी,

आयुष्यात शेवटी अपुरीच

ठरते

जग तेव्हाच नावाजते

जेव्हा मन हरलेला डाव

निर्धाराने लढते...!


मुलींचं आपलं बरं असत..........

मुलींचं आपलं बरं असत..........

मुलींचं आपलं बरं असते,
तिला आठवण
आली की,
तिने फक्त रिंग
मारायची असते..
कमी काँल रेट्सचे सीम
कार्ड सुद्धा,
त्यानेचं दिलेले असते..
म्हणूनचं म्हणतो,
मुलींचं आपलं बरं असते..
त्याला राग आला,
तर
तिने फक्त
गालातल्या गालात
हसायचे असते..
पण
तिच्या रागावन्यावर
तो हसला,
तर
हसतोस काय मुर्खा ?
अशी ओळ तयार
असते..
म्हणूनचं म्हणतो,
मुलींचं आपलं बरं असते..
त्याला उशीर झाला तर,
त्याच्यासाठी
तक्रारींची लिस्ट तयार
असते..
आणि तिला उशीर
झाला तर,
दमुन आली असेल
बिचारी
म्हणून त्याने तिची बँग
धरलेली असते..
म्हणूनचं म्हणतो,
मुलींचं आपलं बरं असते..
तिच्या अगदी आळस
देण्याच्या सवईला
पण,
त्याची वाह वाह असते..
तो सुंदर हसला तरी,
हसू नको बावळट दिसतोयस
अशी तिची दाद असते..
म्हणूनचं म्हणतो,
मुलींचं आपलं बरं असते..
भेटून निघताना उशीर
झाला तर,
चल जाते मी असा तिने म्हणायचे
असते..
बस गं जाशील आरामात सोडीन,
मी घरी असे बोलून
त्यानेचं थांबवायचे असते..
म्हणूनचं म्हणतो,
मुलींचं आपलं बरं असते..
मुलींचं आपलं बरं असते..


तू आणि मी,अशी फक्त कल्पना असावी

तू आणि मी,अशी फक्त कल्पना असावी

तू आणि मी,अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला, एकांताची साथ असावी

गुलमोहराचा बहर,आणि तिथेच आपली भेट असावी
जसे एखाद्या पाखराची,गोड ड्रीम डेट असावी
...

तू मात्र आवडत्या,आकाशी रंगाच्या पोशाखात असावी
आकाशालाही हेवा वाटावा ,इतकी तू सुंदर दिसावी

रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,प्रेमाची पण ओढ असावी
एकमेकात गुंतून जाताना,परतीची मात्र तमा नसावी निरोप घेताना डोळ्यां मध्ये,

अश्रुची एक झलक दिसावी डोळ्यां मधले भाव जाणुनी,

नाजुकशी ती मिठी असावी जीव ओतला तुझिया पाई,

आशा तुझीही हीच असावी एकांताची साथ अशी हि, दरवेळी रम्य असावी.


तुझे माझे नाते

तुझे माझे नाते


आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्यादुनिये त मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हेजाते
"कृष्ण, कृष्ण"करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेचगाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गात

अशीच यावी वेळ

अशीच यावी वेळ

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नीदेखील नसताना

असे घडावे अवचीत् काही तुझ्यासमीप असताना

अशाच एका संध्याकाळी एकांताचीवेळ अचानाक

जवळ् नसावे चिट्ट्पाखरु केवळ् तुझीन्

माझी जवळीक

संकोचाचे रेशीम पडदे हा हा म्हणताविरुन जावे

समय सरावा मंदगतीने अन प्रितेचेसुर जुळावे

मी मागावे तुझीयापाशी असे काहीसेनिघताना

उगीच करावे नको नको तु हवेहवेसेअसताना

शब्दावाचुन तुला कळावे गुज मनी यालपलेले

मुक्तपणे तु उधळुन द्यावे

जन्मभरीचेजपलेले…. —