तुझा चेहरा....!
तुझा चेहरा मी
हृदयात ठेवून घेतलाय
माझ्या नसानसात
तो साठवून घेतलाय
उगीच नाही रस्त्यावर
मी एकटा हसत
चालता चालता तुलाच
मी असतो बघत
लोकांना उगीच वाटत
माझे ओठ कसे हलतात
मी एकटा असूनही
ते कुणाशी बोलतात
फक्त मला माहित असत
तू आहेस माझ्या सोबत
कुणालाही कशी कळेल
हि प्रेमाची रंगत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा