नाही गरज मला कोणाची......
नाही गरज मला कोणाची म्हणत,
स्वतःलाच कितींदा
फसवायचं..??
छोट्याश्या या आयुष्यात,
कितींदा कोणावर रुसायचं..???
नजरेआड ऐकीव गोष्टीनी
गैरसमज पसरणारच,
स्वच्छंद बागडताना,
मन थोडंस तरी भरकटणारच
ऊन पाऊस झेलताना,
कधी तरी छप्पर फाटणारच
आपल्या नाकर्तेपणाच खापर,
नशिबावर परत फोडणारच
नव्या व्यथा कथांची
शिदोरी,
आयुष्यात शेवटी अपुरीच
ठरते
जग तेव्हाच नावाजते
जेव्हा मन हरलेला डाव
निर्धाराने लढते...!
नाही गरज मला कोणाची म्हणत,
स्वतःलाच कितींदा
फसवायचं..??
छोट्याश्या या आयुष्यात,
कितींदा कोणावर रुसायचं..???
नजरेआड ऐकीव गोष्टीनी
गैरसमज पसरणारच,
स्वच्छंद बागडताना,
मन थोडंस तरी भरकटणारच
ऊन पाऊस झेलताना,
कधी तरी छप्पर फाटणारच
आपल्या नाकर्तेपणाच खापर,
नशिबावर परत फोडणारच
नव्या व्यथा कथांची
शिदोरी,
आयुष्यात शेवटी अपुरीच
ठरते
जग तेव्हाच नावाजते
जेव्हा मन हरलेला डाव
निर्धाराने लढते...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा