मिटलेली मैत्री

मिटलेली मैत्री

मिटलेली मैत्री
मिटलेलीच असू द्यावी
उमलली कधी तर
अलगद उमलू द्यावी

मिटलेपणात ही

ती मैत्रिच असते
सुखद स्मृतीचे
पराग हुंगित असते

उचकटून तिला
उगा मरू नको
जपला गंध कोष
उगा जाळू नको

मागुन कुणालाच
कधी मैत्री मिळत नाही
वठलेल्या फांदीवर
फुल कधीच उमलत नाही

ज्याला लोक
जमवलेली मैत्री म्हणतात
त्यांच्या डोक्यात फ़क्त
फायद्याचे हिशोब असतात



चंद्राची चांदणी मला पाहून हसली...


चंद्राची चांदणी मला पाहून हसली...

चंद्राची चांदणी मला पाहून हसली...

तिला पाहताच मला एक कविता सुचली...

कविता करता करता,

कळलच नाही कधी, रात हि सरली....

अन त्या कवितेत,

माझ्याच नकळत...


माझ्या कल्पनेतली ती,

मला पाहून हसली... .

माझ्या कल्पनेतली ती,

मला पाहून,

खुदकन हसली.....

हे फक्त माझ्याचसोबत


हे फक्त माझ्याचसोबत

हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच

तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे !

आठवण माझी आली कधी


आठवण माझी आली कधी

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षनान्म्धले
संवाद जरा आठवून बघ.

आठवण माझी आली कधी

तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.

आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.

आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या रात्र घेतलेल्या शपथेचा
शब्द न शब्द आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश लाटेच वीव्ह्लन बघ.

आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.

फक्त एकदा सांग तुला

 
फक्त एकदा सांग तुला

फक्त एकदा सांग तुला,
माझी आठवण येते का?

एकदा मला पाहण्यासाठी, तुझ हि मन झुरत का?

... नाजूक तुझ्या ओठांनी कधी माझ नाव घेतेस का?


मला आठवताना कधी जग विसरून जातेस का?

नसतानाही मी तुझ्यासंगे आहे समजून बोलतेस का?

एकांतात येणारा आवाज तू माझा समजून ऐकतेस
का?

जगाच्या या गर्दीमध्ये मला कधी शोधतेस का?

अनोळखी नाजूक स्पर्श कधी माझा समजून जपतेस
का?

चाहूल माझी लागल्यावर वाटेवरती थांबतेस का?

कोणी नाही जाणून सुधा मागे वळून पाहतेस का?

फक्त टाईमपास करत जगत होतो....!


फक्त टाईमपास करत जगत होतो....!

फक्त टाईमपास करत जगत होतो,

मित्रांमधे वेळ घालवत होतो...
रोजचेच सुरु होते हे.
कधी आयुष्यात तु आलीस,
सगळं हळुहळु बदलुन गेलं,
समजलच नाही.......

प्रेम काय ते समजले,
काळजी का वाटते ते जाणले..
सारं काही तर नातंनकळत
तुझ्याशीच जमल होत, 
समजलच नाही....
आणि मधेच अशी सोडुन गेलीस
की अनोळखी आपण,
अस फसवलस की विश्वासच
उरला नाही दुसर्यावर
आणि स्वतःवरपण....
माझी ती जुनी lyf च बरी होती गं..
नसतीस आली तर बर झाल असत...
आता ती lyf परत येण पण
शक्य नाही आणि तुही......

नविन कविता लिहायची आहे


नविन कविता लिहायची आहे...

नविन कविता लिहायची
आहे तर शब्द मिळत नाही

आणि शब्द मिळाले तर
ते मांडता येत नाही
...

काय करायचं
डोक्यात अनेक विचार आहेत

पण त्या विचारांना
त्या शब्दांशिवाय तोड नाही

कधी एकांतात बसतो
तेव्हा काहीच सुचत नाही

जाणवते ते सुद्धा
एकटेपणाचे अस्तित्वं

जसा जीव टांगनीला लागला आहे
पण त्याचा ही काही उपयोग नाही

नविन कविता लिहायची
आहे तर शब्द मिळत नाही

आणि शब्द मिळाले तर
ते मांडता येत नाही

पाहिलेस का कधी...?



पाहिलेस का कधी...?

पाहिलेस का कधी...?
हृदय फाटताना
डोळ्यातील अश्रू डोळ्यातच गोठ्ताना....

पाहिलेस का कधी...
शब्द अर्थ हरवताना

ओठावरती येताच
शब्दांना मुके होताना....

पाहिलेस का कधी....
अनेक वादळे आणि
डोळे कोरडे असताना
आणि मन रडताना

पाहिलेस का कधी...
श्वास-स्पंदने सुरु असूनही
क्षण-क्षणाला मरताना
आठवणीच्या सरणावर रोज जळताना

कसे पाहशील तू .....?
मी पहिले आहे
तू मला सोडून जाताना
प्रेम..माझे अधुरे राहताना .

मलाही वाटत


मलाही वाटत

मलाही वाटत
 तुझ्या सारख जगाव
मलाही वाटत
तुझ्या सारख जगाव
कितीही दुख्खी असलो
तरीही इतराना आनंदी दिसाव


वाटल होत आहे आपल
साता जन्माची साथ
तू तर गेलीस सोडून
कायमचा माझा हाथ

आजही होतो प्रत्तेक क्ष्यनि
तू सोबत असल्याचा भास्
तुला का बर नाही
मला भेटण्याची आस

रहात नव्हतीस
सोडून मला एकही क्ष्यण तू
तुला सोडून जाणार नाही कुठेही
असाही म्हनायचिस तू

मग तुझा का
न भेटण्याचा अट्टाहास असा
आवाज देऊन तुला
कोरडा पडला माझा घसा

पाहतो आजही मी
तू माझ्याकडे येण्याची वाट
साद देशील परत तू
येइल का कधी अशी एखादी पहाट ..........?

येईल अशी एक वेळ


येईल अशी एक वेळ

येईल अशी एक वेळ
माझ्या प्रेमाची जाणीव तुला होईल
मला भेटण्यासाठी मग
तूझ्या नजराही आतुर होईल
म्हणशील तेव्हा तुझी आठवण येते रे ....!!
आज वेळ आहे बघ

वाटेवर तुझ्या मी उभा आहे
अश्याच एक दिवशी तू उभी राहशील
पण उशीर झाला असेल तेव्हा
मला तू थीरडी वर पाहशील
म्हणशील तेव्हा तुझी आठवण येते रे....!!
तेव्हा तुला जाणीव होईल
माझ्या खरया प्रेमाची
जाणीव होईल माझ्या एकटे राहण्याची....
मग तू माझ्या मागे येशील ही
मला हाक देत तू तेव्हा रडशील ही
पण मी गेलो असेल
माझीही इच्छा होईल तेव्हा तुला भेटण्याची
पण ...??
जीव माझा कुणाच्या तरी हातात असेल
म्हणशील तेव्हा तुझी आठवण येते रे ....!!
काही दिवस जातील मग तुझे लग्न होईल
खुश अशील तेव्हा त्या तुझ्या संसारात
पण माझ्या नसण्याची जाणीव
सतत तुला जाणवेल
म्हणशील तेव्हा तुझी आठवण येते रे....!!
दुसर्याच्या मिठीत असताना
जेव्हा तुझ्या डोळ्यांतले पाणी
माझ्यासाठी वाहेल
तेव्हा तुला जाणीव होईल
माझ्या खरया प्रेमाची
म्हणशील तेव्हा तुझी आठवण येते रे....!!

गरज

गरज 


जेव्हा मला तुजी खरी गरज होती..

तेव्हा तू सोबत कधीच नव्हतीस..

जेव्हा तुला माजी गरज होती..


मी तुज हात कदीच सोडला नव्हता..

तू मात्र अपेक्षा ठेऊन प्रेम केलेस..

मी तशी अपेक्षा ठेऊन कधीच नाही केले..

म्हणून तू सोबत असताना जितके प्रेम करत होतो..

त्यापेक्षा जास्त प्रेम तू सोबत नसताना करत आहे..

माजी साथ आज हि तुज्या सोबत आहे..

कारण मला जाणीव आहे..

आपल्या माणसाशिवाय जगणे किती अवघड आहे..

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे


आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे

म्हणजेच प्रेम नसते

रोज रोज"आय लव्ह यु"म्हणणे


म्हणजेच प्रेम नसते

तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे

ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे

कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..त्यांचे मन किती हि दुखावलेत...

तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...

ते केवळ"तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...."

हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे"खरे सोबती...."

हेच खरे प्रेम आहे.........

हाच खरा विश्वास आहे ...आणि हेच जीवन आहे..

खरे आहे ना?