नविन कविता लिहायची आहे...
नविन कविता लिहायची
आहे तर शब्द मिळत नाही
आणि शब्द मिळाले तर
ते मांडता येत नाही
...
काय करायचं
डोक्यात अनेक विचार आहेत
पण त्या विचारांना
त्या शब्दांशिवाय तोड नाही
कधी एकांतात बसतो
तेव्हा काहीच सुचत नाही
जाणवते ते सुद्धा
एकटेपणाचे अस्तित्वं
जसा जीव टांगनीला लागला आहे
पण त्याचा ही काही उपयोग नाही
नविन कविता लिहायची
आहे तर शब्द मिळत नाही
आणि शब्द मिळाले तर
ते मांडता येत नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा