फक्त एकदा सांग तुला
फक्त एकदा सांग तुला,
माझी आठवण येते का?
एकदा मला पाहण्यासाठी, तुझ हि मन झुरत का?
... नाजूक तुझ्या ओठांनी कधी माझ नाव घेतेस का?
मला आठवताना कधी जग विसरून जातेस का?
नसतानाही मी तुझ्यासंगे आहे समजून बोलतेस का?
एकांतात येणारा आवाज तू माझा समजून ऐकतेस
का?
जगाच्या या गर्दीमध्ये मला कधी शोधतेस का?
अनोळखी नाजूक स्पर्श कधी माझा समजून जपतेस
का?
चाहूल माझी लागल्यावर वाटेवरती थांबतेस का?
कोणी नाही जाणून सुधा मागे वळून पाहतेस का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा