ती फक्त तुझीच राहील


ती फक्त तुझीच राहील

सर्व प्रेमपत्रे देऊन गेली
सर्व आठवणी विसर म्हणाली
परत नाही येणार कधीच, जाते म्हणाली
सखी हृदय मात्र परत द्यायची विसरली.
ती असं का वागली?
ती असं का बोलली?
तिच्या हृदयाने मग माझी
असी समजूत काढली.
"ती तुला नाही विसरली
तुझ हृदय घेऊन ती गेली
मला तुझ्याजवळ सोडून गेली
पहिल्या प्रेमाची निशाणी ठेऊन गेली.
ती पुन्हा परत येईल
तुझा हृदय तिला घेऊन येईल
प्रेमाचा वर्षाव पुन्हा होईल
ती फक्त तुझीच राहील
ती फक्त तुझीच राहील

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे डोळ्यासमोर
झालेली चोरी...

पण???

हि चोरी नेमकी कधी होते
कशी होते
समजतच नाही..

आणि???

जे चोरीला गेल आहे ते
परत मागवसही वाटत
नाही..

आणि???

ज्यांनी ते चोरलय
त्याल्या भेटल्या शिवाय
चैनच पडत नाही....... ♥♥♥
.
.
खरं आहे ना???

खास मैत्रीण...

खास मैत्रीण...


कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,
पण जी आपल्याला पाहुन सुंदर smile देते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.

जी आपल्याला रोज SMS करते,
आणि जिच्या SMS la आपल्याला पण छान Reply द्यावसा वाटतो ना,
ती आपली खास मैत्रीण असते.

जिच्याशी बोलताना आपल्याला खूप मजा येते,
पण तिच्या नजरेला नजर देऊन आपण कधी बोलू शकत नाही,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.

तिची पण अवस्था काही निराळी नसते,
कारण, ती पण आपल्याशी बोलणे टाळत असते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.

ती कधी कॉलेजला नाही आली तर,
जीची आपल्याला विचारपूस करावीशी वाटते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.

कधी मित्रमैत्रिणींशी बोलताना जी आपली
बाजू घेऊन बोलते ना,
ती आपली खास मैत्रीण असते,

जिच्या प्रेरणेमुळेच आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,
आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,
छान होती... अशी एक दाद देते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.

आज-काल मैत्री करायची देखील भीती वाटते



आज-काल मैत्री करायची देखील भीती वाटते

आज-काल मैत्री करायची देखील
भीती वाटते,
कारण....
कुणाशी तरी आपल्याला ती, नकळतच
बांधून टाकते...
बांधलेले धागे ते मग, सहजा-सहजी तुटत
नाहीत....
भावनांचे पीळ , काही केल्या सुटत नाहीत...
सुटले पीळ, तुटले धागे तरी,
तरी ते जखमा देऊन जातात...
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या,
ओलावा ठेऊन जातात...
ओलावा त्या डोळ्यांतला,
लपवू पाहता लपत नाही...
घट्ट मिटले किती हि डोळे, थेंब
ओघळल्या शिवाय राहत नाही...
आणि मग...!
का केली हि मैत्री अशी...?
हा प्रश्न मनाला सतावत राहतो...
तरी हि मी सदैव असाच,
मैत्री तुझ्याशी करत राहतो..

प्रेम

प्रेम

हसली की फसली असं मुलं 
समजतात,
येथेच मुलींसमोर ते खुळे 
ठरतात,

ते मुलींचं मन आहे हे ते 
विसरतात,
उगीच मनास वेड लावून 
नभी उंच उडतात,

पण तेच बिच्चारे अन वेडे 
ठरतात,
जेव्हा मुली त्यांना मित्र 
आहे 
सांगतात

मुलीच हल्ली मुलांना मस्त 
उल्लू बनवतात,
एकावेळी कितीजणांना वेडी 
आशा लावतात,

मुले नुसतेच मुलींना 
स्वप्नात घेऊन फिरतात,
म्हणूनच मुली अभ्यासात 
मुलांच्या पुढे असतात,

मुलांनी मुलींच्या मागे 
नुस्तच धावायचं नसतं,
तीच मन ओळखल्याशिवाय 
प्रेमात पडायचं नसतं,

प्रेमात पडलं तरी करियर 
घडवायचं असत,
कारण त्यामुळेच तर जीवन 
सुंदर होणार असत........

एक दैवी शक्ती असावी लागते


एक दैवी शक्ती असावी लागते

खूप काही मिळविण्यासाठी
एक दैवी शक्ती असावी लागते
,

सगळयांकडेच ती नसली तरी
काहींना ती मिळ्वावी लागते.

ओंडक्याचा आधार घेऊन पैलतीरी जाताना
माञ शक्कल थोडी लढवावी लागते.

नशिबाची साथ कदाचित नसेल तरीही;
पाठीवर कोणाच्यातरी हाताची गरज भासते.
प्रश्न सरळ सोपा असताना उत्तर माञ मिळत नसते.

कॉलेज मधली ती


कॉलेज मधली ती 

कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..

त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."

एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली

शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली

तुझी अठावन म्हणजे


तुझी अठावन म्हणजे

तुझी अठावन म्हणजे
मोरपिसाचा हळूवार स्पर्श

तुझी अठावन म्हणजे
नकळत निर्माण होणारा हश्र

तुझी अठावन म्हणजे
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव

तुझी अठावन म्हणजे
विरह सागरात हरवलेली नाव

तुझी अठावन म्हणजे
आयुष्य जगण्याची आशा आणि

तुझी अठावन म्हणजे
गमवलेल्या गोष्टींची निराशा

तुझी अठावन म्हणजे
पावसात चिंब भिजणं

तुझी अठावन म्हणजे
ओसाड वाळवंटात एकटच भटकणं

तुझ्या आठवणीं शिवाय
आयुष्यच अर्थहीन आहे

तुझ्या आठवणींचा सहवास
हाच माझ्या आयुष्याच रंग आहे...

विसरून जाव म्हटल तुला........

विसरून जाव म्हटल तुला........


विसरून जाव म्हटल तुला
पण विसरताच आल नाही
आज ही तुला आठवल्या शिवाय
पाउल पुढ़ जात नाही
खुप अपमान केलास
खुप तमाशा केलास
नकों तेवढ वाईट बोलून
सभ्य पणाचा आव आनलास
भातुकलीच्य खेला सारखा
खेळ तू खेळलिस
आणि
अर्ध्यावरती डाव सोडून
भांडून निघून गेलीस
खोट होत सगल
खोट तुझे बहाने
खोट्या आना बाका
आणि खोटी होती वचने
बघ खर प्रेम करून कोणावर
कलेल प्रेम काय
असत
आणि एखाद्याच्या विरहात
जगन किती कठिन असत
कितेक रात्री रडून काढल्या
कितेक रात्री उपाशी राहिलो
वाटल सोडून जाव सग्ल्यान्ना
निरोप घ्यावा जगाचा
पण कसा बसा सावरलो
निर्धार केला तुला विसरन्याचा
पण कितीही प्रयत्न केले
तरी विसरता आलच नाही
आणि तुझ्या
बरोबरच्या गोड क्षनाना
आठवल्या शिवाय दिवस
जातच नाहीत......

तुझ्यासाठी काही पण

तुझ्यासाठी काही पण


तुझ्यासाठी काही पण

असे सारेच बोलतात,

पण मी तसे बोलणार नाही..

चंद्र तारे तोडून आणीन

अशी भाषा कधी

मी वापरणार नाही,

इतकच म्हणेन मी

तुझ्या सुखाशिवाय मनात

काहीच असणार नाही.

तुझ्या वेदना ओंजळीत घेईन

दुखातही तुझी साथ

कधी सोडणार नाही,

प्रेमासाठी काही पण

हे तुला दाखवल्याशिवाय

मी रहाणार नाही,

तुझ्यावर इतकं केलय प्रेम

कि माझ्यावरही कधी

इतकं प्रेम मी केलं नाही

माझ्यावरही कधी

इतकं प्रेम मी केलं नाही........

आपली मैत्री..........

 आपली मैत्री..........

मैत्री वरील आपले प्रेम
नेहमी असेच फुलत रहावे
तू नेहमी हसत रहाविस
आणि तुला हसवत मी रहावे..
-
कधी तू रुसून बसाविस
कधी मीही रुसून राहीन
रुसूनही सुद्धा मग आपण
एकाच वेळी सॉरी बोलावे..
-
कधी तू खोटं बोलावेस
मी ऐकत राहीन तुला
कधीतरी मीही बोलेन
तेंव्हा माफ़ कर मला..
-
डोळ्यांतुनी तुझ्या कधी
मी अश्रु ढाळू देणार नाही
आले जरी कधी चुकून
मातीमोल होवू देणार नाही..
-
पुढे काळही संपून जाईल
आणि शेवटी वेळही संपेल,
पण तरीही निरंतर राहील,
ती फक्त आपली मैत्री............

आता फक्त वाट पाहतोय..

आता फक्त वाट पाहतोय..

वाट पाहतोय अल्लड क्षणांची 
स्वप्नातल्या तुझ्या सोबतीची 
न उमगलेल्या अनामिक नात्याची 
भूरळ पडणाऱ्या त्या हास्याची 

वाट पाहतोय तुझ्यात हरवून जाण्याची 
मिठीत तुझ्या सहज विरून जाण्याची 
निवांत तुझ्या कुशीत निजण्याची 
नितांत बडबडनारे होठ पाहण्यची 

वाट पाहतोय माझी होण्याची 
हळुवार पाऊलांनी तुझ्या येण्याची 
अनामिक्तेला एक नाव देण्याची 
फक्त तुझाच होऊन जाण्यची 

आता फक्त वाट पाहतोय..
आता फक्त वाट पाहतोय..
तुझी त्या क्षणांची आणि माझी..
आता फक्त वाट पाहतोय.

माझी ऑनलाइन मैत्रीण...!

माझी ऑनलाइन मैत्रीण...!

माझी ऑनलाइन मैत्रीण...!
कविता पोस्ट करता करता
अशीच एकीशी ओळख झाली...

तिच्या कवितेला रिप्लाय देता देता
ही ओळख फ्रेंड रिक्वेस्ट पर्यंत जाउन पोहचली...

फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली
फेसबुकवर वर आमची एक-मेकाशी बोलायला सुरुवात झाली,
एक-मेकांची ओळख पटताच
मन आमची एक-मेकाना ओळखु लागली ....

बोलणे आमचे दरोज होत होते,
मन आमचे तेवढेच जवळ येत होते...

एखाद्या ओळखिच्या व्यक्तीने प्रेम न द्यावे,
त्याहुन अधिक एक अनोलखी व्यक्ति ने आपल्यावर प्रेम करावे....

तिच्या विचारताच रात्र घालवावी....
सकाळ होताच ती ऑनलाइन येण्याची वाट पहावी..

ती आल्यावर कालचा दिवस कसा होता याची विचारपूस करावी
तिच्याशिच आधी बोलून मग आपल्या दिवसाला सुरुवात करावी..

ऑफिस नंतर ही तिच्याशी बोलायची अफाट इच्छा व्हावी
पण तिला तिचा नंबर मागायची हिम्मत न व्हावी..

दरोज बोलायची आपल्याला सवय लागावी
पण ही सवय मनाला आनंदायी व्हावी..

तिच्याशी बोलताच सार्या दुखाचा विसर पडावा
नव्याने पुन्हा जगायचा जोश जणू अंगात यावा..

फिरत होतो सर्वत्र एक मैत्रीसाठी
देव आहे दुनियेमधेय पाठवले तिला माझ्यासाठी...

आवडत मला...

आवडत मला...

आवडत मला...
सायंकाळी समुद्र किनारी फ़िरायला
ओल्या वाळू वर अलगदपणे
पावलं टाकायला.
खुप मज्जा येते ज्या
वेळी ती ओली वाळू
तळपायांना हळूवार स्पर्श करते.
आवडत मला...
त्याच वाळूवर काही
वेळ बसुन त्या मावळत्या
सुर्याकडे एकटक बघत बसायला.
आवडत मला ...
त्या समद्रात बुडणारया
सुर्याकडे पहात पहात
गेलेले दिवस आठवत बसणे.
आवडत मला...
बुडलेल्या सुर्याला
पाहता पाहता
ऊद्या च्या नविन
किरणांची वाट पाहायला..

प्रेम.............



प्रेम.............



रात्री जागून विचार करणं प्रेम
नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम
असतं..

...हातात हात धरुन चालणं प्रेम
नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम
असतं..

गुलाबाचं फुल देणं प्रेम
नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम
असतं..

तिला हसवणं म्हणजे प्रेम
नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम
असतं..

तिला नेहमी सावरणं प्रेम
नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम
असतं...

एक अनोळखी ...



एक अनोळखी ...

एक अनोळखी ...
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती ...
ना नाव माहिती होते ...
ना गाव माहिती होते...

तरी पण का वाटतंय ..
भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ..
समजलच नाही मी तुज झालो कधी..

एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले नाते विसरू नको..

एका मुलीने देवाला विचारलं............

एका मुलीने देवाला विचारलं............


एका मुलीने देवाला विचारलं प्रेम काय असत?
.
देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये.
.
ती मुलगी फूल आणायला गेली ,
तिला एक फूल आवडल,
.
पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
.
पण, तिला चांगल फूल नाही मिळालजेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली
.
तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला ,
.
तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव
म्हणाला
.
"हेच आहे प्रेम"
.
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .
तेव्हा त्याची कदर नाही करत ,
.
पण, जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते...

मी ही कुणावर ............

मी ही कुणावर ............


मी ही कुणावर मनापासून
जिवापाड प्रेम केलं होतं,
तिला ह्रदय काय पैसा काय
अडका काय जिवनचं माझं दिलं होतं..
रात्र रात्र जागायचो तिच्यासाठी मर मर मरायचो,

तिनेही मी तुझ्यावर खुप प्रेम करते रे
असं फसवं उत्तर दिलं होतं..
मी नेहमी खुप खुश
असायचो तिला पाहून,
असं काही मनं माझं तिच्यावर जडलं होतं..

ती आली आयुष्यात जेव्हा माझ्या,
तेव्हा तिच्यासोबत सुखी संसार
थाटायचा असं मनोमनी ठरवलं होतं..

ती ही खुप प्रेम करायची माझ्यावर,
तिनेही माझ्यासोबतचं
जगण्या मरण्याचं खोटं वचन दिलं होतं..

ती सोडून गेली जेव्हा मला बरबाद करुन,
तेव्हा मी तिच्यासाठी हस-या 
डोळ्यांना ढसाढसा रडवलं होतं..

खुप प्रयत्न केले खुप
यातना केल्या मी तिला समजावण्यासाठी,
तेव्हा असे वाटले जसे मी मरणाला एक
क्षणासाठी थांबवलं होतं..

मी तिला गमावलं ती माझ्या नशिबात
नाही म्हणुन,पण ?????

तीने आयुष्यात ते गमावलं जे फक्त
आणि फक्त तिच्यासाठीचं देवाने बनवलं होतं..

खरचं अजुनही ती सोडून
गेली ह्या गोष्टीवर विश्वास बसत
नाही माझा, कारण ?????
खरचं तिने प्रेम केलं होतं
का माझ्यावर,
की देवाने टाकलेलं
माझ्यासाठी कधीचं न सुटणारं कोडं होतं..

आता मला तिला पाहायचे आहे.....

आता मला तिला पाहायचे आहे.....


आता मला तिला पाहायचे आहे
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?......

सतत मी तिचा विचार करत असतो
क्षणाक्षणाला मी तिच्या प्रेमात पडत असतो
बोलायला जावेतर ती हसत विषय बद्लत असते
माझ्या काळजाचे ठोके वाढवत असते

म्हणूनच मला तिला विचारायचय
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?....
प्रेम करणे कधी वेडेपण असते
प्रेमात पडणारे सुद्धा वेडेच असतात का ?
मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे
ती सुद्धा माझ्या प्रेमात पडेल का ?... 

म्हणूनच मला तिला विचारायचे आहे ....
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?....

ती आज ही अगदी तशीचं आहे.....

ती आज ही अगदी तशीचं आहे.....


ती आज ही अगदी तशीचं आहे बिलकुल
बदलली नाही,

ती मला नेहमी म्हणायची..

तु मला कधी सोडून तर
नाही जाणार ना ?

मी म्हणायचो..

नाही गं शोना,

मी तुला कधी सोडणार
नाही काही जरी झालं तरी..

पण ?????

तु मला कधी सोडून जावू नकोस
नाहीतर ते मला सहन
नाही होणार..

मग ती ही म्हणायची..

नाही रे,

कधी सोडणार नाही मी तुला..

एकवेळ माझा जीव
सोडेन,

पण ?????

मी तुला नाही सोडणार..

ती आज ही अगदी तशीचं आहे बिलकुल
बदलली नाही,

आज हि ती तशीचं बोलते आहे..

फरक फक्त एवढाचं आहे की ?????

ती दुस-याच्या मिठीत आहे,

आणि हेचं
शब्द ती त्याचाशी बोलत आहे..

कित्ती गोड आहे, म्हणून सांगू ती..

कित्ती गोड आहे, म्हणून सांगू ती..


कित्ती गोड आहे, म्हणून सांगू ती..

एरवी अगदी खळखळून हसते,

पण मी हात पकडला की गोड लाजते..

जीन्स टी शर्ट regularly घालते,

पण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते..

साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते,

पण मोबाइलमधे फोटो काढतो म्हणालो तर 'नाही' म्हणते..

पिज्जा बर्गर सर्रास खाते,

चहा मात्र बशीत ओतुनच पिते..

लोकांसमोर खुप बोलते,

मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते..

ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते,

पण माझा विषय निघाला की पटकन बावरते..

बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते,

एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते.... :)

नेहमी तू सोबत असताना

नेहमी तू सोबत असताना



नेहमी तू सोबत असताना
त्याचा माझ्यावर वर्षाव व्हावा
असा पाऊस मला हवाय ...""

नेहमी जस .
तुझ्या प्रेमाने..,
माझ्या मनातील दु:ख वाहून
निघत तसं..
नद्यातून पाणी वाहून नेणारा
पाऊस मला हवाय ..."

" कधीच ..
आकाशात अभ्र दाटून
आलय..,

तसं..माझ मनही दाटलय..,
कधी या मनाच्या मेघाला ..

तुझ्या प्रेमाचा गारवा मिळेल
अन..
कधी हा मेघ बरसेल...

अरे.. कळू देत त्या मेघाला..,
अश्रू आवरेनासे झालेत..

पड म्हणावं एकदाच ...
अन .. ..
कर माझ्या अश्रूंना आपलंस
नाहीतर कळेल त्याला..,
मी त्याच्या विरहात रडल्याच...

" क्षणभर सुद्धा त्याच्याविना न
राहणारी मी...
त्याच्याविना कशी राहतेय...,
ज्याला नेहमी पाऊस हवा असे
त्याच्या नयनातून पाऊस येतोय.." ♥

अचानक पाने समोर येऊन

अचानक पाने समोर येऊन


अचानक पाने समोर येऊन
शेवटी आज तो बोलला होता
कोंदटलेल मन मोकळ करताना
किती घामाघूम झाला होता....

थोड्या वेळा पूर्वीच्या प्रसंगाने
अंगावर येतो काटा
काही क्षणातच त्यान माझ्या
मनाला शोधल्या नवीन वाटा

" अहो १ min . थांबाल का "
आर्त आवाज कानी पडला
कळलेच नाही माझे मला
पावलांचा घोडा का जागच्या जागीच
थबकला ?

आता मी हि घाबरले
जणू कावळ्याने मारली चोच
गर्कन मागे वळून पाहिलं
तर जवळ येत होता

तोच पाहून त्याला मी
घट्ट पकडले मैत्रिणीचे बोट
शोधक नजर खाली गेली
तर किंचित पकडले दातात ओठ "

नाझ्याशी मैत्री कराल का "?
तो बोलला अडखळत
" मला थोडा वेळ द्या "
माझे शब्द बाहेर पडले नकळत....

तो अजून बराच काही बोलला
त्यान जुळविल्या शब्दांच्या माळा
मात्र माझा उगाचच चालला होता
रेशमी ओढणीशी चाळा

" तू तर काहीच बोलत नाहीस "
पार केला त्यान मनाचा घाट
" मला उशीर होतोय "
मी लगेचच शोधली पळवाट

निश्चल मानाने मी सोडली
त्या जागेवर एक आठवण
तो मात्र तिथेच होता
जणू करत होता त्याची साठवण....

त्या प्रसंगाच्या आठवणीने
डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले
आपण त्याला हो म्हणायला हव होत
मन उगाचच ओशाळले

आता सहन होत नव्हता
या मनाचा एकटेपणा....

आता सहन होत नव्हता
या मनाचा एकटेपणा
चालून आलीच आहे संधी
तर पाहू त्याचा एकनिष्ठपणा ..... ♥

आठवणी

आठवणी


ती मी दिलेल्या सर्व आठवणी,
पुसण्याचा प्रयत्न करतेय..
माझ्या पासुन खुप लांब,
जाण्याचा प्रयत्न करतेय..!! ♥

पण मला माहीत आहे,
ती मला मनातुन काढुचं शकत नाही..
कितीही प्रयत्न केले तरी,
ती मला कधीचं विसरु शकत नाही..!! ♥

मला माहीत आहे,
मी तीच्या डोळ्यात फक्त आश्रुंच दिलेय..
तीला आश्रुं देताना,
मी पण खुप रडलोय..!! ♥

म्हणुन आजही मी तीच्यासाठी गप्प आहे,
कारण तीच्यावर माझे निस्वार्थ निस्सम
जिवापाड प्रेम आहे..!! ♥

तू नाजूक अश्या कळी सारखी

तू नाजूक अश्या कळी सारखी


तू नाजूक अश्या कळी सारखी
पाऊसाची भरडी थेंबे सोसणारी
काट्यांमध्ये राहून खूप हसणारी
उन्हाची तीव्र झळ ग्रह्णारी


तू नाजूक अश्या कळी सारखी
भोवरऱ्याची भून भून दिन रात ऐकणारी
हिरवळ चादरेच्या अंगणी वाढणारी
स्वतःची नवी ओळख जणू देणारी


तू नाजूक अश्या कळी सारखी
येणाऱ्या जाणाऱ्यांना मस्त वाटणारी
प्रत्येकाला खूपच छान हसवणारी
नुस्त पाहताच भरपूर बोलणारी


तू नाजूक अश्या कळी सारखी
मराठमोळ्या एटेत उभी राहणारी
मुक्तपणे वाऱ्यासंगे डौऊलनारी
प्रत्येकाच्या ह्रिदयात बसणा

भाऊ बहिणीच नात..

भाऊ बहिणीच नात..

अस हे भाऊ बहिणीच नात..
क्षणात हसणार, क्षणात रडणार,
क्षणात मारणार, क्षणात मार खाणार,
क्षणात भांडणार, क्षणात रागवणार,
पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच,
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !!

ताई पाणी भरते, भाऊ तीला मदत करतो,
तेच पाणी तो खेळण्यासाठी वापरू लागला की ताई त्याला ओरडते,
पण ओरडन्यामागे तीचे भावावरिल प्रेम लपलेल आसत,
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !!

भाऊ मस्ती करतो, ताई त्याला फटका मारते,
पण भाऊ लहान घरच्यांचा लाडका, तिला ओरडा पडतो,
पण तोच आपल्या तीच सांत्वन करायला पुढे आसतो,
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !!

बहिण सासरहून येते, भावाला खुप आनंद होतो,
तो तिच्याशी परत आपल्या बालपणात हारून जातो,
पण ती परत सासरला चालली की,
तो घरातील एका कोपर्‍यात रडत बसतो..
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात !!