तुझ्यासाठी काही पण

तुझ्यासाठी काही पण


तुझ्यासाठी काही पण

असे सारेच बोलतात,

पण मी तसे बोलणार नाही..

चंद्र तारे तोडून आणीन

अशी भाषा कधी

मी वापरणार नाही,

इतकच म्हणेन मी

तुझ्या सुखाशिवाय मनात

काहीच असणार नाही.

तुझ्या वेदना ओंजळीत घेईन

दुखातही तुझी साथ

कधी सोडणार नाही,

प्रेमासाठी काही पण

हे तुला दाखवल्याशिवाय

मी रहाणार नाही,

तुझ्यावर इतकं केलय प्रेम

कि माझ्यावरही कधी

इतकं प्रेम मी केलं नाही

माझ्यावरही कधी

इतकं प्रेम मी केलं नाही........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: