कोण आहे ती....!
कोण आहे ती ना नाव ना गाव
तरीही माझ्या हृदयावर का करत आहे घाव...
आताच तर मी तिला पहिले
पाहता पाहता माझे डोळे एक क्षण
तिच्यावर स्तीरावले
काय सांगू तिला
कसे बोलू माझ्या मनातले भाव
तरीही माझ्या हृदयावर का करत आहे घाव...
क्षणभर ची मैत्री क्षणभर चे प्रेम
कधी बदलेल काही नसतो नेम
म्हणूनच मी घेतोय जरा जपूनच
तिच्या मनाचा ठाव
तरीही माझ्या हृदयावर का करत आहे घाव...
हळू हळू चोरून तिच्याकडे पाहतोय
पाहता पाहता का स्वतःला विसरतोय
माझे मलाच काळात नाही मी हे का करतोय
असे तर नाही की मी तिच्या प्रेमात पडतोय
असे जर झाले तर सर्व कठीण होऊन बसेल राव
तरीही माझ्या हृदयावर का करत आहे घाव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा