एकतर्फ़ी प्रेम....
एकतर्फ़ी प्रेम करण्यात काय अर्थ आहे...
तीच्याकडे पाहत नुसते झुरत ...
एकतर्फ़ी प्रेम करण्यात काय अर्थ आहे...
जर तीला तुमच्यावर प्रेम नसेल..
तर तीच्यावर प्रेम करणेही व्यर्थ आहे...
जर तुम्हाला माहीत आहे
की ह्या रस्त्याचा अंत नाही..
तर त्या वाटेला जाण्यात काय अर्थ आहे...
जर कोणी त्या वाटेवरुन परत येणार नसेल
तर त्याची वाट पाहणेही व्यर्थ आहे...
मागचे सगळे वीसरुन आता शिकावे
स्वतःचे आयुष्य जगायला...
इथे कोणालाही नसतो वेळ
कोणाबरोबर आपुलकीने वागायला...
करु नये कोणाकडुन कसली अपेक्षा
इथे सगळेजण तुमच्यासारखे नसतात...
कोण कोणाचे नसते ह्या जगात
सगळेजण स्वार्थी असतात.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा