मैत्रीचा हा धागा....
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत..
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक... :)
तुझी मैत्रि आहे म्हणुनच,
जगण्याची जिद्द आहे...,
तुझ्या मैत्रितुन बाहेर पडलो तर,
लगेचच मरणाची हद्द आहे...
तुझी मैत्रि आहे म्हणुनच,
आयुष्याचा हा प्रवास आहे....
तुझ्या मैत्रिशिवाय,
जगण्याचा नुसताच भास आहे...
तुझी मैत्रि आहे म्हणुनच,
तुझ्यासमोर दोन अश्रू ढाळू शकतो ...
वेड्या या जगात,
जगण्याच्या मर्यादा मी पाळू शकतो ...
तुझी मैत्रि आहे....
माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता दिवा,
जग जळतं माझ्यावर,
कारण माझ्याकडं आहे तुझ्या मैत्रिचा ठेवा...!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा