तुला हसताना पाहून....
तुला हसताना पाहून,
मला हि हसावस वाटत,
हस्ता हस्ता फक्त..
तुझ्यातच हर्वावस वाटत...
तू माझ्याशी बोलताना,
फक्त तुलाच पहावस वाटत...
पाहता पाहता नकळतच,
तुझ्या त्या निरागस डोळ्यात,
घर करून रहावस वाटत...
तू उदास असताना,
फक्त तुलाच हस्वावस वाटत..
तुझ्या त्या एका स्मितहास्यासाठी,
तुझ्यासमोर..
वेड्यागत वागावस वाटत...
तू बरोबर असताना,
वेळानेही थांबावस वाटत...
त्या थांबलेल्या वेळात,
माझ्याच नकळत,
माझ्या मनातल सार,
अलगदच तुला कळावस वाटत...
माझ्या मनातल गुप्ती जाणून,
तूने हळूच....
गालातल्या गालात लाजाव्स वाटत...
अन त्या तुझ्या निरागस डोळ्याने,
माझ्याकडे पाहून,
माझ्याच नकळत ,
माझ्यातच तूने हर्वाव्स वाटत
माझ्याच नकळत ,
माझ्यातच तूने...
... हर्वाव्स वाटत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा