आता चाललो मी एकटा....!

आता चाललो मी एकटा....!



आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर,
तुला मनात ठेवून...
विसरून दुखं सारे,
अन,
आपल्यात झालं गेलं,
ते सगळं हि विसरून...

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या प्रेमाच्या,
गोड आठवणींना बरोबर घेऊन...
वाट हि मोठी माझी,
पण,
माहित नाही ग मला,
पोचवेल हि कुठे नेहून...

आता चाललो मी एकटा,
माझ्या वाटेवर...
तुझ्या शेवटच्या,
शब्दांना हृदयात ठेऊन,
ठाऊक होते मला,
तू बोललेले,
ते शब्द,
होते सारे खोटे...
कारण,
ते दिसत होते मला,
तुझ्या डोळ्यात राहून राहून...

फक्त तुझ्याच खातर,
मानले मी,
तुझे ते खोटे शब्द हि खरे...
अन,
फक्त तुझ्याच खातर,
निघालो मी तुझ्या आयुष्यातून...
चालू लागलो,
एका नव्या वाटेवर...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून...
तुला कधी हि न विसरण्यासाठी,
तुला ह्या मनात ठेवून...

तुला पाहताना....!

तुला पाहताना....!

चोरून तुला पाहताना,
मलाच कळत नव्हत,
कि मी काय करत होते....
तुझ्याहून दूर जाण्याच्या प्रयत्नात,
नकळतच का...
मी आजून हि तुझ्या जवळ येत होते???

अस का होत होत, अस का मी वागत होते...
अस का होत होत...
अस का मी वागत होते...
मनात लपलेल्या भावनांना,
तुझ्याहून का मी लपवत होते....

मित्रच होतास न तू माझा, कोणी परका तर नाही...
मित्रच होतास न तू माझा....
कोणी परका तर नाही...
मग ह्या मैत्रीच्या नात्याला,
प्रेमात बदलण्यापासून...
का मी दूर धावत होते???
तुझ्या जवळ असून हि..
का मी....
तुझ्याहून लांब जात होते???
तुझ्या जवळ असून हि..
का मी...
....तुझ्याहून....
.... खूप खूप लांब जात होते???...

मैत्री.....!


मैत्री.....!


मैत्री ठरवून होत
नाही हाच
मैत्रीचा फ़ायदा आहे.
मैत्री ठरवून होत
नाही हाच
मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम
नाहीत
हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....
मैत्रीची वाट आहे कठिण
पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच
तर प्राण आहे....
मैत्रीमध्ये
जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद
असता थेट....
तुझी-माझी मैत्री म्हण्जे
आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा... 

प्रेम समजणारी ती प्रेयसी......!

प्रेम समजणारी ती प्रेयसी......!


प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी

ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी

यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी

हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी

ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी

ओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी

केव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी

थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी

हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी

इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी

चोरून चोरून भेटायला येणारी असावी
हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी

तिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुःखात सदा दोघांची साथ असावी

जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी

आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी

गोष्ट अपूर्ण राहिली......!

गोष्ट अपूर्ण राहिली......!


कोंलेजाला जातांना समोरच
तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली ....
म्हटल पोरगी बहुतेक पटली
पण ... हत तिच्या मारी
मागे वळून बघितल तर तिची मैत्रिण
दिसली
त्या दिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलण्यासाठी जीभ सरवली..........
पण ... हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यात म्हणाली
" प्लीज पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण
आली
एकदा कोंलेजमध्ये परीक्षा सुरु झाली
गाड़ी घेउन जातांना रस्त्यावरच भेटली
पाठुनच तिन हाक मारली
उशीर झालेला म्हणून लिपट मागितली
" थांब गाड़ी लावून येतो!" म्हणून गेट जवळ
सोडली ..
पण ... हत तिच्या मारी
गाड़ी लावे पर्यंत हीच टाटा करुन सरकली
शेवटी पेपर संपल्यावर
जाताना तिला गाठली
हळूच खिशातली चिठ्ठी वर काढली
गालावरची खळी पाहिली ...
वाटल बहुतेक देवी पावली
पण ... हत तिच्या मारी
म्हणाली "
सॉरी थोडक्यासाठी गाडी चुकली "
तेव्हा पासून गोष्ट अपूर्ण राहिली.......तर
राहिली ??????

मला Facebook मुळे मिळालेली ..........!

मला Facebook मुळे मिळालेली ..........!


शोधता शोधता असंच तिला शोधलेल ,
Facebook वर पहिल्यांदाच
तिच्याशी बोललेलो ....!!
रात्रीची फक्त ती भेटायची ,
कधी कधी भल्यापहाटेहि online
असायची ....!!
का ? कुठे ? कसं ? म्हणत ओळख
आमची झालेली ,
हळूहळू ओळख मैत्रीत बदलत गेलेली...!!
कधी मग मी तिचा mobile नंबर
विचारला ,
तिने नाही म्हणत माझाच नंबर
घेतला ...!!
एके दिवशी अचानक तिचा Call आला ,
माझा माझ्यावरच विश्वास न बसला...!!
थोड थोड करत चांगली दोन तास
बोललेली ,
नाही नाही म्हणता सार सांगत
विचारात होती ...!!
काही दिवसांची ओळख आता खूप
वर्षाची भासू लागलेली ,
एक जिवाभावाची मैत्रीण
मला Facebook मुळे
मिळालेली ..............!

खरच काही मुले असतातच असे . ...!

खरच काही मुले असतातच असे . ...!


खरच काही मुले असतातच असे . .
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त
तिच्यावरच प्रेम करणारे . .
मुले असतातच असे . .

तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे . .

मुले असतातच असे,.
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून
तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे . .
खरच काही मुले असतातच असे . .

माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात
आपले प्रेम शोधणारे . .

तूच माझे जीवन आहेस.....!

तूच माझे जीवन आहेस.....!


मला तुझ्यासारख्या कविता नाही रचता येत
मनापासून नाही हसता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
मी फक्त तुझा आणि तु फक्त माझी आहेस...!!१!!

मला तुझ्यासारखे गाणे नाही गाता येत
हृदयाच्या अंतरंगात नाही जाता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
माझे हृदय तुझे अन तुझे हृदय हेच माझे हृदय आहे...!!२!!

मला तुझ्यासारखे डोळ्यात डोळे घालून नाही पहाता येत
तुझ्यासारखे नझर चोरून नाही जाता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
तुझी नझर माझ्यावर अन
माझ्या नाझारेत फक्त तूच आहेस...!!३!!

मला तुझ्यासारखे ढसाढसा नाही रडता येत
मनातले दुख नाही सांगता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
माझे सुख तुझे अन तुझे दुख माझे आहे...!!४!!

मला तुझ्यासारखे नेहमी आनंदी नाही राहता येत
सुखी संसाराचे स्वप्न नाही पाहता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
तूच माझ्या जीवनाचे स्वप्न
आणि त्या स्वप्नात फक्त तूच आहेस...!!५!!

मला तुझ्यासारखे imotional नाही होता येत
सर्वच feelings नाही share करता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
तूच माझे imotions अन
माझ्या feelings मधेही तूच आहेस...!!६!!

मला तुझ्यासारखे जीवन नाही जगता येत
जगाकडे आपलेपणाने नाही बघता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
माझे जीवन तुझ्यासाठी पण
तूच माझे जीवन आहेस
तूच माझे जीवन आहेस...!!७!!

कि तुला सर्व माफ आहे.....!

कि तुला सर्व माफ आहे.....!


तू माझ्याशी नाही बोललीस
मला दुख होणार नाही
तू माझ्याशी नाही हसलीस
मला राग येणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू नाही दिलास reply
मला काही वाटणार नाही
तू नाही उचललास phone
मला यातना होणार नाहीत
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू विसरलीस मला
मी तुला विसरणार नाही
तू रडविलेस जरी मला
तरीही मी रडणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू सोडून गेलीस मला
तरी मी वाट पाहणार
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
कि तुला सर्व माफ आहे...

तु.....!

तु.....!


वा-यावर उडणारी बटं सावरताना

खुप छान दिसायचीस तु,

तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन

खुप छान हसायचीस तु.

नेहमीच मला माझ्या अवतीभोवती

खरचं भासायची तु,

मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग

आल्यावर,कुठेच नसायची तु..

माझ्यावरच हसुन झाल्यावर” माझे”

पुन्हा मला दिसायची तु,

मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत

जेव्हा खरी-खुरी असायची तु

जीवन एक कोडे आहे...!

जीवन एक कोडे आहे...!


जीवन एक कोडे आहे

न सुटणारे न उलगडणारे ।

जीवन एक फूल आहे

दुःख स्पर्शाने मलूल होणारे ।

जीवन हे धूप आहे

क्षणा क्षणाला कणा कणाने झिजणारे ।

जीवन हे मेण आहे

कष्टाच्या आचेने वितळणारे ।

जीवन हे प्रेम आहे

क्षण भंगूर -ठरणारे ।

व्यवहाराची झळ लागताच

विरघळून -विरून जाणारे ।

जीवन हे स्वप्न आहे

कधी साकार न होणारे ।

जाग येतांच विरून जाउन

नेत्रांची जळजळ करणारे ।

जीवन हे आभाळ आहे

कधीं गवसणी न बसणारे ।

क्षितीजासारखे कायम

दूर दूर पळणारे.......!!

आयुष्य.....!

आयुष्य.....!


कधी कधी अस वाटत, 
आपल्याच आयुष्यावर आपलाच हक़्क़ नसतो.....
हव ते मिळवण्यासठी,
कदाचित आपणच कमी पडतो....

मग आयुष्यच निरस, निशब्द, 
असल्यासारखं वाटत,
जेव्हा आपलीच माणस ,
आपली नसल्यासारख भासत.....

या एवढ्या माणसांनी भरलेल्या गर्दीत ,
आपण कुठेतरी एकटच असल्याच वाटत ......
जेव्हा कुणी आपलं म्हणणार,
आपल्यालाच परकं करून जात........

नाही सहन होत तुला आणखी कुणाच्या 
स्वाधीन होताना पाहुन,
थांबशील का रे माझ्यासाठी,
माझ्यावरच प्रेम आठवून ........

नात्यांच्या या गर्दीत,
तू माझ्या प्रेमाला खरच विसरलास.....
आणि तुला माझ आयुष्य मानणारी मलाच,
या गर्दीत एकट ठेवून गेलास ......

पण, शेवटी जे घडायचे असत तेच घडत,
त्याला कुणीही बदलू शकत नसत ..
प्रेम हे प्रेमच असत,निभावणारे निभावतात,
नाही निभावू शकले,
त्यांना ते व्यर्थच वाटत असत .........!

कधीच विसरणार नाही....!

कधीच विसरणार नाही....!


तुझ्या डोळयातले पाणी दिसते मला,
पण मझ्या मनातले अश्रू तुला दिसत नाही.
.
तुझे प्रेम बघितले मी,पण माझाविश्वास तू अनुभवली नाहीस,
.
तुझा हक्क दाखवलीस तू,
पण माझा हट्ट तुला दिसला नाही.
.
तुझ्या भावना दर्शवलीस तू,
पण माझी व्याकुळता तुला दिसली नाही.
.
तुला वाईट वाटते हे सांगितलेसतू,पण मलावाईट नाही वाटणार असे
तू काही सांगितलेच नाही.
.
तू मला विसरशील सुधा,पण मी तुला
कधीच विसरणार नाही..