अचानक लाइफ मध्ये आली...........

अचानक लाइफ मध्ये आली...........


अचानक लाइफ मध्ये आली
अचानक लाइफ मध्ये
आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते
तरी कशी
... आवाज तिचा आहे नाजुक
परी सारखा
पण हरकती अगदी लहान
मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे
तुज्यात...
कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप
च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप
सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं
दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस
माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर
जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस
कायमचा अलविदा ...! 


भरपूर मित्र – मैत्रिणी असतील तुला........

भरपूर मित्र – मैत्रिणी असतील तुला......


भरपूर मित्र – मैत्रिणी असतील तुला

पण त्यात मी खास आहे का??

हे विचारायचय तुला…. सर्वांशी खुप काही share करत असशील

पण त्यात काही खास

माझ्याशी share करतोस का??

हे विचारायचय तुला… सर्वाना तू असाच सतावतोस

की फ़क्त मला सतावतोस???

हे विचारायचय तुला… तुझ्या सर्व मित्र-मैत्रिणी च्या

रांगेत मी कुठवर आली आहे???

हे विचारायचय तुला… तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगते

पण ती समजते का ??

हे विचारायचय तुला… हे करताना मला सवय झालिये तुझी

पण तुला माझी सवय झाली आहे का???

हे विचारायचय तुला…. तुझ्या आयुष्यातील सुख- दू:खात

मी किती भागीदार आहे..आहे की नाही??

हे विचारायचय तुला… इतक सार विचारल्यानंतर

आणखी एक विचारावस वाटतय..

"मी तुला सोडून गेले तर..कस वाटेल????"

खर तर हेच विचारायचय तुला….. 


तुझ असे सजणे..

तुझ असे सजणे..



जणू जीवाला ह्या वेड लावणे..

काबूत रहाव तुझ्या नेहमी..

असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..

का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..

तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...

दंग होई कुणी असा तुझा राज

मखमली गालाला नथनीचा बाज..

किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..

पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..

भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..

पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..

ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..

जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..

तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..

जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी....... 



लवकर ये माझी अर्धांगिनी बनून.............

     लवकर ये माझी अर्धांगिनी बनून.............

तुला बघताच मी माझाच राहिलो नाही
माझं मन कधी तुझं झालं हे कळलंच नाही,

तुझी ती पहिली नझर माझ्या हृदयाला अशी भिडली
जणू माझ्या हृदयात घर करून गेली, 

तुझे ते गोड हास्य मला बघताच
आपल्या प्रेमाची पहिली निशाणी सांगून गेली, 

तुझं ते मला बघून हळूच लाजणं
आपल्या प्रेमाची कबुली देऊन गेली, 

आता तुझ्याशिवाय मला राहवत नाही
कसा सांगू ग तुला माझी प्रिये, 

लवकर ये माझी अर्धांगिनी बनून
कारण आता तुझ्याशिवाय मला कर्मतच नाही. 











पाहिले माझ्यात काही

पाहिले माझ्यात काही आकार बदलतांना !
पेटले इशाऱ्यात काही नकार सांगतांना !

मी कधीया मृग झाले कळलेच नाही !
साधले सावजात काही शिकार हेरतांना!

जो तो छेडून आहे मजला वाटेत ह्या !
पहिले डोळ्यात काही विकार रंगतांना!

मी वादळी नार भरास आज आली !
साठले नजरेत काही हुंकार भरतांना!

मी लावण्या ज्वाळा वयानेच सोळा !
दाटले अंगात काही आजार फुलतांना!

मी झाकून कशी ठेवू आज कायेस ह्या ?
लाजले रुपात काही निखार पाहतांना!

मज आकर्षण होते बदलात आजच्या !
गाठले स्वप्नांत काही विचार पांगतांना !

खिळवून डोळे बसलेत आज दिवाने !
एकले त्यांचेच काही टुकार बोलतांना! 


तुला पाहील कि अस वाटत.....


तुला पाहील कि अस वाटत,
फक्त तुलाच पाहत बसाव...
तुझ्यातच माझ विश्व शोधाव,
अन शोधता शोधता,
तुझ्यातच हरवून जाव...♥♥♥

तू बोलत असलीस कि अस वाटत,
तू फक्त बोलतच रहाव,
अन मी फक्त ऐकतच रहाव,
आपल हे बोलन,
कधी हि न संपाव...♥♥♥

तू उदास झालीस कि अस वाटत,
तुला हसवण्यासाठी मी काहीही कराव...
बागेत तुझ्या बरोबर फिरताना,
फक्त तुला हसवण्यासाठी,
मी मुद्दामूनच धडपडाव...
अन लागलं म्हणून,
मी खोट खोट तुझ्या पुढे रडाव..♥♥♥

मग माझा खोटेपणा कळताच,
तू माझ्यावर मुद्दामून रुसाव,
मी तुला मन्वण्याचा प्रयत्न करताच ,
गालातल्या गालात तू हळूच हसाव,
अन मी घेता तुझा हात माझ्या हातात,
तू हलकेच लाजाव...♥♥♥

तू हसू लागलीस कि अस वाटत,
एखाद गुलाबच फुल फुलाव,
पाहून तुला हसताना,
मी हि खूप खूप हसाव...♥♥♥

तु सोबत असताना असे
वाटते दिवस संपुच नये
फक्त तु आणि मी
दुसरे कुणीच असु नये
हातात हात तुझ्या आणि हात कधीच सुटे नये....♥♥♥ 

प्रेम म्हणजे




प्रेम म्हणजे खेळ आणि प्रेम म्हणजेच बळ
धोक्यात पडायचे असेल तर देऊ नका रे वेळ ....!!

आता कळायला लागला तिला प्रेम नव्हते करायचे
तिच्यासाठी तर प्रेम म्हणजे होती एक कवडी
खेळायची ती सोबत घेऊन
भेटेल त्यांना ती द्यायची
तरी हि मी प्रेम करायचो तिला
जाणून सगळे काही

प्रेम म्हणजे खेळ आणि प्रेम म्हणजेच बळ
धोक्यात पडायचे असेल तर देऊ नका रे वेळ ....!!

प्रेम म्हणजे पैसा आणि प्रेम म्हणजे मज्जा
हेच तिला समजत होते
नव्हती कुणाची पर्वा

सारखी ती हसत राहायची
पण मागे कुणी झोकले तर
हजार मुले रडत असायची ..

प्रेम म्हणजे खेळ आणि प्रेम म्हणजेच बळ
धोक्यात पडायचे असेल तर देऊ नका रे वेळ ....!!







नव्हतीच माझी ती

नव्हतीच माझी ती तरी 



वाट तिची पाहायचो मी 

दूर जायचे होतेच तिला 

माझीच ती होईल म्हणून जगायचो

आता ती दिसतही नाही

सोडून गेली आहे ती मला

आरशात शोधत असतो तिला मी

तुटला तो आरसा

अन....??

जनू काळजाचेच तुकडे झाले

हातात घेतले त्या तुकड्यांना

तिच्या सारखेच घाव त्यानेही केले

ती भेटली नाही म्हणून

जखमेला कुरवाळत आयुष्य जगतो आहे मी .....  








एकदा मला आकाशात एक परी दिसली

एकदा मला आकाशात एक परी दिसली




हसली बघून माझ्याकड़े

म्हणते कशी मला.....

माग काय हव ते

मी म्हणालो...

सुन्दर आयुष्य दे मला

जिथे असेल फ़क्त सुख

नसेल कोणतही दुःख

ती म्हणाली देते

पण परत तक्रार नाही करायची....

अणि झाल ही तसच

सुख, सुख अणि नुसत सुख

ना घरात जागा, ना मनात...

सुख कुठेच मावेना

शेवटी अश्रु आले डोळ्यात

माझ रडू ऐकून

परी आली धावून

म्हणते कशी सुखात का रडतोस ?

तिला काय सांगायच तेच कळेना

सुखच दुखते आपल्याला तेच उमगेना..

तीला म्हणालो तुझ सुख घे

थोडस का होईना मला दुःख दे

दुखाशिवाय काय किमत सुखाची....

कडू अणि गोड दोन्ही.. चव चाखु देना आयुष्याची ..

मन



मन माझे तुझ्याकडे आहे,

कधी अंतर्मनात झाकून बघ.


मन गुंतवण्यात


वेगळीच मजा आहे,


तुझेही माझ्यात गुंतवून बघ.




प्रेमाच्या
गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार
झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.


क्षण काही जगलोत सोबत
आठवणीत
त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात
माझ्या बुडून बघ.


स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते
माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न
पाहून बघ.


जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी
तर वेडा झालोच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ.


जशी
तू सामावली आहेस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी
अन् मी वेगला
एकरूपता तरी जाणवेल बघ.


नाही करणार एवढे प्रेम
दुसरे कोणी
हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला
जगी तुझ्या
मला असू दे बस्स






का कुणास ठाऊक ...?

का कुणास ठाऊक ...?
तुझ्या बोलण्याचा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
नेहमीच तुझ्याशी बोलावासं वाटतं....

तुझ्या सवयीचा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
सगळं काही तुला सागावसं वाटतं....

तुझ्या हसण्याचा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
नेहमीच तु हसावसं वाटतं....
तुझ्या आठवणीचा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
तुझ्या आठवणीतच रहावसं वाटतं....

तुझ्या "miss call"चा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
तरीही तुला फ़ोन करावासा वाटतो....

का कुणास ठाऊक...?
तुझी आठवण येताच,
डोळ्यात अलगद पाणी येते.....

का कुणास ठाऊक...?
डोळे अलगद मिटताच,
तु नेहमीच समोर दिसतेस....,

का कुणास ठाऊक...?
थंड हवेची झुळूक येताच,
तु आल्याचा भास होतो...,

का कुणास ठाऊक...?
श्वास घेताच रुधयाचे ठोके,
तुझ्या नावाने पडू लागतात...,

पण का कुणास ठाऊक...?
मला तुझा एव्हढा राग का आहे...?
का कुणास ठाऊक ...?
मित्र आणि मैत्रिनिनो माला खरच कळत नाही आहे.....,
हे प्रेम आहे की राग आहे....??
जरा माला सांगाल का हे काय आहे....??



आता कुठे मी स्वप्न पहायला शिकतोय

आता कुठे मी स्वप्न पहायला शिकतोय
रात्रीच्या कुशीत शांत झोपायला शिकतोय
विचारांना आता कुठे गति आलीय माझ्या
दिवसांना आता कुठे सार्थकी लावायला शिकतोय


सागळ जग बदलतय माझ आता अन्
मी ही माझ्यात बदल करायला शिकतोय
सोप्प नव्हत कधी हे आणि नसनारेयही
पण अवघड गोष्टिच करायला शिकतोय

क्षितिज बरच लांब आहे अजुन पण
दरमजल करत निदान चालायला शिकतोय
सुर्याला तोंड देऊ शकत नाही अजुन पण
काजव्याला तरी मुठीत पकडायला शिकतोय

यशापयश काय असत हे माहित नाही मला
पण उमेदीन लढायला मात्र शिकतोय
जिंकायाची अपेक्षा केलीच नव्हती कधी
पण जीवनात हरायच नाही कधी हे शिकतोय

अजुन तरी स्वतंत्र विचार केला नव्हता कधी
आता स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला शिकतोय
सर्व काही अंधारातच आहे अजुन पण
आत्मविश्वासाच्या ज्योतिने अंधार भेदायला शिकतोय..................
 

पण आज तो मला सोडून जायेल....



भेटायची लावली होती आस 
पण न बोलता निघून जायेल 
त्याला भेटायचा लागला होता ध्यास 
पण आज तो मला सोडून जायेल....


काय करू त्याला थांबवण्यासाठी
काय कारण शोधू त्याला भेटण्यासाठी
का तो समजत नाही माझ्या हृदयाची वेदना
का तो असा वागतो हेच कळेना
पण आज तो मला सोडून जायेल....

फक्त त्याला एकदा मिठीत घेयाच आहे
त्याच्या माडीवर डोक ठेउन मनोसोक्त रडायच आहे
मनातल्या वेदना ओठांवर आणायच्या आहेत
त्याच्यावर किती प्रेम आहे हे शब्दाने सागायचं आहे
पण आज तो मला सोडून जायेल.....

आता परत त्याला भेटणे नाही
त्याला एकदा डोळ्यात साठावून घेणे शक्य नाही
सोडून चालला तो मला अर्ध्या रस्त्यावर
तरीही वाट पाहीन ह्याच रस्त्यावर
पण आज तो मला सोडून जायेल......

ती

ती वेडी विचारते मला


का रे प्रेमात पडलास का ?


कसे सांगू तिला 

जेव्हापासून पाहिलंय तुला

चैन नाही एक पल मला

ती वेडी विचारते मला

काय रे नाव संग न ?

कसे सांगू तिला

त्तुझेच नाव सांगायचं मला

ती वेडी विचारते मला

खूप आवडते का रे ती तुला ?

कसे सांगू तीला

तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला

म्हणूनच रोज हेच मागणे मागतो देवाला

ती वेडी विचारते मला

का रे मग सांगणार कधी तूतिला ?

कसे सांगू मी तिला

मला भीती वाटते तुजे नावघ्याला

कारण कदाचित जाशील सोडून मला एकट्याला ?

प्रेम करावस वाटत....!

तुला चोरून बघताना
मला खुप बर वाटत
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावस वाटत


तुझ ते निरागस हास्य
निहारून पहावस वाटत
हातात हात घालून
तुझ्या सोबत चालावस वाटत

तुझ्या त्या लाजन्या कड़े
एकटक पहावस वाटत
तुझ्या समोर उभा राहून
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत

मला खुप खुप खुप
तुझ्या सोबत बोलावस वाटत
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत

खरच
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत....!
 

एक अश्रू..

एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,

एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..

एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..
पुन्हा पुन्हा..
तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..

एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..

एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..

एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य....
तुझ्याचसाठी....
" तुझ्याशिवाय "....

आयुष्यात कुठून तरी एक परी येते

आयुष्यात कुठून तरी एक परी येते


कुठे तरी आतमध्ये गोड कळी खुलते


जुन्या मित्रांपेक्षा ती हवीहवीशी वाटते

दिवस रात्र मनामध्ये घालमेल घालते


येण्याने तिच्या जणू आयुष्यच बदलते

नकळत चेहेऱ्यावरती सुहास्य झळकते

नेहेमीच्या कामामध्ये लक्ष नाही लागते

येत जाता प्रत्येक पोरीत तीच दिसू लागते


जिकडे ती जाईल तिकडे मान का ती वाकते

गोड तिच्या हास्याला बघत राहावेसे वाटते

गालावरती रेंगाळणारे केस जेव्हा सावरते

गुदगुल्या झाल्यासारखे मला का ते वाटते


आयुष्यात कुठून तरी एक परी येते

येण्याने तिच्या जणू आयुष्यच बदलते

तिला तो आवडतो,पण त्याला ती आवडत नाही,

तिला तो आवडतो,पण त्याला ती आवडत नाही,
अन ज्याला ती आवडते, तो काहीच बोलत नाही...


ती त्याच्या वर मरते,जीवापार प्रेम करते,
पण त्याला ते कळत नाही...
अन ज्याला ती आवडते, त्याला हे पटत नाही...

ती त्याला आपल मानते, पण त्याच्या समोर काहीच बोलत नाही
अन ज्याला ती आवडते,त्याच्या समोर,
तिच्या मनात काहीच राहत नाही...

ती त्याला मिळवण्यासाठी खूप काही करते,
नटते, सजते अन कधी कधी मनातल्या मनात रडते...
अन ज्याला ती आवडते,
तिला सजलेलं पाहून, तो मनातल्या मनात हसतो...
कधी तरी सजेल, ती माझ्यासाठी सुद्धा,
अस स्वतः स्वतःलाच सांगतो...
उदास दिसला तिझा चेहरा, तर तिला तो हसवतो,
अन रडू नकोस ग वेडे, अस सांगून स्वतःच तो उदास होतो...

तिला फक्त तोच दिसतो,
अन ज्याला ती आवडते,
तो फक्त तिलाच पाहतो...

तीच प्रेम त्याला कधी कळत नाही,
अन ज्याला ती आवडते,
तो तिला त्याच्या मनातल,
कधीच काही सांगत नाही....
तो तिला त्याच्या मनातल,
कधीच काही...
सांगत नाही.... :)

आता फुलांनी थोडं



आता फुलांनी थोडं
जपायाला हव,
चोरटया नजरांपासून
लपायला हव...


पाकळ्यानींही स्वत:ला
सावरायला हव,
उगाचच दूरवर पसरण
आवरायला हव...

इथे छंद म्हणुन
फुलं हुंगणारे बरेच,
अन धुंदवेडे होवून
फुलं चुंबणारेही तेवढेच...

कुणी सांगाव हे फुलांना
त्यांनीच सारे समजायला हव,
कुणाच्या कुशीत शिराव अलगद
हे फुलांनीच ठरवायला हव ....
त्यांच त्यांनीच ठरवायला हव.......
 

चार पाउल मागेच राहिले





रोज मी सांगितले मित्रांना,
एकदा तरी बोला रे तिझ्याशी,
समजवा तिला,
अन विचारा,
परत होशील का ग तू त्याची...


रोज मी सांगितले मित्रांना,
आज हि मी नजेवताच झोपलो,
अन कोणाच्या हि नकळत,
फक्त तिझ्याच साठी मी रडलो ...

रोज मी सांगितले मित्रांना,
मला ती रोज आठवते,
स्वप्ना मधेच नाही,
तर आकाशातल्या चंद्र मध्ये हि,
फक्त मला तिच दिसते...

रोज मी सांगत राहिलो,
अन रोज ते ऐकत राहिले...
रोज मी रडत राहिलो,
अन ते फक्त पाहत राहिले...
मन माझ झुरत राहील तिझ्यासाठी,
अन मित्र माझे,
चार पाउल मागेच राहिले ....
चार पाउल मागेच राहिले
 

च्याआयला आपली लायकीच नव्हती ....



कॉलेजच्या नवीन दिवसात
ती माझ्याकडे आली...
मी मनात म्हटले.."बरे झाले
तेवढी ओळख तरी झाली...
तिने विचारले.."Eco च्या Notes देशील??"...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....

Notes ची देवाण-घेवाण करून
आम्ही पुरते थकलो...
अभ्यासाताल्या difficulties
सोडवून सोडवून पकलो...
प्रेमाच्या गोष्टी केल्याच नाहीत कुणी...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....

अश्रु गाळायला मैत्रिणीनी
वापरला आमचा खांदा...
Best Friend च्या गोंडस नावाने
केला आमचा Full-Too वांदा...
Boyfriend च्या जागेवर Promotion कधी झालेच नाही...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....

दरवर्षी Rose-Day ला फक्त
पिवळ्या गुलाबा-पर्यंत मजल...
नंतर घरी येउन ऐकायची
एखादी दुख-भरी गझल...
प्रेमाचे गाणे म्हटलेच नाही कुणी...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....

Valentine Day ला कुणाला
propose करायचा झाला नाही धीर...
आमच्या Cupidच्या धनुष्यातून
कधी सुटलाच नाही प्रेमतीर...
साला Stupid Cupid पण काय करणार...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....

आपल्या हिन्दी सिनेमातल्या
Hero-Heroine चे बरे असते...
अगदी 'पहली नजर में'
एकमेकावर प्रेम बसते...
आम्ही अजुन waiting list वरच आहोत...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....

मैत्री फक्त कामापुरती राहील
याची मैत्रिणीनी घेतली दक्षता...
नंतर direct लग्नाचे आमंत्रण
टाकायला गेलो आम्ही अक्षता...
नवरयाच्या पगाराचे आकडे ऐकले...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....

साधे लग्न-सुद्धा जमवताना
झाली आमची कुचम्बणा...
प्रत्येक मुलीचा बाप करी
पगार-Flat बद्दल विचारणा...
पैशापुढे ठरलो आम्ही दुय्यम
कारण फक्त एकच...
च्याआयला आपली लायकीच नव्हती ....
 

एक PROMISE.......





एक PROMISE...........
माज्याकडून न सुटणार
हा हातातला हात कधी........
काहीही झाले तरी न हरणार 
हे नाते आपले कधी..............

एक PROMISE.........
हवाय तुज्याकडून........
हा माज्यावरच विश्वास
कायम राहील....
हे माज्यावारच प्रेम कधी न
कमी होईल...

एक PROMISE.......
माज्याकडून जेवढे तुला
सुख देता येईल तेवढे देईन ........
काहीही झाले तरी साथ मी
फक्त तुला च देईन ...........

एक PROMISE........
हवाय तुज्याकडून......
असच माज्या मिठी मध्ये हरवशील.....
असच नेहमी फक्त मला आठवशील...
दुखात न कधी रडशील.........
सुखात न कधी मला विसरशील.........

एक PROMISE.............
मी नेहमी तुला सुखात ठेवीन..........
एक पल सुधा माज्यापासून दूर न करीन....
दिलेले प्रोमीस जीवन भर निभावेन ..........
केलेले प्रेम जन्मभर जपेन ............
 

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं



कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
" I LOVE YOU "
 

♥ कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा.....! ♥

♥ कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा.....! ♥


नाही केले


काही आपल्या साठी तिने ..........

तरी तिच्यासाठी काही तरी करुन बघा....!

तिच्या साठी आपले जीवनकाही नाही.........

पण तिच्या साठी जगुन बघा....!

आपल्या शब्दाला किंमत नाही .......

पण तिच्या शब्दाला किंमत द्यायला शिका......!

आपले अश्रु म्हणजे पानी ........

पण तिच्या अश्रुना मोती म्हणायला शिका ....!

♥ एक तर्फे का होई ना, पण जिवापाड प्रेम करून बघा ....! ♥ ♥
 

आता फुलांनी थोडं





आता फुलांनी थोडं
जपायाला हव,
चोरटया नजरांपासून
लपायला हव...


पाकळ्यानींही स्वत:ला
सावरायला हव,
उगाचच दूरवर पसरण
आवरायला हव...

इथे छंद म्हणुन
फुलं हुंगणारे बरेच,
अन धुंदवेडे होवून
फुलं चुंबणारेही तेवढेच...

कुणी सांगाव हे फुलांना
त्यांनीच सारे समजायला हव,
कुणाच्या कुशीत शिराव अलगद
हे फुलांनीच ठरवायला हव ....
त्यांच त्यांनीच ठरवायला हव.......