रोज मी सांगितले मित्रांना,
एकदा तरी बोला रे तिझ्याशी,
समजवा तिला,
अन विचारा,
परत होशील का ग तू त्याची...
रोज मी सांगितले मित्रांना,
आज हि मी नजेवताच झोपलो,
अन कोणाच्या हि नकळत,
फक्त तिझ्याच साठी मी रडलो ...
रोज मी सांगितले मित्रांना,
मला ती रोज आठवते,
स्वप्ना मधेच नाही,
तर आकाशातल्या चंद्र मध्ये हि,
फक्त मला तिच दिसते...
रोज मी सांगत राहिलो,
अन रोज ते ऐकत राहिले...
रोज मी रडत राहिलो,
अन ते फक्त पाहत राहिले...
मन माझ झुरत राहील तिझ्यासाठी,
अन मित्र माझे,
चार पाउल मागेच राहिले ....
चार पाउल मागेच राहिले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा