तिला तो आवडतो,पण त्याला ती आवडत नाही,

तिला तो आवडतो,पण त्याला ती आवडत नाही,
अन ज्याला ती आवडते, तो काहीच बोलत नाही...


ती त्याच्या वर मरते,जीवापार प्रेम करते,
पण त्याला ते कळत नाही...
अन ज्याला ती आवडते, त्याला हे पटत नाही...

ती त्याला आपल मानते, पण त्याच्या समोर काहीच बोलत नाही
अन ज्याला ती आवडते,त्याच्या समोर,
तिच्या मनात काहीच राहत नाही...

ती त्याला मिळवण्यासाठी खूप काही करते,
नटते, सजते अन कधी कधी मनातल्या मनात रडते...
अन ज्याला ती आवडते,
तिला सजलेलं पाहून, तो मनातल्या मनात हसतो...
कधी तरी सजेल, ती माझ्यासाठी सुद्धा,
अस स्वतः स्वतःलाच सांगतो...
उदास दिसला तिझा चेहरा, तर तिला तो हसवतो,
अन रडू नकोस ग वेडे, अस सांगून स्वतःच तो उदास होतो...

तिला फक्त तोच दिसतो,
अन ज्याला ती आवडते,
तो फक्त तिलाच पाहतो...

तीच प्रेम त्याला कधी कळत नाही,
अन ज्याला ती आवडते,
तो तिला त्याच्या मनातल,
कधीच काही सांगत नाही....
तो तिला त्याच्या मनातल,
कधीच काही...
सांगत नाही.... :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: