आता कुठे मी स्वप्न पहायला शिकतोय

आता कुठे मी स्वप्न पहायला शिकतोय
रात्रीच्या कुशीत शांत झोपायला शिकतोय
विचारांना आता कुठे गति आलीय माझ्या
दिवसांना आता कुठे सार्थकी लावायला शिकतोय


सागळ जग बदलतय माझ आता अन्
मी ही माझ्यात बदल करायला शिकतोय
सोप्प नव्हत कधी हे आणि नसनारेयही
पण अवघड गोष्टिच करायला शिकतोय

क्षितिज बरच लांब आहे अजुन पण
दरमजल करत निदान चालायला शिकतोय
सुर्याला तोंड देऊ शकत नाही अजुन पण
काजव्याला तरी मुठीत पकडायला शिकतोय

यशापयश काय असत हे माहित नाही मला
पण उमेदीन लढायला मात्र शिकतोय
जिंकायाची अपेक्षा केलीच नव्हती कधी
पण जीवनात हरायच नाही कधी हे शिकतोय

अजुन तरी स्वतंत्र विचार केला नव्हता कधी
आता स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला शिकतोय
सर्व काही अंधारातच आहे अजुन पण
आत्मविश्वासाच्या ज्योतिने अंधार भेदायला शिकतोय..................
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: