पाहिले माझ्यात काही

पाहिले माझ्यात काही आकार बदलतांना !
पेटले इशाऱ्यात काही नकार सांगतांना !

मी कधीया मृग झाले कळलेच नाही !
साधले सावजात काही शिकार हेरतांना!

जो तो छेडून आहे मजला वाटेत ह्या !
पहिले डोळ्यात काही विकार रंगतांना!

मी वादळी नार भरास आज आली !
साठले नजरेत काही हुंकार भरतांना!

मी लावण्या ज्वाळा वयानेच सोळा !
दाटले अंगात काही आजार फुलतांना!

मी झाकून कशी ठेवू आज कायेस ह्या ?
लाजले रुपात काही निखार पाहतांना!

मज आकर्षण होते बदलात आजच्या !
गाठले स्वप्नांत काही विचार पांगतांना !

खिळवून डोळे बसलेत आज दिवाने !
एकले त्यांचेच काही टुकार बोलतांना! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: